सोलापुरात १३ हजारांवर शेतीपंपांच्या वीजजोडण्या प्रलंबित

सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांना शेतीपंपांसाठी वीजजोडणीची मागणी करुन वर्षानुवर्षे उलटत आहेत. पण तातडीने वीजजोडणी मिळणे दुरापास्त झाले आहे. सातत्याने पाठपुरावा करुनही विविध कारणांचा पाढा प्रशासनाकडून वाचला जातो. गेल्या वर्षभरात जवळपास १३ हजार २६१ वीजजोड प्रलंबित आहेत.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांना शेतीपंपांसाठी वीजजोडणीची मागणी करुन वर्षानुवर्षे उलटत आहेत. पण तातडीने वीजजोडणी मिळणे दुरापास्त झाले आहे. सातत्याने पाठपुरावा करुनही विविध कारणांचा पाढा प्रशासनाकडून वाचला जातो. गेल्या वर्षभरात जवळपास १३ हजार २६१ वीजजोड प्रलंबित आहेत.

गेल्या वर्षभरात जवळपास १३ हजार २६१ शेतकऱ्यांना वीजजोड देण्याचे उद्दिष्ठ प्रशासनाने ठेवले आहे. त्यासाठी जवळपास ३२८० कोटी रुपयांचा निधी आवश्यक आहे. पण तो कसा आणि कधी मिळणार हा प्रश्नच आहे. आधीच सततचे भारनियमन आणि अवेळी वीजेच्या वेळापत्रकाने शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. अनेक भागांत बहुतेक वेळा रात्रीची वीज दिली जात असल्याने रात्रभर शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्याशिवाय पर्याय नाही. पण ज्यांच्याकडे वीजजोडच नाही, त्यासाठी त्यांची सातत्याने धडपड सुरु आहे. त्यांनाही महावितरणकडून योग्य ते साह्य मिळत नाही.

अनेक शेतकऱ्यांनी तीन-तीन वर्षापासून वीजजोडासाठी अनामत रक्कम भरुन मागणी अर्ज भरला आहे. पण साहित्य उपलब्ध नाही, मनुष्यबळाची कमतरता, यासारखी विविध कारणे देत शेतकऱ्यांना माघारी पाठवले जाते. पण यासंबंधी एकाही जबाबदार अधिकऱ्याला एखादी मोहिम हाती घेऊन हे काम हातावेगळे करण्याचा प्रयत्न करावा, असे वाटत नाही. सततच्या पाठपुराव्यामुळे आणि ठरलेल्या उत्तरामुळे शेतकरीही आता वैतागून पाठपुरावा करायचा सोडून देत आहेत.   दरवर्षी आराखड्यात, पण प्रश्न मार्गी नाही दरवर्षी जिल्ह्याच्या खरिपाच्या आराखड्यात प्रलंबित कृषिपंपांसाठी वीजजोडणीच्या मागण्यांची आकडेवारी दिली जाते. यंदाही अशीच आकडेवारी खरीप आराखड्यात दिली आहे. स्वतः पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी यासाठी निधीची मागणी केली आहे. गेल्या दोन वर्षापासून सातत्याने यासंबंधीचे उद्दिष्ठ ठरवले जाते. पण प्रत्यक्षात प्रशासनाला निधी मिळण्यात आणि शेतकऱ्यांना वीजजोड मिळण्यात अडचण येतेच आणि पुन्हा हा प्रश्न प्रलंबित राहतो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com