Farmer Agricultural News Spodoptera litura damge grape crop nashik maharashtra | Agrowon

नाशिक जिल्ह्यात द्राक्षमणी पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव

टीम अॅग्रोवन
रविवार, 15 डिसेंबर 2019

नाशिक  : जिल्ह्यात द्राक्ष पीक फुलोरा व मणी तयार होण्याच्या अवस्थेत असताना ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात द्राक्ष बागांवर ‘स्पोडोप्टेरा लिट्यूरा’ अळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव दिसून आला होता. प्रामुख्याने रात्री निदर्शनास येणाऱ्या अळीने द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांची अडचण वाढविली होती. मात्र आता घड तयार होऊन मण्यांमध्ये पाणी उतरण्याच्या अवस्थेत पीक असताना या मणी पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने द्राक्ष उत्पादकांना पुन्हा एकदा अडचणींचा सामना करावा लागत आहे. 

नाशिक  : जिल्ह्यात द्राक्ष पीक फुलोरा व मणी तयार होण्याच्या अवस्थेत असताना ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात द्राक्ष बागांवर ‘स्पोडोप्टेरा लिट्यूरा’ अळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव दिसून आला होता. प्रामुख्याने रात्री निदर्शनास येणाऱ्या अळीने द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांची अडचण वाढविली होती. मात्र आता घड तयार होऊन मण्यांमध्ये पाणी उतरण्याच्या अवस्थेत पीक असताना या मणी पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने द्राक्ष उत्पादकांना पुन्हा एकदा अडचणींचा सामना करावा लागत आहे. 

जिल्ह्यातील नाशिक, निफाड, दिंडोरी, चांदवड या तालुक्यांमध्ये द्राक्षांवर या अळीचा प्रादुर्भाव दिसून येऊ लागला आहे, त्यामुळे काढणीसाठी येत असलेल्या घडांचे मोठे नुकसान होत आहे. चालू वर्षीच्या पूर्वहंगामी द्राक्ष उत्पादनात परिपक्व होत असलेल्या द्राक्षाच्या घडांमध्ये या अळीचा प्रादुर्भाव होता. मात्र आता हा प्रादुर्भाव मणी पोखरण्यापर्यंत गेला आहे. ही अळी वाढीच्या अवस्थेत होणाऱ्या मण्यांची साल पोखरून मण्यांचे नुकसान करत आहे. जिल्ह्यात हे प्रमाण १५ ते २० टक्के असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

निर्यात करण्यासाठी द्राक्ष उत्पादकांनी काढणीपूर्वी द्राक्ष घडांना कागदाचे आवेष्टन लावून घड बांधले होते. मात्र आता कागद काढून पाहिल्यानंतर मोठ्या प्रमाणावर या अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. मात्र द्राक्ष काढणीला आल्याने या अवस्थेत कीटकनाशकांची फवारणी करणे अशक्य असल्याचे द्राक्ष उत्पादकांचे म्हणणे आहे. या अळीच्या प्रदुर्भावाने द्राक्ष उत्पादकांच्या संकटात वाढ झाली आहे. कीड नियंत्रणासाठी नेमक्या काय उपाययोजना कराव्यात, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

सप्टेंबर महिन्याच्या दरम्यान छाटणी झालेल्या बागांमध्ये द्राक्ष बागायतदारांनी विरळणी अवस्थेत या अळीचे निरीक्षण घेऊन कीडनियंत्रण करावे. प्रकाश सापळे लावून पतंगांचे नियंत्रण चांगल्या प्रकारे होऊ शकते. मात्र, कीटकनाशकांची फवारणी करताना शिफारस तसेच तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, असे के.के. वाघ कृषी महाविद्यालयाच्या किटकशास्त्र विभागातील  प्रा. तुषार उगले यांनी सांगितले.


इतर अॅग्रो विशेष
केंद्र सरकारकडून कृषी कायदांना...नवी दिल्ली ः दिल्लीच्या सीमांवर कृषी...
ग्रामसभांना ३१ मार्चपर्यंत परवानगी...अकोला : राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये कोविड-१९च्या...
राज्यात साडेचार लाख क्‍विंटल मका...औरंगाबाद : बंद पडलेली मका खरेदी जवळपास एका...
शेतकऱ्यांच्या भूमिकेवर न्यायालयाची...नवी दिल्ली ः कृषी कायद्यांवरून निर्माण झालेल्या...
तूर खरेदीसाठी जिल्हानिहाय उत्पादकता...परभणी ः केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत...
कांदा निर्यातदारांसाठी आता ‘ओनियन नेट’ नागपूर : कांदा उत्पादनाच्या बाबतीत जागतीक स्तरावर...
खानदेशात गारठा वाढला पुणे ः उत्तर भारतातील काही राज्यात थंडीची लाट आली...
पावसाच्या पाण्यावर फुलवलेली दर्जेदार...निमगाव घाणा (ता. जि. नगर) येथील रामदास रघुनाथ...
पोतेकरांची देशी केळी वर्षभर खातेय भावसातारा जिल्ह्यातील शेंद्रे (ता. जि. सातारा) येथील...
अजून एक ‘बारामती पॅटर्न’कार्यालय आम्हाला घरच्यासारखे वागवते, कर्मचारी...
‘तारीख पे तारीख’ किती दिवस?देशाचे पंतप्रधान दमदार भाषणात जनतेला आश्‍वासन...
आधुनिक गुऱ्हाळाद्वारे केवळ चार गुंठ्यात...कोल्हापूर शहरापासून काही किलोमीटरवरील कणेरी...
थंडीत वाढ होण्याची शक्यता पुणे ः राज्यातील काही भागांत अंशतः ढगाळ...
तुरीला दराची झळाळीनांदेड : तूर उत्पादक पट्ट्यात नव्या तुरीची आवक...
इथे १५ मिनिटांत सोडवला जातो प्रश्‍न !पुणे : ‘‘आयएसओ’ मानांकन मिळविणारे आणि काही...
राज्यात साखरेचा महापूरपुणे : राज्यात गेल्या वर्षीची ३६ लाख टन साखर...
तंत्रज्ञान सप्ताहात शेतकऱ्यांना घातली...माळेगाव, जि. पुणे ः भरडधान्य उत्पादन,...
अद्याप ४१२ लाख टन ऊसगाळप बाकीपुणे : राज्यातील साखर कारखान्यांनी आतापर्यंत ५३४...
कामे व्यवस्थित करा, अन्यथा पगारातून...पुणे : नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा)...
सरकारचा पसारा आवरासरकार कोणत्याही देशातला एक महत्त्वाचा घटक असतो....