रत्नागिरी जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागाची तीन हजारांवर कामे मंजूर

रत्नागिरी ः महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून (मनरेगा) जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या ३३७२ कामांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यात जनावरांसाठी गोठा बांधणे, शेळी पालनासाठी शेड बांधणे यासह कुक्कुटपालन शेडचा समावेश आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

रत्नागिरी  ः महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून (मनरेगा) जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या ३३७२ कामांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यात जनावरांसाठी गोठा बांधणे, शेळी पालनासाठी शेड बांधणे यासह कुक्कुटपालन शेडचा समावेश आहे.  

रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकरी, पशुपालकांना आपल्या गावातच रोजगार निर्माण व्हावा या उद्देशाने ‘मनरेगा’तून केंद्र शासनाने रोजगाराची हमी दिली आहे. गावांचा सर्वांगीण विकास आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे राहणीमान उंचावणे या योजनेतून शक्य होणार आहे. याकरिता ग्रामपंचायतीकडे नोंदणी करून जॉब कार्ड काढणे आवश्यक आहे. या योजनेसाठी २०२०-२१ या आर्थिक वर्षाचे आराखडे तयार करण्यात आले आहेत. या वर्षात जनावरांसाठी गोठ्याची २२६७ कामे, शेळ्यांसाठी शेडची ४१३, कुक्कुटपालनासाठी ६९२ कामे मंजूर करण्यात आली आहेत. मात्र ॲझोला निर्मितीसाठी एकही प्रस्ताव आलेला नाही. कोकणात पशुपालन काही अंशी केले जाते. त्यामुळे या योजनेला ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद मिळाला.

या योजनेतून पशुसंवर्धन विभागामार्फत ६ जनावरांसाठी गोठे, शेड बांधकाम २६.९५ चौरस मीटर म्हणजे ७७ मीटर लांब आणि ३५ मीटर रुंद जागेवर सिमेंट काँक्रीटचा थर टाकून ७७ मीटर लांब ०.२ मीटर रुंद व ०.६५ मीटर उंच आकाराची गव्हाणी व साधारण २५० मीटर साठवण क्षमता असलेली साठवण टाकी बांधता येईल. त्यासाठी मजुरी अनुदानापोटी ३५ हजार रुपये उपलब्ध होतील. ज्यांच्याकडे स्वतःची जागा आहेत असे लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. 

शेळीपालन शेडसाठी देखील दहा शेळ्यांकरिता ७५० चौरस मीटर म्हणजे ३.७५ मीटर लांब व २ मीटर रुंद अशा आकाराचा निवारा बांधता येतो. त्यात ३५ हजार रुपये मजुरी अनुदान मिळते. याच आकाराचे शेड १०० कुक्कुट पक्षांसाठी सुध्दा बांधता येते. या योजनेचा समावेश यापूर्वीच ‘मनरेगा’मध्ये होता; मात्र सद्यःस्थितीत गावाकडे परतलेल्या सर्वांच्या हाताला काम मिळावे आणि त्यांना उत्पन्नाची संधी उपलब्ध व्हावी, असे केंद्र सरकारने सूचित केले आहे. त्यासाठी संबंधित ग्रामपंचायतींकडे संपर्क साधून याबाबत ग्रामसेवकांकडून सविस्तर माहिती घेऊन आपले जॉब कार्ड काढणे आवश्यक आहे.   प्रतिक्रिया या योजनेतून लाभार्थ्यांना जनावरांचा गोठा, शेळीपालन व कुक्कुटपालन करण्यासाठी शेड बांधकाम करावयाचे असल्यास १५ ऑगस्ट २०२० ला होणा-या ग्रामसभेत प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करावा.   - डॉ. वाय. बी . पुजारी,  जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, रत्नागिरी.

गोठा आणि शेड बांधण्यासाठी तालुकानिहाय मंजूर प्रस्ताव
तालुका जनावरे शेळी कुक्कुटपालन
चिपळूण ६२३ २३३ ३०६
दापोली ४१६ १३५
गुहागर १६२
खेड ५४२ १४० १५०
लांजा ८० १४
मंडणगड १०७
राजापूर ९८ १८ ४६
रत्नागिरी १३२ १७
संगमेश्‍वर १०७ १३ १८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com