टाळेबंदीबाबत ३ मेनंतर परिस्थिती पाहून निर्णय : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

मुंबई : ३ मेनंतर राज्यातील टाळेबंदीबाबत त्या त्या भागातील परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल. आज (सोमवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये देखील यादृष्टीने चर्चा होईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. सर्वधर्मियांनी देशाप्रती कर्तव्य आणि माणुसकीची भावना दाखवून जो संयम पाळला तसाच तो यापुढे देखील पाळला तर कोरोनाविरुद्धचा लढा आपण निश्चित जिंकू, असा विश्वास श्री. ठाकरे यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

मुंबई  : ३ मेनंतर राज्यातील टाळेबंदीबाबत त्या त्या भागातील परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल. आज (सोमवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये देखील यादृष्टीने चर्चा होईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. सर्वधर्मियांनी देशाप्रती कर्तव्य आणि माणुसकीची भावना दाखवून जो संयम पाळला तसाच तो यापुढे देखील पाळला तर कोरोनाविरुद्धचा लढा आपण निश्चित जिंकू, असा विश्वास श्री. ठाकरे यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्र्यांनी रविवारी (ता.२६) दुपारी जनतेशी संवाद साधला.  यावेळी ते म्हणाले, की कोरोनाचा  प्रादुर्भाव  नसलेल्या  भागात  २०  एप्रिलनंतर  शासनाने  काही  व्यवहार  सुरु  करण्याला  अटी  आणि  शर्तीच्या  आधीन  राहून  मान्यता  दिली  आहे.  राज्यात  शेतीची कामे,  शेतीमाल  तसेच  जीवनावश्यक  वस्तूंची  वाहतूक  सुरु  आहे. कापूस  खरेदी  केंद्रे  सुरु  करण्यात  आली  आहेत.  फळे वाहतूक  सुरु  आहे.  ग्राहकांना फळे  घरपोच  देण्याचा  प्रयत्न  आपण  करत  आहोत. महाराष्ट्रात जिल्ह्यांच्या सीमा बंद  आहेत.  त्या  उघडणार  नाहीत  पण  काही  जिल्ह्यांमधील  परिस्थितीचा अभ्यास  करून  तिथे  ३  मे नंतर  काही  मोकळीक  देता  येईल  का याचा  निर्णय  नंतर  घेण्यात  येईल.

केंद्रीय  मंत्री  नितीन  गडकरी  यांनी  कोणतेही  राजकारण  न  करता  महाराष्ट्राच्या  पाठीशी खंबीरपणे  उभे  राहण्याचे  आवाहन  केले  होते. त्याबद्दल  मुख्यमंत्र्यांनी  श्री. गडकरी  यांना  धन्यवाद  दिले.  इतर  राज्यातील  कामगार-मजूर महाराष्ट्रात  अडकले आहेत.  लॉकडाउनमुळे  रेल्वे  सुरु  होणार नसल्या  तरी  केंद्र  शासनाच्या  मार्गदर्शनानंतर  आणि  मान्यतेनंतर  त्यांना  त्यांच्या  घरी सुखरुप पाठवण्याची  व्यवस्था  केली  जाईल असा  पुनरुच्चारही  मुख्यमंत्र्यांनी  केला.  

केंद्रीय  पथक  आठवडाभरापासून  राज्यात असून त्यांना त्रयस्थपणे  निरिक्षण  करण्याचे  तसेच उणिवा असल्यास  त्या  सांगण्याचे  आवाहन  आपण  केले  आहे.  त्यांच्या  सूचनांचे  पालन  करण्याच्या  सूचनाही  आपण  प्रशासनाला  दिल्या  आहेत असे  श्री. ठाकरे म्हणाले.  परिस्थिती  कधी  बदलणार,  लॉकडाउन  कधी  संपणार  अशी  विचारणा  होत  आहे  पण  लॉकडाउनमुळेच  आपण  विषाणुच्या  गुणाकाराचा  वेग  रोखण्यात  यशस्वी  झालो  आहोत,  रुग्णांची  वाढ  आपण  नियंत्रणात  ठेवली  आहे , अशी  माहिती ही  मुख्यमंत्र्यांनी  दिली. 

महाराष्ट्रात  आतापर्यंत  १  लाख  ८  हजार  ९७२ चाचण्या  करण्यात  आल्या . त्यापैकी १  लाख १हजार १६२ लोकांचे  कोरोना  नमुने  निगेटिव्ह  आले.  ३२३  जणांचा  दुर्देवाने  मृत्यू  झाला आहे.  राज्यात  प्लाझ्मा  थेरपीला  परवानगी  मिळाल्याचे  त्यांनी सांगितले. 

मुख्यमंत्र्यांनी  टाटा, रिलायन्स,  विप्रो,  महिंद्रा ॲण्ड  महिंद्रा,  बिर्ला  या  आणि यासारख्या  मोठ्या उद्योजकांनी   राज्याला  खूप  मदत  केल्याचा आवर्जून  उल्लेख केला  व  त्या सर्वांना  धन्यवाद दिले. राज्यातील  काही विद्यार्थी  राजस्थान  येथील कोट्यात  अडकले  आहेत. त्यांना ही  आणण्याची  व्यवस्था  करण्यात  येत असल्याची  माहिती  मुख्यमंत्र्यांनी  दिली.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com