कांदा चाळीसाठी ६० कोटींना मंजुरी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  : राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत २०१९-२० मध्ये राबविण्यास मान्यता देण्यात आलेल्या कांदाचाळ योजनेसाठीच्या ६० कोटी रुपयांना मंजुरी देण्यात आली आहे. राज्यातील २८ जिल्ह्यांतील ६५०० हून अधिक कांदाचाळधारक शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे. २७ व्या राज्यस्तरीय प्रकल्प मंजुरी समितीमध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत कांदाचाळ उभारणी प्रकल्प २०१९-२० मध्ये राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. 

या प्रकल्पांतर्गत एकूण १५० कोटी रुपयांचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. समितीच्या मंजुरीनंतर या योजनेसाठीच्या अर्थसाहाय्य स्वरूपात ६० कोटी रुपयांचा निधी एक वर्षाच्या कलावधीत उपलब्ध करून देण्यात आला आहे. सदर प्रकल्प ५०:५० याप्रमाणात राबविण्यात येणार आहे. त्यानुसार वैयक्तिक लाभार्थ्यांना एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाच्या निकषांनुसार अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील ६७८९ लाभार्थ्यांना ६० कोटी रुपयांचा निधी ‘आरकेव्हीवाय’मधून मंजूर करण्यात आला.   प्रकल्पातील महत्त्वाच्या बाबी...

  • मंजूर निधीपैकी केंद्र शासनाचा हिस्सा ६० टक्के व राज्य शासनाचा हिस्सा ४० टक्के असेल.
  • निवडलेल्या लाभार्थ्यांना सक्षम अधिकारी यांनी पूर्वसंमती दिल्यानंतरच अनुदान मिळेल.
  • लाभार्थ्याच्या सातबाऱ्यावर नोंद झाल्याशिवाय अनुदान मिळणार नाही.
  • लाभार्थ्याच्या कांदाचाळीचे जिओ टॅगिंग, आधार संलग्न बँक खाते आवश्‍यक आहे.
  • कांदा चाळ योजना लाभार्थी आणि निधी (लाख रुपये) (२०१९-२०)
    जिल्हा  लाभार्थी  निधी
    पालघर ३   २.६२५
    नाशिक ५२१ ४५५.८७५
    धुळे १७८  १५५.७५०
    नंदुरबार   ४५  ३९.३७५
    जळगाव ११६ १०१.५००
    पुणे  ९८  ८५.७५०
    नगर २५२५ २२०९.३७५
    सोलापूर ३३०  २८८.७५०
    सातारा    ३६ ३१.५००
    सांगली   २३ २०.१२५
    औरंगाबाद  ७०० ६१२.५००
    जालना ६३७ ५५७.३७५
    बीड ५९४ ५१९.७५०
    नांदेड ३७  ३२.३७५
    परभणी  २०३  १७७.६२५
    हिंगोली  ३७ ३२.३७५
    उस्मानाबाद २३८ २०७.८७५
    अकोला १०६  ९२.७५०
    अमरावती    ६४  ५६.०००
    वाशिम ५१ ४४.६२५
    यवतमाळ    २८    २४.५००
    बुलडाणा १४५ १२६.८७५
    नागपूर २    १.७५०
    चंद्रपूर २५ २१.८७५
    गडचिरोली ०.८७५
    गोंदिया ३   २.६२५
    वर्धा   ४२   ३६.७५०
    भंडारा ०.८७५
    मंडळ स्तर   - ६०.००
    एकूण राज्य   ६७८९  ६०००.०००

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com