नागपूर जिल्ह्यात १३ टक्के पीककर्ज वितरित

सध्या पीककर्ज वितरणाला अपेक्षित गती नाही. दस्तऐवज हाताळण्याबाबतही अनेक ठिकाणी भिती असल्याने ही स्थिती असावी. काही ठिकाणी दस्तऐवजांच्या मागणीवरून देखील गोंधळ आहे. - अजय कडू, जिल्हा निबंधक, सहकार विभाग, नागपूर.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नागपूर  ः माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा गृहजिल्हा असलेल्या नागपुरात पीककर्ज वितरणात बॅंका पिछाडीवर आहेत. खरीप हंगामासाठी लागणाऱ्या निविष्ठा खरेदीची तयारी शेतकऱ्यांनी सुरु केली आहे. मात्र बॅंकांकडून मे अखेरपर्यंत केवळ १३ टक्‍केच पीककर्ज वितरण झाले आहे.  

जिल्ह्यात २०१९-२० या वर्षात खरिपासाठी १ हजार ८७ कोटी रुपयांच्या पीककर्ज वितरणाचे उद्दिष्ट होते. त्यातील ६६१ कोटी म्हणजे ६१ टक्‍के कर्जाचे वितरण गेल्या हंगामात झाल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. गेली अनेक वर्षे जिल्हा बॅंक अडचणीत असल्याने या बॅंकेकडून पीककर्ज वाटप होत नव्हते.

शासनाने मदतीचा हात दिल्यानंतर जिल्हा बॅंकेचे पुर्नरुज्जीवन झाले. त्यानंतर बॅंकेने गेल्या हंगामात ३८ कोटी रुपयांचे पीककर्ज वितरित केले. यावर्षी जिल्ह्याला १०३५ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. यापैकी केवळ १२० कोटी रुपयांचे वितरण मेअखेरपर्यंत झाले असून कर्ज वितरणाची टक्‍केवारी १३ असल्याचे सांगण्यात आले. त्यावरुन नागपूर जिल्ह्यात पीककर्ज वाटपाची गती संथ असल्याचे स्पष्ट होत आहे. 

सध्या नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचाच बॅंकांकडून पीककर्जासाठी विचार केला जात आहे. त्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या समस्या पिककर्जा अभावी वाढणार आहेत. खरीप हंगामाची लगबग वाढली असून त्याकरिता लागणाऱ्या पैशाची सोय कशी करावी, अशी विवंचना शेतकऱ्यांना असल्याचे कन्हान येथील शेतकरी संजय सत्येकार यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com