पुणे जिल्ह्यात ८८ हजार हेक्टरवर ऊस लागवड

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  ः यंदा उशिरा झालेल्या पावसामुळे ऊस लागवड क्षेत्रात गतवर्षीच्या तुलनेत काही प्रमाणात वाढ झाली आहे. जिल्ह्यात सरासरी ८८ हजार १२५ हेक्टरवर म्हणजेच ६८ टक्के क्षेत्रावर ऊस लागवडी झाल्या आहेत. सरासरी क्षेत्राच्या तुलनेत विचार केल्यास यंदा लागवड क्षेत्रात ४२ हजार ५०६ हेक्टरने घट झाली असल्याचे दिसून येते.

जिल्ह्यात आडसाली, सुरू, पूर्वहंगामी, खोडवा उसाचे सरासरी लागवड क्षेत्र एक लाख ३० हजार ६३० हेक्टर आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ५० हजार  हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रावर ऊस लागवडी झाल्या होत्या. यंदा गेल्या वर्षीची तुलना केल्यास लागवड क्षेत्रात चांगली वाढ झाली आहे.

जिल्ह्यात जुन्नर, आंबेगाव, बारामती, दौंड, इंदापूर, शिरूर हे तालुके उसाचे आगार म्हणून ओळखले जातात. या तालुक्यातील शेतकरी दरवर्षी आडसाली, पूर्व हंगामी, सुरू उसाच्या लागवडी करून उत्पादन घेतात. काही शेतकरी खोडव्याचेही उत्पादन घेतात. यंदा कमी पावसाचा आडसाली उसाच्या लागवडीवर मोठा परिणाम झाला.

पाणीटंचाईमुळे गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्याच्या पूर्व व उत्तर भागात ऊस लागवडी ठप्प आहेत. अनेक शेतकरी ऊस गाळप झाल्यानंतर खोडवा ठेवत आहेत. जवळपास ८८ हजार १२५ हेक्टरवर उसाचे क्षेत्र पोचले आहे. येत्या उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण झाल्यास उसाच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता आहे.  

तालुकानिहाय उसाचे क्षेत्र (हेक्टर)
तालुका सरासरी क्षेत्र ऊस लागवडीचे क्षेत्र
हवेली  ९६०० ७०६९
मुळशी   १८२०  ८३९
भोर १४३० ७४५
मावळ  १५७०  ४८
वेल्हे  २१० -
जुन्नर   ९६५० ३४१०
खेड  २९३० -
आंबेगाव  ३८३० ३९८
शिरूर  १८,५७० ३०,०८४
बारामती १६१२० ३५३८
इंदापूर ३१,२०० २०,३७३
दौंड  ३१,२६० १२,८८०
पुरंदर   २४६० ८७४१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com