Farmer Agricultural News seeds Rainfall affects seed production akola maharashtra | Agrowon

पावसामुळे बीजोत्पादनाला फटका; बियाणे तुटवड्याची शक्यता

टीम अॅग्रोवन
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

अकोला  ः राज्यात खरीप हंगामात ऐन पीक काढणीच्या कालावधीत पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे जसे नुकसान झाले तसाच फटका विविध पिकांच्या बीजोत्पादनाला बसला आहे. एकट्या महाबीजाचे सोयाबीन या प्रमुख पिकाचे बीजोत्पादन दीड लाख क्विंटलने कमी होण्याची शक्यता आहे. असाच फटका इतर कंपन्यांच्या बीजोत्पादन कार्यक्रमालाही बसला असून त्याचे पडसाद येत्या खरीप हंगामात बियाण्याबाबत उमटू शकतात.

अकोला  ः राज्यात खरीप हंगामात ऐन पीक काढणीच्या कालावधीत पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे जसे नुकसान झाले तसाच फटका विविध पिकांच्या बीजोत्पादनाला बसला आहे. एकट्या महाबीजाचे सोयाबीन या प्रमुख पिकाचे बीजोत्पादन दीड लाख क्विंटलने कमी होण्याची शक्यता आहे. असाच फटका इतर कंपन्यांच्या बीजोत्पादन कार्यक्रमालाही बसला असून त्याचे पडसाद येत्या खरीप हंगामात बियाण्याबाबत उमटू शकतात.

महाबीज खरिपात विविध वाणांचे सुमारे आठ लाख क्विंटलपर्यंत बीजोत्पादन करीत असते. यात पाच लाख क्विंटलपेक्षा अधिक वाटा सोयाबीन बियाण्याचा आहे. बुलडाणा, वाशीम, हिंगोली, परभणी, लातूर, उस्मानाबाद व इतर जिल्ह्यांमध्ये ६० हजार हेक्टरवर सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रम घेतला जातो. याद्वारे हेक्टरी १० क्विंटल बियाणे उत्पादन होते. यातून सहा लाख क्विंटलपर्यंत सोयाबीन उपलब्ध होते. विविध चाचण्या, चाळणी, पॅकिंग करून हे बियाणे पुढील हंगामासाठी उपलब्ध करून देण्यात येत असते.

यंदा सोयाबीन काढणीला आलेले असताना या भागात १८ ऑक्टोबरनंतर जोराचा पाऊस झाला. त्यामुळे बीजोत्पादन क्षेत्राचे नुकसान झाले. यंदा याचा ताण बियाण्याला बसला. सर्वत्र मिळून तीन ते साडेतीन लाख क्विंटलपर्यंत बियाणे उपलब्ध होऊ शकेल, अशी स्थिती आहे. दरवर्षी बाजारात खरिपात सरासरी पाच लाख क्विंटल बियाणे महाबीज देते. त्यामुळे उर्वरित एक ते दीड लाख क्विंटल बियाण्याची तूट आता इतर भागातून भरून काढावी लागेल. बीजोत्पादक कंपन्यांनाही अशीच झळ बसली आहे. परिणामी आगामी हंगामात सोयाबीन बियाण्याची टंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. 

इतर राज्ये फायदा उठविण्याची चिन्हे
महाराष्ट्रात सोयाबीनचे क्षेत्र सरासरी ४० लाख हेक्टर आहे. हेक्टरी ७५ किलो बियाणे वापरले जाते. किमान ५० टक्के शेतकरी हे नवीन बियाणे वापरतात. दरवर्षी सोयाबीनच्या लाखो क्विंटल बियाण्याला मागणी असते. यात पाच लाख क्विंटलपर्यंत बियाणे महाबीज उपलब्ध करून देते. यंदा राज्यात बीजोत्पादन घटल्याने महाबीजाला दरवर्षी इतके बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. राज्यात उद्भवणाऱ्या बियाणे टंचाईचा फायदा सोयाबीन उत्पादक राज्यातील व्यापारी, खासगी बियाणे कंपन्या उठविण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.  


इतर ताज्या घडामोडी
गोरेगाव आणि देगावांतील शेतकऱ्यांच्या...अकोला  ः जिल्ह्यातील गोरेगाव व देगाव या दोन...
जळगाव जिल्ह्यात अर्ली केळी लागवड सुरूजळगाव  ः जिल्ह्यात यावल, रावेर, मुक्ताईनगर,...
...अखेर रुईखेड येथे हवामान केंद्र स्थापनअकोला  ः महावेध व हवामान आधारित फळपीक विमा...
चांदवड येथे शेतकरी संघटनेची कांदा परिषद...नाशिक  : केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री...
गोंदिया : नुकसानग्रस्तांचे डोळे लागले...सडक अर्जुनी, गोंदिया  ः खरीप हंगामात अवकाळी...
जळगाव : किसान सन्मानच्या लाभाची...जळगाव ः शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या...
परभणी जिल्ह्यात नादुरुस्त बंधाऱ्यांमुळे...परभणी : जिल्हा परिषदेच्या लघू पाटबंधारे...
कर्जमुक्ती योजनेंतर्गत ७४६ शेतकऱ्यांचे...नाशिक : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
किसान सभेचे बिऱ्हाड आंदोलन मागेनाशिक  : दिंडोरी तालुक्यामध्ये गेल्या अनेक...
लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात हेक्‍टरी १०...उस्मानाबाद : दोन्ही जिल्ह्यातील कापूस व तुरीची...
पाणी सोडण्याविरुद्ध रेणा प्रकल्पस्थळी...रेणापूर, जि. लातूर : भंडारवाडी (ता. रेणापूर)...
वणवा नुकसानग्रस्तांना सिंधुदुर्ग ‘झेडपी...सिंधुदुर्ग : ‘‘वणव्यामुळे नुकसान झालेल्या...
सांगलीत ‘रोहयो’तून डाळिंब लागवडीला ‘...आटपाडी, जि. सांगली : पावणे दोन वर्षांत येथील...
पुणे जिल्ह्यात हरभऱ्याला रोग-किडीचा फटकापुणे ः रब्बी हंगामात वाफसा न झाल्याने अनेक...
नगर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना मदत...नगर ः अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची...
पीकविम्याची रक्कम लवकरच ः कृषिमंत्री...मुंबई ः राज्यातील शेतकऱ्यांना १५ ते २० दिवसांच्या...
सातारा जिल्ह्यात अडीच महिन्यांत केवळ ४४...सातारा ः दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने सुरू...
मराठवाड्यातील दूध संकलनात घटऔरंगाबाद : मराठवाड्यातील दूध संकलनात गतवर्षी...
पहाटेच्या शपथविधीची विधानसभेत आठवणमुंबई ः देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी...
मराठवाडी धरणग्रस्तांनी बंद पाडले धरणाचे...ढेबेवाडी, जि. सातारा : ‘आधी पुनर्वसन मगच धरण’ या...