Farmer Agricultural News Status of Kharip sowing area Satara Maharashtra | Agrowon

सातारा जिल्ह्यात खरिपाच्या ८२.८५ टक्के क्षेत्रावर पेरण्या

टीम अॅग्रोवन
रविवार, 12 जुलै 2020

सातारा  ः पावसाचा काहीसा जोर वाढल्याने जिल्ह्यात पेरणीच्या कामांना वेग आला आहे. जिल्ह्यात बुधवारअखेर (ता.९)  ८२.८५ टक्के क्षेत्रावर पेरणीची कामे पूर्ण झाली आहेत. 

सातारा  ः पावसाचा काहीसा जोर वाढल्याने जिल्ह्यात पेरणीच्या कामांना वेग आला आहे. जिल्ह्यात बुधवारअखेर (ता.९)  ८२.८५ टक्के क्षेत्रावर पेरणीची कामे पूर्ण झाली आहेत. शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाला सर्वाधिक प्राधान्य दिले असल्याने जिल्ह्यात ६७ हजार ६७१ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. 

जिल्ह्यात पेरणीच्या तसेच भात लागवडीच्या कामांना वेग आला आहे. जिल्ह्यात खरिपाचे सरासरी क्षेत्र तीन लाख १६ हजार ७०१ हेक्टर असून बुधवारअखेर दोन लाख ६२ हजार ३७५ हेक्टरवर म्हणजेच ८२.८५ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. यात सोयाबीनला प्राधान्य दिले जात असल्याने या पिकाची सरासरी पेक्षाही जास्त लागवड झाली आहे. सोयाबीनचे सरासरी क्षेत्र ६३ हजार ७५४ हेक्टर असून ६७ हजार ६७१ हेक्टरवर म्हणजेच १०६.१४ टक्के क्षेत्रावर सोयाबीनची लागवड झाली आहे.

सातारा, कराड, पाटण, जावली, वाई, कोरेगाव, खटाव तालुक्यात सोयाबीन जास्त लागवड झाली आहे. दुष्काळग्रस्त तालुक्यांत खरिपातील बाजरी हे प्रमुख पीक असल्याने सोयाबीननंतर सर्वाधिक बाजरीची लागवड झाली आहे. बाजरीचे सरासरी क्षेत्र ६४ हजार असून यापैकी ५४ हजार ६३५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

खरीप ज्वारीचे सरासरी क्षेत्र २४ हजार २०३ हेक्टर असून त्यापैकी १६ हजार ३९० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पावसाच्या हजेरीमुळे भात लागवडीस वेग आला आहे. भात पिकाचे सरासरी क्षेत्र ४९ हजार ८९ हेक्टर असून त्यापैकी ३२ हजार ६७ हेक्टर क्षेत्रावर भात लागवड झाली आहे. जिल्ह्यात आडसाली उसाची लागवड सुरू असून आत्तापर्यंत आठ हजार ४८ हेक्टर क्षेत्रावर आडसाली उसाची लागवड झाली आहे.
 
तालुकानिहाय पेरणी (हेक्टर) : सातारा ३०,४७७, जावली १२,४९४, पाटण ५५,३५१, कराड २३,५१७, कोरेगाव २३,५१७, खटाव ३४,०४७, माण ३२,९०१,फलटण १५,३७२, खंडाळा ८,७०९,वाई ११,६४९, महाबळेश्वर ३,४८९.
 


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात भिज पावासाने पिकांना लाभजळगाव  ः खानदेशात मागील दोन दिवस भिज पाऊस...
सोलापूर जिल्ह्यात मूगाची पाने पिवळी पडू...सोलापूर  ः जिल्ह्यात पावसाने वेळेवर हजेरी...
प्राथमिक शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या...कुसुंबा, जि. धुळे ः सर्वांत मोठा नोकर वर्ग म्हणून...
बार्शीतील रेशनच्या धान्य...सोलापूर  ः बार्शी तालुक्यातील रेशनचे धान्य...
शेत जमिनीच्या मोजणीसाठी चार हजार...सोलापूर ः पती-पत्नीच्या नावावर असलेल्या...
‘आयआयएचआर’चे बियाणे आता ऑनलाइन नाशिक : भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या बंगळुरू...
मराठवाड्यात पीक कर्जाचे ४०.८३ टक्केच...औरंगाबाद : मराठवाड्यात शेतकऱ्यांना खरीप पीक...
पुणे जिल्ह्यातील सहा धरणांत ८०...पुणे ः धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम...
सातारा जिल्हा बँकेतर्फे १३४ टक्के...सातारा : जिल्हा वार्षिक पत आराखाड्यात २०२०-२१...
जनावरांमध्ये `लंपी स्किन`चा संसर्ग नांदेड  ः अर्धापूर परिसरात गाय, बैल आदी...
नांदेड जिल्ह्यातील एक लाख ९२ हजार...नांदेड  ः यंदा जिल्ह्यातील २ लाख ६८ हजार...
ओसंडून वाहतोय आडोळ प्रकल्पशिरपूरजैन, जि. वाशीम ः दमदार पावसामुळे येथील आडोळ...
काटेपूर्णा प्रकल्प तुडुंब, पाणी साठ्यात...अकोला ः यंदाच्या मोसमात आत्तापर्यंत वेगवेगळ्या...
अकोला जिल्ह्यात युरिया खताचा वापर वाढलाअकोला ः जिल्ह्यामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत...
राधानगरी धरणाचे दोन दरवाजे खुलेचकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील...
नाशिक शहरात बैलपोळा साहित्याच्या...नाशिक : गेल्या वर्षांपासून शेतीमालाचे नुकसान व...
मालेगाव तालुक्यात भाजीपाल्यासह खरीप...नाशिक : मालेगाव तालुक्यातील पश्चिम भागात झालेल्या...
येलदरीच्या दोन दरवाजातून विसर्गपरभणी : बुलडणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणातील...
सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरलासांगली ः जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला आहे....
नाशिकमध्ये ढोबळी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक  : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...