Farmer Agricultural News sugarcane cutting workers allow to return home Mumbai Maharashtra | Agrowon

ऊसतोड मजुरांना गावी जाता येणार; मात्र...

टीम अॅग्रोवन
शनिवार, 18 एप्रिल 2020

नगर  ः साखर कारखान्यांचा गाळप हंगाम संपूनही लॉकडाउन असल्याने पंधरा दिवसांपासून अडकून पडलेल्या ऊसतोड कामगारांना आता घरी जाता येणार आहे. राज्याच्या मुख्य सचिवांनी शुक्रवारी (ता.१७) याबाबत आदेश काढले आहेत. त्यामुळे अडकून पडलेल्या मजुरांना घरी जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, कारखाना कार्यस्थळ सोडण्याआधी आरोग्य तपासणी करावी, तसेच कामगारांची यादी तयार करून ती यादी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे मान्यतेसाठी दिली जावी, असे आदेशांत नमूद केले आहे.

नगर  ः साखर कारखान्यांचा गाळप हंगाम संपूनही लॉकडाउन असल्याने पंधरा दिवसांपासून अडकून पडलेल्या ऊसतोड कामगारांना आता घरी जाता येणार आहे. राज्याच्या मुख्य सचिवांनी शुक्रवारी (ता.१७) याबाबत आदेश काढले आहेत. त्यामुळे अडकून पडलेल्या मजुरांना घरी जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, कारखाना कार्यस्थळ सोडण्याआधी आरोग्य तपासणी करावी, तसेच कामगारांची यादी तयार करून ती यादी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे मान्यतेसाठी दिली जावी, असे आदेशांत नमूद केले आहे.

साखर कारखान्यांचा गाळप हंगाम संपला आणि गावाकडे जायची तयारी करीत असतानाच ‘कोरोना’ पार्श्वभूमीवर लॉकडाउन सुरु झाल्याने ऊसतोड मजूर कारखान्यांवरच अडकून पडले होते. शासनाने दिलेल्या माहितीनुसार सध्या ३८ कारखान्यांवर १ लाख ३१ हजार ५०० मजूर अडकलेले आहेत. यांपैकी बहुतांश मजूर बीड जिल्ह्यातील असल्याने मजुरांना गावी जाण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह नेत्यांनी केली. त्यातच दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने कारखाना कार्यस्थळावरील मजुरांचे हाल झाले. त्यामुळे चौदा दिवसांचा कालावधी पूर्ण झालेल्या मजुरांना गावी जाता यावे याबाबत शुक्रवारी आदेश काढण्यात आले.

मात्र गावी जाण्याआधी चौदा दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे अशा मजुरांची आरोग्य तपासणी होणार आहे. त्यांच्यात न्यूमोनिया, सर्दी, ताप, खोकला यासारखी कोणतीही लक्षणे नाहीत याचे प्रमाणपत्र घेऊन गावनिहाय, तालुकानिहाय संपर्कासह यादी तयार करावी. त्यात संबंधित मजुरांच्या गावच्या सरपंचाचेही नाव असावे. कामगार सध्या ज्या जिल्ह्यात वास्तव्याला आहेत, त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे ही यादी मान्यतेसाठी पाठवावी. तीच यादी जेथे जाणार आहेत त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी, तहसीलदारांना द्यावी अशी सर्व जबाबदारी साखर कारखान्याच्या व्यवस्थापकीय संचालकांवर असेल.

मजूर गावी गेल्यावर त्यांना गाव प्रवेशाची जबाबदारी तेथील सरपंचावर देण्यात आली आहे. शिवाय मजूर गावी सुरक्षित पोहोचल्याचा अहवाल साखर आयुक्तांना द्यावा, असे आदेशात नमुद केले आहे.
 


इतर अॅग्रो विशेष
पीककर्ज वाटपात राज्यात कोल्हापूर प्रथम...कोल्हापूर : जिल्ह्याकरिता पीक कर्जाचे वार्षिक...
कृषी विधेयकांना वाढता विरोधनवी दिल्लीः देशभरात ठिकठिकाणी विशेषतः पंजाब आणि...
तंबी देताच फळपिकांची विमा भरपाई झाली...पुणे: फळपिक विमा योजनेतील अडवून ठेवलेली नुकसान...
कांदा उत्पादकांची सावध चाल नाशिक: केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा...
मराठवाड्यात पावसाचे धुमशान पुणे ः मराठवाड्यात पावसाचे धुमशान सुरूच आहे....
ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी निवडणूक...मुंबई: कोरोनामुळे स्थगित करण्यात आलेल्या आणि...
हलक्या पावसाची शक्यता पुणे ः बंगाल उपसागराच्या ईशान्य परिसरात उद्या (ता...
शेतकऱ्यांना उभारी देणारी संत ज्ञानेश्‍...किनखेडा (ता.रिसोड,जि.वाशीम) येथील प्रगतशील शेतकरी...
बाजार स्वातंत्र्यांची मागणी पूर्ण पुणेः केंद्र सरकारने सादर केलेल्या शेती आणि पणन...
गुणवत्तापूर्ण हळद, डाळींची थेट...सनपुरी (जि. परभणी) येथील प्रयोगशील शेतकरी नरेश...
मराठवाड्यात जोरदार पावसाचा पिकांना फटकाऔरंगाबाद, परभणी : औरंगाबाद, जालना, बीड, लातूर,...
हजारो टन कांदा निर्यातीच्या प्रतीक्षेतमुंबई/नाशिक : देशभरात कांदा निर्यातबंदी...
बीटी वांग्याच्या दुसऱ्या टप्प्यातील...पुणे : देशभरात चर्चेत असलेल्या बीटी वांग्याच्या...
साखर निर्यातीचे करार ५७ लाख टनांवरकोल्हापूर : देशातल्या साखर निर्यातीचे करार आता ५७...
तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यतापुणे ः बंगालचा उपसागर व उत्तर तामिळनाडूच्या...
दूध सल्लागार समिती कागदावरचपुणे : राज्यस्तरीय दूध सल्लागार समितीची एकही बैठक...
राज्यात मोसंबी १००० ते ४००० रुपये...औरंगाबादमध्ये १००० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल...
कांदा, लसूण शेतीत बहिरवाडीने मिळवली...बहिरवाडी (ता. जि. नगर) हे छोटे गाव कांदा व लसूण...
स्पर्धेत टिकण्यासाठी ‘ई-नाम’केंद्र सरकारने कृषी, पणन व्यवस्थेत सुधारणा घडवून...
बाजार सुधारणांत नको राजकीय धुळवडकोरोनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या संसद...