कोल्हापुरातील ४२ हजारांवर शेतकऱ्यांची कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर

 संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

कोल्हापूर  ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेतील दुसरी यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीत जिल्ह्यातील ४२ हजार ९१३ शेतकऱ्यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील चार गावांत ग्रामपंचायत निवडणूक असल्याने ही गावे यातून वगळली आहेत. 

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर नव्याने सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने राज्यातील शेतकऱ्यांचे हेक्‍टरी दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला. तालुकानिहाय या योजनेतील पात्र शेतकऱ्यांची माहिती ऑनलाइन भरून घेतली आहे. जिल्ह्यातील ५० हजार ८८४ शेतकऱ्यांची माहिती यात भरली होती. 

विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी (ता. २४) शासनाने ६८ गावांतील १५ हजार शेतकऱ्यांची कर्जमाफीसाठीची पहिली यादी प्रसिद्ध केली होती. त्यात जिल्ह्यातील आसुर्ले व हेर्ले या दोन गावांतील २०८ शेतकऱ्यांचा समावेश होता. राज्यभरातील पात्र शेतकऱ्यांची दुसरी यादी शनिवारी (ता. २८) जाहीर होणार होती, पण ग्रामपंचायत निवडणुकीमुळे ही यादी जाहीर करण्यास राज्य निवडणूक आयोगाकडून निर्बंध आले. त्यात  सुधारणा करत ज्या गावांत निवडणूक सुरू आहे ती गावे वगळून ही यादी जाहीर करण्याचे आदेश आयोगाने दिल्यानंतर जिल्ह्यातील ४२ हजार ९१३ शेतकऱ्यांची दुसरी यादी जाहीर केली. सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर सोमवारी (ता. २) कर्जमाफीची रक्कम जमा होणार आहे. 

ही गावे वगळली  ग्रामपंचायत निवडणूक असल्याने चिंचणे (ता. चंदगड), पोंबरे (ता. पन्हाळा), कुंभवडे, मांजरे (ता. शाहूवाडी) या चार गावांतील कर्जमाफीची यादी प्रलंबित ठेवली. निवडणूक संपल्यानंतर या गावांतील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. 

तालुकानिहाय लाभार्थी 
तालुका जिल्हा बॅंक इतर एकूण
आजरा १६०२  ३७७ १९७९ 
गगनबावडा  १०१० २१३ १२२३
भुदरगड   १९०५ ८९३  २७९८
चंदगड  ३११७ ५११ ३६२८
गडहिंग्लज २३३३ १२७५ ३६०८
हातकणंगले २२७२ १६३३ ३९०५
कागल २६९१ १६१४  ४३०५
करवीर ३४८२ २२१४ ५६९६
पन्हाळा ३४१० ११६५ ४५७५
राधानगरी ३४०७ १३५८ ४७६५
शाहूवाडी २९४८ ११६१ ४१०९
शिरोळ  १३१४  १००१ २३१५
कोल्हापूर शहर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com