Farmer Agricultural News thirty five complaints regarding soybean seeds in Satara Maharashtra | Agrowon

सोयाबीन बियाण्यांबाबत साताऱ्यात ३५ तक्रारी 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 30 जून 2020

सोयाबीन बियाण्यांची उगवण झाली नसल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे आल्या आहेत. अजून शेतकऱ्यांच्या तक्रारी असतील, तर त्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क करावा. सोयाबीन बियाणे खरेदी करताना त्याची पक्की पावती घ्यावी. पक्की पावती, पिशवी व टॅग जपून ठेवावा. 
- विजय राऊत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सातारा.

सातारा  : खरिपातील सोयाबीन बियाण्यांची उगवण न झाल्यामुळे सातारा जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत आले आहेत. जिल्ह्यात याबाबत ३५ शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. दिवसेंदिवस तक्रारींची संख्या वाढत असून, निकृष्ट बियाणे देणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. 

जिल्ह्यात महाबळेश्वर तालुक्याचा अपवाद वगळता इतर सर्व तालुक्यांत सोयाबीन पीक घेतले जाते. सातारा, पाटण, कराड, वाई, कोरेगाव, खटाव या तालुक्यांमध्ये सोयाबीनचे क्षेत्र सर्वाधिक आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे १ जूनच्यादरम्यान दुष्काळग्रस्त तालुक्यांसह अनेक ठिकाणी दमदार पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांनी जूनच्या पहिल्या सप्ताहापासून पेरणीची कामे सुरू केली. या पेरणी क्षेत्रात सोयाबीन, बाजरी, ज्वारी या पिकांचा समावेश आहे. मात्र अनेक ठिकाणी सोयाबीन बियाण्यांची उगवण झाली नसल्याचे दिसून आले. उपलब्ध झालेल्या बियाण्यांमध्ये काही प्रमाणात निकृष्ट बियाणे आल्याचे बोलले जाते.

याबाबत कृषी विभागाकडे ३५ शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या आहेत. सोयाबीनचे पेरणी क्षेत्र मोठे असल्याने बियाणे उगवण न झालेल्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात खरिपात १७ हजार क्विंटल सोयाबीन बियाण्यांची मागणी करण्यात आली होती. यापैकी १६ हजार ५७२ क्विंटल बियाणे उपलब्ध झाले. यातील १४ हजार ८७३ क्विंटल सोयाबीन बियाण्यांची विक्री झाली. सध्या ६६.५१ टक्के क्षेत्रावर पेरण्यांची कामे पूर्ण झाली आहेत. जिल्ह्यात बियाणे खरेदीचा विचार करता, उर्वरित ३४ टक्क्यांपेक्षा जास्त क्षेत्रावर सोयाबीन लागवडीची शक्यता आहे. यामुळे लागवडीनंतरच निकृष्ट बियाणे किती होते, याचा अंदाज येणार आहे. मात्र यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.
 
दुबार पेरणीचे संकट
खरिपातील सोयाबीन हे दसरा व दिवाळी सणाच्या दृष्टीने फायदेशीर ठरते. मात्र यंदा उगवण न झालेल्या सोयाबीनच्या क्षेत्रात दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. या शेतकऱ्यांना त्वरित मदतीच्या दृष्टीने दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. यातून शेतकऱ्यांना दुबार पेरणी करणे शक्य होणार आहे. पहिल्या पेरणीचा खर्च वाया जाणार असला, तरी किमान उत्पादन मिळणे शक्य होणार आहे.
 

 


इतर ताज्या घडामोडी
कोल्हापूर बाजार समिती नोकर भरतीविरोधात...कोल्हापूर: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
नगर : मक्‍याला हमीभावापेक्षा कमी दर...नगर ः रब्बी हंगामामध्ये शासनाच्या किमान आधारभूत...
सातारा जिल्ह्यात खरिपाच्या ८२.८५ टक्के...सातारा  ः पावसाचा काहीसा जोर वाढल्याने...
पुणे बाजार समितीसह उपबाजार ...पुणे  ः ‘कोरोना’च्या फैलावामुळे शहरातील...
नगर जिल्ह्यात एक लाख १७ हजार हेक्टरवर...नगर  ः जिल्ह्यात यंदा जुलैच्या पहिल्याच...
अमरावतीत बियाणे कंपनीकडून ९०१ बॅग, २२...अमरावती : जिल्ह्यात सोयाबीन बियाणे उगवणीबाबत १...
कोविड-१९ रुग्णांच्या वास, चव संवेदनांवर...कोविड १९ च्या आजारातून बरे झाल्यानंतरही सुमारे ९०...
खानदेशात दुबार पेरणीसाठी ताग, बाजरी,...जळगाव  ः खानदेशात दुबार पेरणी आटोपली आहे....
जळगावमधील सिंचन प्रकल्पांची कामे...जळगाव  ः जिल्ह्यात तापी व गिरणा नदीवर...
निकृष्ट बियाणेप्रकरणी सर्व कंपन्यांवर...नगर: जिल्ह्यात गेल्या एक महिन्याच्या कालावधीत...
बॅंकांनी पीककर्ज प्रकरणे तत्काळ मार्गी...वर्धा  ः जिल्ह्यात पात्र शेतकऱ्यांपैकी एकही...
गोंदिया जिल्ह्यात युरियाची टंचाईगोंदिया  ः पावसामुळे धान रोवणीला वेग आल्याने...
औरंगाबाद जिल्ह्यात खतांचा पुरवठा सुरळीत...औरंगाबाद : जिल्ह्यात ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर...
अकोल्यात तूर सरासरी ५८०० रुपये क्विंटलअकोला  ः  येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्ह्यातील तीन केंद्रांवर २०२३...सांगली  ः जिल्ह्यात हमीभावाने मका खरेदीसाठी...
रत्नागिरी जिल्ह्यात भात, नाचणी पिकासाठी...रत्नागिरी  : रत्नागिरी जिल्ह्यात भात, नाचणी...
आरोग्यदायी दालचिनीमसाल्यांच्या पदार्थांत, घरात मसाला करताना...
कोकण, कोल्हापूर पट्ट्यात मुसळधार...कोकण व कोल्हापूर भागावर १००२ तर महाराष्ट्रावर...
कोल्हापुरात दिड हजार, खते, बियाणे...कोल्हापूर  : बियाण्यांच्या उगवणीप्रश्नी...
सांगली जिल्ह्यात दोन लाख १९ हजार हेक्‍...सांगली : जिल्ह्यात पावसांचा खंड असला तरी  ...