कोरोनामुळे हिवरे बाजार, राळेगणसिद्धीत पर्यटकांना भेट देण्यास बंदी 

कोरोनामुळे हिवरे बाजार, राळेगणसिद्धीत पर्यटकांना भेट देण्यास बंदी 
कोरोनामुळे हिवरे बाजार, राळेगणसिद्धीत पर्यटकांना भेट देण्यास बंदी 

नगर  : आदर्श गाव राळेगणसिद्धी (ता. पारनेर) व हिवरे बाजार (ता. नगर) येथे पुढील काही दिवस पर्यटकांना भेट देण्याला बंदी घातली आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गावांनी तसा निर्णय घेतला आहे. 

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यामुळे राळेगणसिद्धी व पद्मश्री पोपटराव पवार यांच्यामुळे हिवरे बाजार गावाची देशभरात ओळख आहे. श्री. हजारे सध्या राळेगण सिद्धीतच मुक्कामी असून मौन व्रत सुरू आहे. राळेगणसिद्धी व हिवरे बाजार या गावांनी लोकसहभागातून जलसंधारणासह अनेक आदर्श उपक्रम राबवले जात आहेत. त्यामुळे या दोन्ही गावांत दररोज शेकडो पर्यटक, आदर्श कामे करण्याचा प्रयत्न करणारे विविध ग्रामपंचायतीचे लोक, अधिकारी, पदाधिकारी, भेट देऊन येथील कामांची पाहणी करतात. अगदी देश, परदेशातूनही लोक येथे येत आहेत.

श्री. हजारे भेटण्यासाठी राजकीय लोकांचीही सतत वर्दळ असते. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून कोरोना विषाणूचा धुमाकूळ सुरू असून नगर येथे रुग्ण आढळला आहे. त्यामुळे या आजाराचा धोका नको म्हणून राळेगणसिद्धी व हिवरे बाजार या गावांनी खबरदारी घेत गावांत बाहेरून येणाऱ्या लोकांना काही दिवस बंदी घातली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com