Farmer Agricultural News special campagin for soil testing Akola maharashtra | Agrowon

हिंगणी बुद्रूक, कपिलेश्‍वर येथे माती नमुने घेण्यासाठी विशेष मोहीम

टीम अॅग्रोवन
रविवार, 3 मे 2020

अकोला  ः आगामी खरीप हंगामाच्या दृष्टीने मृदा आरोग्य पत्रिकेअंतर्गत माती नमुने घेण्यासाठी हिंगणी बुद्रूक, कपिलेश्‍वर येथे विशेष मोहीम राबविण्यात आली. ‘कोरोना’च्या पार्श्‍वभूमीवर सोशल डिस्टन्सचे पालन करीत हिंगणी बुद्रूकचे कृषी सहायक एन. जी. घाटोळ तर कपिलेश्‍वर येथील कृषी सहायक ए. एन. वानखडे यांच्यासह कृषी सहायक अनंत देशमुख, धर्मेंद्र राठोड, मंगेश पवार, चंदा बोळे, उषा सुलताने, दिपाली अटबर यांनी माती नमुने घेत तपासणीसाठी पाठविले.

अकोला  ः आगामी खरीप हंगामाच्या दृष्टीने मृदा आरोग्य पत्रिकेअंतर्गत माती नमुने घेण्यासाठी हिंगणी बुद्रूक, कपिलेश्‍वर येथे विशेष मोहीम राबविण्यात आली. ‘कोरोना’च्या पार्श्‍वभूमीवर सोशल डिस्टन्सचे पालन करीत हिंगणी बुद्रूकचे कृषी सहायक एन. जी. घाटोळ तर कपिलेश्‍वर येथील कृषी सहायक ए. एन. वानखडे यांच्यासह कृषी सहायक अनंत देशमुख, धर्मेंद्र राठोड, मंगेश पवार, चंदा बोळे, उषा सुलताने, दिपाली अटबर यांनी माती नमुने घेत तपासणीसाठी पाठविले.

जमिनीचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी मृदा तपासणीवर आधारीत खतांच्या संतुलित तसेच कार्यक्षम वापरास अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. केंद्र व राज्य शासनाच्या पुढाकाराने राज्यात शाश्‍वत शेती अभियानाअंतर्गत मृदा आरोग्य पत्रिका ही योजना सुरु असून आहे. या योजनेत बदल करून राज्यातील प्रत्येक तालुक्यातील पाच गावे निवडून त्यातील वहितीखालील संपूर्ण शेत जमिनीतील माती नमुन्यांची तपासणी करून गावातील शेतकऱ्यांना आरोग्य पत्रिका वितरणाचा पथदर्शी प्रकल्प राबविणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे.

मृदा तपासणीवर आधारित अन्नद्रव्यांच्या कमतरतेनुसार खतांच्या संतुलित वापरास प्रोत्साहन देणे, मृदा आरोग्य सुधारण्यासाठी जैविक खते, सेंद्रिय खतांच्या वापरास प्रोत्साहन देणे आदी उद्देश योजनेचे आहेत. या आधारे हिंगणी, कपिलेश्‍वर गावांची निवड करण्यात आली. हिंगणी बुद्रूक येथे ४८९ तर कपिलेश्‍वर येथे ४२९ माती नमुने घेण्याची प्रक्रिया नुकतीच पार पाडली. जिल्हा परिषद सदस्य गोपाल दातकर यांच्या उपस्थितीत अमित दातकर, रितेश ढवळी, गणेश चाकोते, अंकुश चाकोते, नितीन चाकोते यांनी यासाठी सहकार्य केले.


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...