नगर जिल्हा परिषदेचे २५ हजार कर्मचारी ‘फिल्ड’वर

नगर ः कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाने पावले टाकत त्याला अटकाव करण्यात काही प्रमाणात यश मिळवले आहे. यासाठी आरोग्य, पोलिस व महसूल प्रशासनाच्या बरोबरीने जिल्हा परिषदेचे सुमारे २५ हजार कर्मचारी फिल्डवर काम करीत आहेत.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर  ः कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाने पावले टाकत त्याला अटकाव करण्यात काही प्रमाणात यश मिळवले आहे. यासाठी आरोग्य, पोलिस व महसूल प्रशासनाच्या बरोबरीने जिल्हा परिषदेचे सुमारे २५ हजार कर्मचारी फिल्डवर काम करीत आहेत.

कोरोना विषाणू रोखण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली जानेवारी महिन्यापासूनच उपाययोजना आखण्यात आल्या होत्या. मार्च महिन्यात पहिला रुग्ण सापडल्यानंतर जिल्ह्यातील सर्वच यंत्रणा सतर्क होऊन वेगाने कामाला लागली. यामध्ये जिल्हा परिषद आस्थापनेतील ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा, आरोग्य विभाग, गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी यांच्यासह पंचायत समिती व जिल्हा परिषदेतील विविध विभागांतील इतर कर्मचारी सहभागी झाले आहेत. सुमारे २५ हजार कर्मचारी रात्रंदिवस काम करीत आहेत. राज्यात संचारबंदी लागू केली असून त्याच जोडीला केंद्राने लॉकडाउन केल्याने शहरातून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर नागरिक आल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून सुमारे दीड लाख लोकांच्या हातावर होम क्वारंटाइनचे शिक्के मारले. हे शिक्के मारण्यासाठी ग्रामपंचायत, अंगणवाडी,आशा आदी विभागातील कर्मचाऱ्यांनी जबाबदारी पार पाडली. या सर्वांनीच पुन्हा गावात स्वच्छता संदेश देत जनजागृती करून यंत्रणेला सहकार्य केले. याबरोबरच बाहेरून आलेल्या नागरिकांची शाळा, मंगल कार्यालये आदी ठिकाणी जेवण आणि राहण्याची व्यवस्था ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांनी केली.

 असे आहेत कर्मचारी गटविकास अधिकारी १४ ः विस्तार अधिकारी ः ३७, ग्रामसेवक ः ८२९, ग्रामविकास अधिकारी ः २१७, त्यांचे सहाय्यक ः ४८३१, ग्रामपंचायत कर्मचारी ः ३९३३, आपले सरकार कर्मचारी ः ८९८, अंगणवाडी सेविका ः ५२९१, अंगणवाडी सेविका मदतनीस ः ४३९७, आशा ः ३१८३, तालुका आरोग्याधिकारी ः १४, जिल्हा आरोग्याधिकारी ः एक, अतिरिक्त जिल्हा आरोग्याधिकारी ः एक, साथरोग वैद्यकीय अधिकारी ः एक, आरोग्यसेविका महिला ः ५००, आरोग्य सेवक ः २५०, सफाई कामगार ः ४२, औषधनिर्माण अधिकारी ः ८४, आरोग्य सहायक पुरुष ः १२२, आरोग्य सहायक महिला ः ९०, आरोग्य पर्यवेक्षक ः १२, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी ः ११, कुष्ठरोग तंत्रज्ञ ः एक, वैद्यकीय अधिकारी गट अ/ब ः २०६, यांच्यासह पाणी पुरवठा व अन्य विभागांतील कर्मचारी काम करत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com