Farmer Agricultural News vegetable growers become in trouble Satara Maharashtra | Agrowon

सातारा जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादक अडचणीत

टीम अॅग्रोवन
शनिवार, 21 मार्च 2020

‘कोरोना’मुळे संपूर्ण जगावर संकट आले आहे. याचा संसर्ग टाळण्यासाठी गावच्या परिसरातील सर्व बाजार बंद झाले आहे. यामुळे भाजीपाला विकता येत नाही. परिणामी भाजीपाला खराब होत आहे.   
- विठ्ठल ससाणे, शेतकरी, कवठे, ता. वाई. जि. सातारा. 

सातारा  ः ‘कोरोनो’च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आठवडे बाजार बंद केल्यामुळे भाजीपाल्याचा तुटवडा भासणार आहे. या निर्णयाचा शेतकऱ्यांना तसेच ग्राहकांना फटका बसू लागला आहे. विक्रीअभावी भाजीपाला खराब होणार असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे. तसेच दुसऱ्या बाजूला उपलब्ध भाजीपाला ग्राहकांना अधिक दराने खरेदी करावा लागणार आहे.  

कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी मनाई आदेश जारी केले आहेत. या आदेशामुळे सभागृहे, मंगल कार्यालये बंद करण्याचे तसेच धार्मिक कार्यक्रम (लग्न कार्य, विधी, रिसेप्शन इत्यादी) घरगुती पद्धतीने घरच्या घरी करावेत. परंतु या कार्यक्रमांना दहा किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र जमण्यास मनाई करण्यात आली आहे. या आदेशानुसार प्रशासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणत्याही धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यास मनाई करण्यात आली आहे. कोरेगाव शेती उत्पन्न बाजार समितीने आपल्या अधिपत्याखाली जनावरे बाजार तसेच आठवडी बाजार हे शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कऱ्हाड येथील बैलबाजार बंद राहणार आहे.

जिल्ह्यातील सर्वच आठवडे बाजार बंद राहणार असल्याने शेतकऱ्यांकडील भाजीपाला खराब होण्याची भीती निर्माण झाली आहे. ग्रामीण भागात भाजीपाला काही प्रमाणात उपलब्ध होणार असला तरी शहरी भागात मात्र तुटवडा भासणार आहे. व्यापारी या तुटवड्याचा फायदा घेण्याची शक्यता आहे. तुटवड्याच्या काळात चढ्या दराने भाजीपाला विक्री केली जाण्याची शक्यता आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाकडून कंबर कसली आहे. मात्र आठवडा बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांचा भाजीपाला खराब होणार आहे. पुणे, मुंबई येथे पाठविला जाणारा भाजीपाला ठप्प होऊ लागला आहे. एसटी बसच्या फेऱ्या निम्म्यावर आणल्या गेल्या आहेत. एकीकडे कोरोना संसर्गाची भीती तर दुसऱ्या बाजूला भाजीपाला खराब होणार असल्याने शेतकरी अडचणीत वाढ होणार आहे. 

संसर्ग होऊ नये यासाठी जिल्ह्यातील या काळात होणाऱ्या सर्वच यात्रा बंद करण्यात आल्या आहेत. कोरोना विषाणू, पूर्वमोसमी पावसाने सुरू असलेले नुकसान, तसेच आठवडी बाजार बंदीमुळे शेतकऱ्यांच्या संकटात वाढ झाली आहे. रविवारी जनता कर्फ्यू असल्याने या दिवशी साखर कारखानेही बंद राहणार आहेत. कोरोना विषाणूच्या भीतीमुळे अनेक ऊसतोड मजुरांची पावले गावाकडे वळू लागली आहेत.
 


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...