अकोल्यात थेट कृषी निविष्ठा पुरवठ्यास वेग

अकोला ः सद्यःस्थितीत शेतकऱ्यांना कृषी निविष्ठांचा थेट पुरवठा केला जात आहे. आत्माअंतर्गत शेतकरी गटांच्या माध्यमातून या कामाला जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये गती देण्यात आली असून दररोज पुरवठा वाढत आहे.
सांगळूद, पळसोबढे येथे शेतकरी गटांनी खरेदी केलेल्या निविष्ठांचा पुरवठा शेतकऱ्यांना करण्यात आला.
सांगळूद, पळसोबढे येथे शेतकरी गटांनी खरेदी केलेल्या निविष्ठांचा पुरवठा शेतकऱ्यांना करण्यात आला.

अकोला  ः सद्यःस्थितीत शेतकऱ्यांना कृषी निविष्ठांचा थेट पुरवठा केला जात आहे. आत्माअंतर्गत शेतकरी गटांच्या माध्यमातून या कामाला जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये गती देण्यात आली असून दररोज पुरवठा वाढत आहे.

शनिवारी (ता.९) अकोला तालुक्यातील मौजे सांगळूद व पळसो (बढे) येथे आत्मा अंतर्गत शेतकरी गटाच्या माध्यमातून खतांच्या एकूण ३०० गोण्या खरेदी करण्यात आल्या. यावेळी तालुका कृषी अधिकारी प्रधान, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक व्ही.एम.शेगोकार, कृषी सहायक रवींद्र माळी व शेतकरी गटातील अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते.

कोरोना या विषाणूजन्य आजारावर गर्दी टाळणे हाच एकमेव उपाय असल्याने लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. संचारबंदीत गर्दी टाळून शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामात खते, बियाणे पुरविण्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक (आत्मा) मोहन वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन केले आहे. त्या अनुषंगाने तालुका कृषी अधिकारी व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या (आत्मा) वतीने शनिवारी (ता.९) शेतकऱ्यांच्या बांधावर खते, बियाणे, कीटकनाशके पुरवण्याचा उपक्रम राबविण्यात आला. मौजे शेरवाडी, नवसाल येथील शेतकरी गटाने नोंदणी केल्यानुसार निविष्ठा थेट गावात पोहोच करण्यात आल्या. तालुका कृषी अधिकारी अमृता काळे , कृषी सहायक अविनाश लांडे, किशोर धोटे आदी यावेळी उपस्थित होते.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com