Farmer Agricultural News twenty one clusters for Pest and residue free agricultural products Pune Maharashtra | Agrowon

कीड- अवशेषमुक्त शेतीमाल निर्यातीसाठी २१ क्लस्टर

गणेश कोरे
बुधवार, 1 जुलै 2020

इंटरनॅशनल स्टॅंडर्ड फॉर फायटोसॅनेटरी मेजर ४ आणि ६ च्या निकषांनुसार जगभरातून आता रसायन अवशेष आणि कीडमुक्त शेतीमाल क्षेत्राच्या प्रमाणपत्राच्या मागणीची अट घालण्यात येऊ लागली आहे. भविष्याचा विचार करुन शेतीमालाच्या निर्यातवाढीसाठी अशा प्रमाणीत शेतमाल उत्पादनाची क्षेत्रे निश्‍चित करणे गरजेचे झाले आहे. त्यानुसारचा कृती आराखडा करण्याचे काम सुरू असून, यामध्ये शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन, या क्षेत्राचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यानंतर हा अहवाल केंद्राला पाठविण्यात येणार आहे. केंद्र सरकार रसायन अवशेष आणि कीडमुक्त शेतमाल उत्पादनाची क्षेत्रे जाहीर करणार आहे. यासाठी राज्यात २१ क्लस्टर प्रस्तावित करण्यात आले आहेत.
- गोविंद हांडे, राज्यस्तरीय सल्लागार (निर्यात), राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य

पुणे : भारतीय शेतीमालास जगभरातून मागणी असताना, आयातदार देशांकडून संबंधित शेतकऱ्यांचे केवळ पीकच नाही; तर त्या परिसरातील भौगौलिक क्षेत्र, रसायन अवशेष आणि कीडमुक्त घोषित आणि प्रमाणित करण्याची मागणी होऊ लागली आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्यात फळे, भाजीपाला पिकांची २१ क्लस्टर उभारण्यात येत असून, यामध्ये केंद्र सरकारच्या ६; तर राज्य पणन मंडळाच्या १५ अशा एकूण २१ क्लस्टरच्या प्रस्तावांची शिफारस राज्य सरकारने केंद्राला केली आहे. 

केंद्र सरकार देशाचे शेतीमाल निर्यात धोरण आखत असून, विविध राज्यांचे देखील स्वतंत्र निर्यात धोरण आखण्यात यावे, असे निर्देश केंद्राने राज्यांना दिले आहेत. महाराष्ट्राचे निर्यात धोरण राज्य पणन मंडळाद्वारे केले जात असून, यासाठी विविध पातळ्यांवर काम सुरू आहे. 

याबाबत पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार म्हणाले, की देशातून आणि महाराष्ट्रातून निर्यात होणाऱ्या शेतीमालाबाबत विविध देशांनी शेतकऱ्यांना शेतीमाल प्रमाणिकरणासाठी विविध प्रमाणपत्रे बंधनकारक केली आहेत. ही प्रमाणपत्रे केवळ त्या शेतीक्षेत्रापुरती असतात. मात्र आता आयातदार देशांकडून संबंधित पिकासाठीचे भौगोलिक क्षेत्र रसायन अवशेष आणि कीडमुक्त असावेत अशा प्रमाणपत्रांची मागणी होऊ लागली आहे. भविष्यात आयातदार देशांकडून फळे, भाजीपाल्याची वाढणारी मागणी आणि त्या तुलनेत शेतीमाल उत्पादनासाठी केंद्र सरकारनेदेखील शेतीमालनिहाय क्लस्टर निर्माण करण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्र सरकारने ६ क्लस्टर प्रस्तावित केले आहेत.

राज्याने त्यामध्ये भर घालत महाराष्ट्रातील कृषी हवामान क्षेत्रनिहाय विविध पिकांसाठी १५ आणखी क्लस्टरची मागणी केली आहे. यामध्ये संत्रा, सीताफळ, कांदा, मिरची आदी पिकांचे क्लस्टर प्रस्तावित केले आहे.  यासाठीची नियमावली अमेरिकेच्या अन्न व कृषी संघटना आणि इंटरनॅशनल प्लांट प्रोटेक्शन कन्व्हेनशनच्या वतीने पाठविण्यात आली आहे. यांच्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे राज्यात रसायन अवशेषमुक्त आणि निर्यातक्षम फळे, भाजीपाला उत्पादन क्लस्टर प्रस्तावित करण्यात आले आहेत, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

जुन्नर तालुक्यात भाजीपाला क्लस्टरची मागणी 
 पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातून मुंबई, ठाणे या महानगरांना मोठ्या प्रमाणावर भाजीपाला पुरवठा केला जातो. काही प्रमाणात भाजीपाला निर्यातदेखील होतो. या भागातून भाजीपाला निर्यातीला प्रोत्साहन मिळण्यासाठी तळेगाव दाभाडे येथील फ्लोरिकल्चर पार्कच्या धर्तीवर रसायन अवशेषमुक्त भाजीपाला उत्पादन आणि निर्यात क्लस्टरची उभारणी नेदरलॅंड, इस्त्राईल सरकारच्या तांत्रिक सहकार्याने करण्यात यावी अशी मागणी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राज्य सरकारकडे केली आहे. 
 
