Farmer Agricultural News twenty one percent rainfall in Khandesh Maharashtra | Agrowon

खानदेशात सरासरीच्या २१ टक्के पाऊस

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 30 जून 2020

जळगाव  ः खानदेशात पावसाचे प्रमाण कमी अधिक आहे. परंतु काही भागात जोरदार पाऊस झाला असून, नाले, नद्यांना चांगले प्रवाही पाणी आले आहे. एकूण सरासरीच्या २१ टक्के पाऊस खानदेशात झाला आहे. 

जळगाव  ः खानदेशात पावसाचे प्रमाण कमी अधिक आहे. परंतु काही भागात जोरदार पाऊस झाला असून, नाले, नद्यांना चांगले प्रवाही पाणी आले आहे. एकूण सरासरीच्या २१ टक्के पाऊस खानदेशात झाला आहे. 

जळगाव जिल्ह्यात जूनमधील एकूण सरासरीच्या ७० टक्के पाऊस झाला आहे. तर धुळ्यातही जूनमधील सरासरीच्या ६५ टक्‍क्‍यांवर पाऊस झाला आहे. धुळ्यात एकूण ९६५ मिलिमीटर, जळगावात ७६५ मिलिमीटर आणि नंदुरबारात सुमारे ११०० मिलिमीटर पाऊस पडतो. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात खानदेशात अपवाद वगळता सर्वत्र पाऊस झाला. पेरणी वेगात सुरू झाली. परंतु १४ ते २४ जून असा १० दिवस पावसाचा खंड होता. रोज ऊन तापत होते. उष्णतेत पिकांचे कोवळे कोंब होरपळत होते. परंतु अनेक भागात २५ व २६ जून रोजी पावसाने  हजेरी लावली.

खानदेशात धुळ्यातील साक्री, शिंदखेडा, धुळे, शिरपूर येथे बऱ्यापैकी पाऊस झाला आहे. तर जळगाव जिल्ह्यात पारोळा, एरंडोल, जळगाव, धरणगाव, चोपडा, पाचोरा भागात पाऊस बऱ्यापैकी आहे. रावेर, यावल, बोदवड, चाळीसगाव भागात पाऊस कमी आहे. पारोळा तालुक्‍यात अनेक भागात जोरदार पावसामुळे शिवारातील नाले वाहू लागले आहेत. पिकांना चांगले जीवदान मिळाले आहे.
 
पेरणीला पुन्हा आला वेग
खानदेशात मागील तीन-चार दिवसांत कमी अधिक पाऊस झाला आहे. अनेक भागात ४० मिलिमीटरर्पंत पाऊस झाल्याने पेरणी सुरू झाली आहे. खानदेशात २५ जूनपर्यंत सुमारे ४२ टक्के क्षेत्रात पेरणी पूर्ण झाली होती. ही पेरणी मागील तीन दिवसांत सुमारे ५५ टक्‍क्‍यांपर्यंत पोचली आहे. कोरडवाहू कापूस, कडधान्य, सोयाबीन, बाजरी यांची पेरणी शेतकरी करीत आहेत.


इतर ताज्या घडामोडी
कोल्हापूर बाजार समिती नोकर भरतीविरोधात...कोल्हापूर: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
नगर : मक्‍याला हमीभावापेक्षा कमी दर...नगर ः रब्बी हंगामामध्ये शासनाच्या किमान आधारभूत...
सातारा जिल्ह्यात खरिपाच्या ८२.८५ टक्के...सातारा  ः पावसाचा काहीसा जोर वाढल्याने...
पुणे बाजार समितीसह उपबाजार ...पुणे  ः ‘कोरोना’च्या फैलावामुळे शहरातील...
नगर जिल्ह्यात एक लाख १७ हजार हेक्टरवर...नगर  ः जिल्ह्यात यंदा जुलैच्या पहिल्याच...
अमरावतीत बियाणे कंपनीकडून ९०१ बॅग, २२...अमरावती : जिल्ह्यात सोयाबीन बियाणे उगवणीबाबत १...
कोविड-१९ रुग्णांच्या वास, चव संवेदनांवर...कोविड १९ च्या आजारातून बरे झाल्यानंतरही सुमारे ९०...
खानदेशात दुबार पेरणीसाठी ताग, बाजरी,...जळगाव  ः खानदेशात दुबार पेरणी आटोपली आहे....
जळगावमधील सिंचन प्रकल्पांची कामे...जळगाव  ः जिल्ह्यात तापी व गिरणा नदीवर...
निकृष्ट बियाणेप्रकरणी सर्व कंपन्यांवर...नगर: जिल्ह्यात गेल्या एक महिन्याच्या कालावधीत...
बॅंकांनी पीककर्ज प्रकरणे तत्काळ मार्गी...वर्धा  ः जिल्ह्यात पात्र शेतकऱ्यांपैकी एकही...
गोंदिया जिल्ह्यात युरियाची टंचाईगोंदिया  ः पावसामुळे धान रोवणीला वेग आल्याने...
औरंगाबाद जिल्ह्यात खतांचा पुरवठा सुरळीत...औरंगाबाद : जिल्ह्यात ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर...
अकोल्यात तूर सरासरी ५८०० रुपये क्विंटलअकोला  ः  येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्ह्यातील तीन केंद्रांवर २०२३...सांगली  ः जिल्ह्यात हमीभावाने मका खरेदीसाठी...
रत्नागिरी जिल्ह्यात भात, नाचणी पिकासाठी...रत्नागिरी  : रत्नागिरी जिल्ह्यात भात, नाचणी...
आरोग्यदायी दालचिनीमसाल्यांच्या पदार्थांत, घरात मसाला करताना...
कोकण, कोल्हापूर पट्ट्यात मुसळधार...कोकण व कोल्हापूर भागावर १००२ तर महाराष्ट्रावर...
कोल्हापुरात दिड हजार, खते, बियाणे...कोल्हापूर  : बियाण्यांच्या उगवणीप्रश्नी...
सांगली जिल्ह्यात दोन लाख १९ हजार हेक्‍...सांगली : जिल्ह्यात पावसांचा खंड असला तरी  ...