Farmer Agricultural News two family members take benefit from farmers accident insurance policy scheme solapur maharashtra | Agrowon

शेतकरी अपघात विमा योजनेत कुटुंबातील दोघांना मिळणार लाभ

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 16 जानेवारी 2020

एका शेतकरी कुटुंबातील १० ते ७५ वयोगटांतील दोघांना या योजनेतून मदत मिळणार आहे. विम्याची जबाबदारी दि युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड पुणे या कंपनीकडे आहे. अपघात होताच शेतकऱ्याच्या कुटुंबाने कृषी विभागाशी संपर्क साधावा. 
- रवींद्र माने, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर.

सोलापूर ः शासनाने शेतकऱ्यांसाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना लागू केली आहे. या योजनेत खातेदार शेतकऱ्यांसह त्याच्या कुटुंबातील अन्य एका व्यक्तीलाही या अपघात विमा योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी दिली. या अपघात विमा योजनेत शेतकऱ्याच्या कुटुंबास दोन लाखांची मदत दिली जाते. 

या योजनेत यापूर्वी केवळ खातेदार शेतकऱ्याचाच समावेश होता. मात्र त्यामध्ये शासनाने दुरुस्ती करून शेतकऱ्यांसह त्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीलाही याचा लाभ होणार असल्याचे जाहीर केले आहे. शेतकऱ्यांना रात्री-अपरात्री शेतामध्ये काम करत असताना अपघात होऊन मृत्यू झाल्यास त्या शेतकऱ्याच्या कुटुंबास दोन लाख रुपयांपर्यंतची मदत शासनाकडून दिली जाते. शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचू दंश, विजेचा शॉक बसणे इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या अपघातांचा या योजनेमध्ये समावेश आहे.

याशिवाय रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे शेतकऱ्यांचा अपघात झाल्यास त्याच्या कुटुंबाला ही मदत मिळते. शेतकऱ्याशिवाय त्याच्या कुटुंबातील पत्नी, मुलगा, अविवाहित मुलगी यांचाही अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला मदत मिळते. 
 


इतर ताज्या घडामोडी
नरनाळा किल्ला पर्यटन विकासासाठी...अकोला  : अकोला जिल्ह्याच्या सर्वसाधारण...
पीक फेरपालटातून रोगांचा प्रादुर्भाव...येत्या हवामान बदलाच्या काळामध्ये कीड आणि रोगांचा...
मंगळवेढ्यात डाळिंबाच्या सौद्यांना...मंगळवेढा, जि. सोलापूर : मंगळवेढा कृषी उत्पन्न...
अकोला जिल्ह्यातील सात गावे झाली ‘...अकोला  ः जिल्ह्यातील सात गावांची राज्य...
वाशीम जिल्ह्यात ७७७ कोटींंची कर्जमुक्ती...वाशीम : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी कृषी...नाशिक : ग्रामीण भागातील गरीब शेतकऱ्यांचे उत्पन्न...
सांगलीत ‘माणगंगा’वर ताब्याच्या...सांगली : आटपाडीतील माणगंगा सहकारी साखर...
सोलापूर जिल्हा नियोजन आराखड्यात ७४.४५...सोलापूर : जिल्ह्याच्या सन २०२०-२०२१ च्या जिल्हा...
सूक्ष्म सिंचन साधनांमुळे आदिवासी शेतकरी...हिंगोली : ‘‘वसंतराव नाईक मराठावाडा कृषी...
मोर्शी येथे ‘कामदार’ कार्यालयाचे उद्‌...अमरावती  ः शेतकरी, कष्टकऱ्यांचे प्रश्‍न...
प्राप्त निधी वेळेत खर्च करा : भुजबळ नाशिक : ‘जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत प्राप्त...
सोलापूरजिल्ह्याच्या ३४९.८७ कोटींच्या...सोलापूर : जिल्ह्यासाठी २०२०-२१ या आर्थिक...
खानदेशात रब्बीचे क्षेत्र दुप्पटजळगाव ः खानदेशात रब्बी हंगामाची स्थिती...
वाघाच्या बंदोबस्तासाठी गावकऱ्यांचा...भंडारा  ः वाघाच्या दहशतीमुळे शेतीकामे...
मराठवाड्यातील पाणीसाठ्यात झपाट्याने घटऔरंगाबाद : ऑक्‍टोबरमध्ये हिटऐवजी पावसाचे आगमन...
'युरियावरील लिकिंग रोखा'अंमळनेर, जि. जळगाव  ः सध्या रब्बी हंगाम...
थकीत ऊसबिलाप्रश्नी नांदेडमध्ये ...नांदेड ः परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील...
संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी भाजपचा...कोल्हापूर  ः महाविकास आघाडीने जाहीर केलेली...
सीताफळ लागवडीची संपूर्ण माहिती शासनाने...अकोला  ः सीताफळ लागवडीची संपूर्ण माहिती...
केंद्र सरकारकडे प्रलंबित प्रश्नांच्या ...मुंबई  ः ‘‘महाराष्ट्राच्या हिताचे प्रश्न...