Farmer Agricultural News sarpanch selection soon in district Pune Maharashtra | Agrowon

पुणे जिल्ह्यातील १४०० सरपंचांच्या निवडीचा मार्ग मोकळा

टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 मे 2020

पुणे  ः सरकारने राज्यातील ग्रामपंचयातींमध्ये सरपंच आणि उपसरपंच पदांच्या रिक्त जागांची निवड प्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पुणे जिल्ह्यातील सुमारे १४०० सरपंचांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.

पुणे  ः सरकारने राज्यातील ग्रामपंचयातींमध्ये सरपंच आणि उपसरपंच पदांच्या रिक्त जागांची निवड प्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पुणे जिल्ह्यातील सुमारे १४०० सरपंचांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.

राज्य निवडणूक आयोगाने १७ मार्चला सरपंच निवडीच्या प्रक्रियेला स्थगिती दिली होती. त्यापूर्वी जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींनी सरपंच आणि उपसरपंच यांचे राजीनामे घेऊन नवीन निवडीबाबतचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविले. आता राज्य सरकारने ग्रामपंचायतींच्या बैठका घेऊन निवड प्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पुणे जिल्ह्यातील एक हजार ४०० सरपंचाची निवड प्रक्रिया लवकरच होण्याची शक्यता आहे.

जिल्हयातील १४०० ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत २७ मार्चला काढण्यात येणार होती. मात्र, आता ही प्रक्रिया राबवून जिल्ह्यातील सरपंच पदांच्या निवडी होणार आहेत.

सरपंचपदासाठी आरक्षण सोडत, ७५० ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम आणि सहा ग्रामपंचायतीसाठी मार्च अखेरीस होणारी निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी यापूर्वी दिले होते. आता राज्य सरकारच्या निर्णयानुसार सरपंच पदांच्या निवडीची प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या सुत्रांनी सांगितले.

पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील मुर्टी, मोराळवाडी, खराडेवाडी, पुरंदर तालुक्यातील आस्करवाडी आणि भिवरी, दौंड तालुक्यातील बिरोबावाडी अशा सहा ग्रामपंचायतींची मुदत एप्रिल ते जून या महिन्यांमध्ये संपणार आहे. या निवडणुकांसाठी २९ मार्चला मतदान, ३० मार्चला मतमोजणी आणि निकाल जाहिर करण्याचा कार्यक्रम प्रशासनाने आखला होता. त्यामुळे आता ही सर्व प्रक्रिया प्रशासनाला नव्याने राबवावी लागणार आहे.


इतर बातम्या
'दोन वर्षांपर्यंतचे शेतकऱ्यांचे...नगर, : कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांत गंभीर...
पिचकारी मारणाऱ्यांवर आता दंडात्मक...नगर : सार्वजनिक ठिकाणी पिचकारी मारणाऱ्यांवर...
नगर झेडपीची पहिल्यांदाच झाली लेखी...नगर : कोरोनामुळे लॉकडाउन असल्याने जिल्हा...
शेतकऱ्यांची अडवणूक झाली, तर...नगर : ‘‘शेतकऱ्यांसाठी काम करणे याला आपण सर्वांनी...
अतिवृष्टी आणि अतिक्रमणामुळेच पूरस्थिती...मुंबई : अतिवृष्टी आणि अतिक्रमणामुळेच...
शेतमालाचे ऑनलाइन तारण कर्ज होणार उपलब्ध...मुंबई : टाळेबंदी कालावधीत शेतकऱ्यांना राज्य वखार...
टोळधाड निर्मूलनासाठी कृषी विभागाचा...नगर : महाराष्ट्रात चार दिवसांपूर्वी टोळधाड...
मॉन्सून अरबी समुद्रात; सोमवारपर्यंत...पुणे  : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून)...
पुणे बाजार समितीत भाजीपाला, फळ विभाग...पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव बाजार समितीलगतच्या...
उद्यापासून पूर्वमोसमी पावसाचा अंदाज;...पुणे : राज्यात अक्षरशः भाजून काढणाऱ्या उन्हापासून...
सहकाराच्या त्रिस्तरीय रचना मोडण्यास...पुणे : राज्यातील काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
नाशिक बाजार समितीचे कामकाज आजपासून सुरूनाशिक : स्वच्छता व निर्जंतुकीकरण प्रक्रिया...
राज्यात ४० हजार टन दूध पावडर पडूनपुणे : राज्यात ४० हजार टन दूध पावडर (भुकटी) पडून...
टोळधाडीमुळे अवघे ५० हेक्‍टरचे नुकसान :...नागपूर: टोळधाडीचा धोका अमरावती विभागात टळला असला...
पीककर्जासाठी हेलपाटे, भ्रष्ट...संग्रामपूर, जि. बुलडाणा : वेळ सकाळी साधारण...
`गोकुळ' ची ४५ लाख लिटर दुधावर प्रक्रिया कोल्हापूर ः लॉकडाउनच्या काळात कोल्हापूर...
मागणीपेक्षाही एक लाख क्विंटल बियाणे...पुणे : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन असले...
जळगाव ‘झेडपी’चे कामकाज रुळावर जळगाव : जिल्हा परिषदेचे कामकाज रुळावर येत आहे....
जळगावात पीककर्जासाठी बॅंका पोटखराब...जळगाव : पीक किंवा शेती कर्ज देताना पोटखराब...
औरंगाबादमध्ये थेट फळे, भाजीपाला...औरंगाबाद : जिल्ह्यातील शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी...