Farmer Agricultural News Unrest in Vidarbha due to the existence of locusts Nagpur Maharashtra | Page 2 ||| Agrowon

टोळधाडीच्या अस्तित्वाने विदर्भात पसरली अस्वस्थता

टीम अॅग्रोवन
शनिवार, 30 मे 2020

नागपूर   ः टोळधाड मध्यप्रदेशात परतल्याचे सांगितले जात असतानाच अमरावती आणि नागपूर जिल्ह्यात पुन्हा टोळधाडीचे अस्तित्व दिसून आल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. मोर्शी, वरुड तालुक्‍यातील अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या बागेतील संत्रा पिकाचे आणि भाजीपाला पिकांचे नुकसान झाल्याची माहिती दिली. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यात अत्यल्प नुकसानीचा कृषी विभागाचा दावा फोल ठरला आहे.

नागपूर   ः टोळधाड मध्यप्रदेशात परतल्याचे सांगितले जात असतानाच अमरावती आणि नागपूर जिल्ह्यात पुन्हा टोळधाडीचे अस्तित्व दिसून आल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. मोर्शी, वरुड तालुक्‍यातील अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या बागेतील संत्रा पिकाचे आणि भाजीपाला पिकांचे नुकसान झाल्याची माहिती दिली. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यात अत्यल्प नुकसानीचा कृषी विभागाचा दावा फोल ठरला आहे.

अमरावती आणि नागपूर जिल्ह्यात टोळधाडीने गेल्या रविवारपासून (ता.२४) संत्रा, भाजीपाला पिकावर हल्लाबोल केला. गेल्या आठवडाभरापासून अमरावती, नागपूर नंतर भंडारा जिल्ह्यातही टोळधाडीची दहशत अनुभवली गेली. कृषी विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांव्दारे कीड नियंत्रण सुरु केले आहे. परंतु त्यास अपेक्षित यश मिळाले नसल्याचे किडीचे या भागात कायम असलेल्या अस्तित्वावरून सिद्ध होत आहे. अमरावती जिल्ह्यातून टोळधाड मध्यप्रदेशात परतल्याचा दावा कृषी विभागाने केला होता.

मात्र गुरुवारी (ता.२८) मध्यरात्री मोरांगणा, राजूरा बाजार या भागातील एका पुलाखाली, रस्त्यालगत ही कीड पुन्हा दिसून आली. तब्बल चार किलोमीटर अंतर लांब ही झुंड होती. रस्त्यालगतच्या झुडपी वनस्पतींची पाने या किडीने फस्त केली. कृषी विभागाने आपल्या अहवालात नागपूर आणि अमरावती जिल्हयात अवघे ५० हेक्‍टरचे नुकसान झाल्याचा दावा केला आहे. परंतु संत्री, मोसंबी बागायतदार तसेच भाजीपाला उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. मोर्शी परिसरातील नवीन पेठे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी दूरध्वनीव्दारे ही माहिती दिली.

नागपूर जिल्ह्यात जलालखेडा, रामटेक परिसरात ही कीड सध्या आहे. खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या किडीची दहशत अशीच कायम राहिल्यास शेतकऱ्यांचा हंगाम धोक्‍यात येण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

ड्रोनव्दारे होणार कीटकनाशक फवारणी
रात्रीच्यावेळी टोळधाड उंच झाडावर थांबते. अग्निशमन यंत्रणा त्यावर फवारणीस बऱ्याचअंशी प्रभावी ठरते. त्यासोबतच येत्या काळात ड्रोनव्दारे फवारणीचा पर्याय अवलंबिण्यात यावा, अशी सूचना शुक्रवारी (ता.२९) कृषिमंत्री दादा भुसे यांनी कृषी विभागाला केली आहे. परंतू कृषी विद्यापीठासह कोणत्याच कृषी यंत्रणेकडे याविषयी माहितीच नसल्याचे वास्तव या दरम्यान समोर आले आहे.


इतर बातम्या
सीईटीऐवजी गुणांद्वारे कृषी...अमरावती ः बारावीनंतर कृषी अभ्यासक्रमाला...
वीजबिले माफ न केल्यास कंपनीचे कार्यालय...बुलडाणा ः लॉकडाउनच्या काळातील तीन महिन्यांचे...
सत्तास्थापनेसाठी भाजपकडूनच विचारणा केली...मुंबई : सहा महिन्यांपूर्वी राज्यात सत्तास्थापन...
वऱ्हाडात दूधाचे दर स्थिरअकोला ः या भागातील दूध संघ डबघाईस आल्याने दूध...
वाशीम जिल्ह्यावर खरिपात पावसाची कृपावाशीम ः जिल्ह्यात यंदाच्या मोसमात आत्तापर्यंत...
वर्धा जिल्ह्यात दूध उत्पादकांना दराचा...नागपूर ः लॉकडाउनमुळे मागणी घटल्याचे सांगत खासगी...
नाशिकमध्ये कमी दूध दरामुळे उत्पादकांची...नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार...
वीज बिले माफ न केल्यास उद्रेक ः...नाशिक : लॉकडाऊन काळात वीज कंपन्यांनी घरगुती वीज...
एचटीबीटी कपाशीची शेतकऱ्यांकडून पाहणीअकोला ः शेतकऱ्यांना तंत्रज्ञान स्वातंत्र्य मिळावे...
दुर्मीळ निलमणी आमरीचे सातपुड्यात...जळगाव ः जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगा या अनेक...
दूध पावडरला प्रतिकिलो ५० रुपये अनुदान...इस्लामपूर, जि. सांगली ः कोरोना सारख्या साथीत...
भ्रष्टाचाराच्या चौकशीचे आदेश;तरीही चार...पुणे: पंतप्रधान पॅकेजमधून राबविण्यात आलेल्या...
अकोला जिल्ह्यात सोयाबीन उगवणशक्तीबाबत...अकोला ः  सोयाबीन पिकाची पेरणी जुलैच्या...
अन्नधान्य पिकांच्या योजनांसाठी २७ कोटीपुणे: राज्यातील अन्नधान्य पिकांच्या योजनांसाठी...
ग्लायफोसेट वापराच्या मसुद्याविरुद्ध दाद...पुणे: केंद्र सरकारने ग्लायफोसेट तणनाशकाच्या...
सोयाबीन बियाणे कंपन्यांवर राज्यात ४६...औरंगाबाद ः सोयाबीनच्या बोगस बियाण्यामुळे पिकाची...
दूध व्यवसाय झाला आतबट्ट्याचा; शेतकरी...पुणेः मागील काही वर्षांपासून संकटात असलेल्या दूध...
राज्यात पाऊस जोर धरण्याची शक्यता पुणे : मॉन्सून सक्रिय होण्याचा पोषक हवामान होत...
विश्वजित माने प्रभारी कृषी आयुक्तपुणे : राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे यांची...
कोल्हापुरात आज घरगुती वीज बिलांची होळी ...कोल्हापूर  : दिल्ली सरकारने शंभर...