पीकनिहाय क्लस्टर

 • केळी ः जळगाव, धुळे नंदुरबार- सबक्लस्टर- कोल्हापूर, सोलापूर, पुणे, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, बुलडाणा, वर्धा.
 • डाळिंब ः नाशिक, नगर, पुणे, सोलापूर, सांगली, लातूर, उस्मानाबाद, सबक्लस्टर- वाशीम, बुलडाणा.
 • हापूस आंबा ः रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड .
 • केसर आंबा ः औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, नगर, नाशिक.
 • संत्रा ः नागपूर, अमरावती, वर्धा, अकोला, बुलडाणा, वाशीम.
 • द्राक्ष ः नाशिक, नगर, पुणे, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद. 
 • कांदा ः धुळे, नाशिक, जळगाव, नगर, पुणे, सातारा, सोलापूर.
 • काजू ः कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर. 
 • फुले ः पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक.
 • बेदाणा ः सांगली, नाशिक.
 • भाजीपाला ः जळगाव, नाशिक, पुणे, नगर, ठाणे, पालघर, नागपूर. 
 • बिगर बासमती तांदूळ ः नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, पालघर ठाणे, रायगड, पुणे. 
 • डाळी ः धुळे, जळगाव, नगर, पुणे. सबक्लस्टर- औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, नांदेड, परभणी, उस्मानाबाद, अमरावती, अकोला, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर. 
 • कडधान्ये ः जळगाव, नाशिक, औरंगाबाद, बीड, नगर, पुणे, सातारा, सांगली सोलापूर, गोंदिया नागपूर. 
 • तेलबिया ः बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, सबक्लस्टर- नाशिक, जळगाव, सातारा, सांगली, कोल्हापूर, जालना, बीड, लातूर नांदेड, परभणी, हिंगोली. 
 • गूळ ः कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, लातूर 
 • मसाले (लाल मिरची) ः नागपूर, बुलढाणा, नंदुरबार 
 • मसाले (हळद) ः सांगली, सातारा, वर्धा, वाशिम, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी 
 • दुग्धजन्य पदार्थ ः पुणे, नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर 
 • मत्स्य ः ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग 
 • मांसजन्य ः जळगाव, नगर, नाशिक, पुणे, सोलापूर, यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, बुलडाणा, नागपूर, नांदेड, औरंगाबाद 

 


इतर अॅग्रो विशेष
संगमनेर तालुका संघाकडून ५० टक्के...नगर: संगमनेर तालुका सहकारी दूध संघाने दूध...
उगाव येथे सामूहिक पातळीवर दशपर्णी अर्क...नाशिक: निफाड तालुक्यातील उगाव येथील श्री. श्री....
किसान क्रेडिट कार्डवर बिनव्याजी कर्ज...नाशिक: शेतकऱ्यांना शेतीकामासाठी आर्थिक मदत करणे...
दुधाला दर नसल्याने, दुभती जनावरे ...सोलापूर ः दुधाला मागणी असूनही केवळ योग्य तो दर...
मराठा समाजाला विश्वासात घेणार : अशोक...मुंबई : मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईत राज्य...
पुण्यात शेतमाल पुरवठा देखील बंद पुणे: कोरोनाची उफाळून आलेली साथ रोखण्यासाठी...
देशाच्या सूत निर्यातीत मोठी घट जळगाव ः कोरोना व इतर संकटांमध्ये देशातील सूत...
मराठवाड्यात २६ टक्के पीककर्ज वितरणऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा राज्यात बंद...औरंगाबाद: कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या...
राज्यात पावसाला पोषक हवामानपुणे : राज्यात पावसाला पोषक हवामान होत असल्याने...
जलसंधारण,शिक्षण अन् कृषी विकासाचा रचला...सुदृढ, आत्मनिर्भर समाज घडविणे या उद्देशातून जळका...
दुग्ध व्यवसाय ठरतोय शेतीला आधारपनवेल येथील बांधकाम व्यावसायिक अनिल लक्ष्मण...
कृषी आयुक्त दिवसेंची बदली, गायकवाड...मुंबई : राज्य सरकारने शनिवारी महत्त्वपूर्ण...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांना आरोपी नव्हे...पुणे : राज्यात खते, बियाणे, कीटकनाशकांची विक्री...
आनंदाची पातळी बदलतेय उत्पन्नांनुसारआजच्या जगामध्ये सामाजिक आर्थिक निकषांमध्ये वेगाने...
शेती क्षेत्रातील बदल टप्याटप्याने...नागपूर ः शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत कृषी...
राज्यात कृषी सेवा केंद्रांचा बंद सुरूपुणेः सोयाबीन बियाणे न उगवल्या प्रकरणी...
औरंगाबाद जिल्ह्यातील थेट शेतमाल विक्री...औरंगाबाद : कोरोना संकटामुळे शेतकरी ते ग्राहक...
रुतलेले अर्थचक्राने विकासालाही ‘ब्रेक’''मूडी'' या पतमानांकन संस्थेने अलीकडेच आपला अहवाल...
बेलखेडा होणार संत्रा उत्पादक गावरिसोड, जि. वाशीम ः तालुक्यातील दोन हजार लोकसंख्या...