Farmer Agricultural News twenty three officers and employees of market committ take a voluntarily retirement Mumbai Maharashtra | Page 2 ||| Agrowon

मुंबई बाजार समितीतील २३ अधिकारी, कर्मचारी स्वेच्छानिवृत्त

टीम अॅग्रोवन
शनिवार, 30 मे 2020

मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने २३ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या स्वेच्छानिवृत्तीचे ठराव मंजूर केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. अधिकाऱ्यांच्या स्वेच्छानिवृत्तीमुळे समितीच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होणार असून अत्यावश्यक सेवांसाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचीही कमतरता भासणार आहे.

मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने २३ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या स्वेच्छानिवृत्तीचे ठराव मंजूर केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. अधिकाऱ्यांच्या स्वेच्छानिवृत्तीमुळे समितीच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होणार असून अत्यावश्यक सेवांसाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचीही कमतरता भासणार आहे.

देशात ‘कोरोना’चे रुग्ण सापडल्यापासून केंद्र आणि राज्य सरकारने आपत्कालीन स्थिती घोषित केली आहे. १३ मार्चपासून साथरोग कायदाही लागू झाला आहे. बाजार समितीत विविध कर्मचाऱ्यांना ‘कोरोना’च्या उपाययोजनांसंदर्भात जबाबदारी दिली आहे. शासन मार्केट सुरु करण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना करत आहे. सध्या बाजार समितीशी संबंधित रुग्णांची संख्या ५९० वर पोहोचली असून १० जणांचा मृत्यू झाला आहे.

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर टाळेबंदीनंतर अन्य कोणत्याही कामांना प्राधान्य न देता सर्वत्र ‘कोरोना’ नियंत्रणावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत अत्यावश्यक सेवा पुरवठा करणाऱ्या बाजार समिती कर्मचाऱ्यांना विविध जबाबदाऱ्या दिल्या असताना ‘कोरोना’च्या भीतीमुळे काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज दिला होता, यातील काहींनी नंतर अर्ज मागे घेतले तर काही नवीन अर्ज आले होते. यामध्ये सुरक्षा विभाग, अभियंता, प्रशासन, भाजीपाला मार्केट, फळ मार्केट भागातील काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

समिती आवारात पाच मार्केटमधील येणाऱ्या गाड्यांना सॅनिटाईझ करणे, कर्मचाऱ्यांची वैद्यकीय देखभाल करणे, आवक-जावकेवर नजर ठेवणे, यासाठी रात्रंदिवस काही अधिकारी व कर्मचारी काम पाहत आहेत. त्यामुळे ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काम करणाऱ्या या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे निवृत्तीसाठी ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अर्ज दिले त्यापैकी काही अधिकारी व कर्मचाऱ्यांबाबत विविध प्रकारच्या तक्रारी आहेत. या चौकशीच्या फेऱ्यातून वाचण्यासाठी त्यांनी निवृत्ती घेऊन पळ काढण्याचा प्रयत्न केला आहे, अशीही चर्चा आहे.

यासंदर्भात बाजार समितीचे प्रशासक आणि सचिव अनिल चव्हाण यांनी हा निर्णय प्रशासनाने घेतला असल्याचे सांगितले आहे. समिती प्रशासनाने २६ मे रोजी हा प्रस्ताव मंजूर केला आहे. राज्यासह देशावर ‘कोरोना’चे संकट आहे. या परिस्थितीमध्ये आपत्कालीन यंत्रणा दिवस रात्र झटत आहे. अशात बाजार समितीतील काही अधिकारी स्वेच्छानिवृत्ती घेऊन जबाबदारीतून पळ काढू पाहत असल्याचे दिसून येत आहे.


इतर बातम्या
सीईटीऐवजी गुणांद्वारे कृषी...अमरावती ः बारावीनंतर कृषी अभ्यासक्रमाला...
वीजबिले माफ न केल्यास कंपनीचे कार्यालय...बुलडाणा ः लॉकडाउनच्या काळातील तीन महिन्यांचे...
सत्तास्थापनेसाठी भाजपकडूनच विचारणा केली...मुंबई : सहा महिन्यांपूर्वी राज्यात सत्तास्थापन...
वऱ्हाडात दूधाचे दर स्थिरअकोला ः या भागातील दूध संघ डबघाईस आल्याने दूध...
वाशीम जिल्ह्यावर खरिपात पावसाची कृपावाशीम ः जिल्ह्यात यंदाच्या मोसमात आत्तापर्यंत...
वर्धा जिल्ह्यात दूध उत्पादकांना दराचा...नागपूर ः लॉकडाउनमुळे मागणी घटल्याचे सांगत खासगी...
नाशिकमध्ये कमी दूध दरामुळे उत्पादकांची...नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार...
वीज बिले माफ न केल्यास उद्रेक ः...नाशिक : लॉकडाऊन काळात वीज कंपन्यांनी घरगुती वीज...
एचटीबीटी कपाशीची शेतकऱ्यांकडून पाहणीअकोला ः शेतकऱ्यांना तंत्रज्ञान स्वातंत्र्य मिळावे...
दुर्मीळ निलमणी आमरीचे सातपुड्यात...जळगाव ः जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगा या अनेक...
दूध पावडरला प्रतिकिलो ५० रुपये अनुदान...इस्लामपूर, जि. सांगली ः कोरोना सारख्या साथीत...
भ्रष्टाचाराच्या चौकशीचे आदेश;तरीही चार...पुणे: पंतप्रधान पॅकेजमधून राबविण्यात आलेल्या...
अकोला जिल्ह्यात सोयाबीन उगवणशक्तीबाबत...अकोला ः  सोयाबीन पिकाची पेरणी जुलैच्या...
अन्नधान्य पिकांच्या योजनांसाठी २७ कोटीपुणे: राज्यातील अन्नधान्य पिकांच्या योजनांसाठी...
ग्लायफोसेट वापराच्या मसुद्याविरुद्ध दाद...पुणे: केंद्र सरकारने ग्लायफोसेट तणनाशकाच्या...
सोयाबीन बियाणे कंपन्यांवर राज्यात ४६...औरंगाबाद ः सोयाबीनच्या बोगस बियाण्यामुळे पिकाची...
दूध व्यवसाय झाला आतबट्ट्याचा; शेतकरी...पुणेः मागील काही वर्षांपासून संकटात असलेल्या दूध...
राज्यात पाऊस जोर धरण्याची शक्यता पुणे : मॉन्सून सक्रिय होण्याचा पोषक हवामान होत...
विश्वजित माने प्रभारी कृषी आयुक्तपुणे : राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे यांची...
कोल्हापुरात आज घरगुती वीज बिलांची होळी ...कोल्हापूर  : दिल्ली सरकारने शंभर...