मुंबई बाजार समितीसाठी आज मतमोजणी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई  : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी शनिवारी (ता. २९ फेब्रुवारी) चुरशीने ९२.५७ टक्के मतदान झाले आहे. ५८ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीमध्ये बंद झाले असून, आज (ता. २) बाजार समिती मुख्यालय आवारामध्ये मतमोजणी होणार आहे.

राज्यातील ३०५ बाजार समित्यांची शिखर संस्था असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी ३४ जिल्ह्यांमध्ये हे मतदान झाले. सहा महसूल विभागांमधून १२ शेतकरी प्रतिनिधी व चार व्यापारी प्रतिनिधींची निवड करण्यासाठी मतदान प्रक्रिया राबवली गेली. या निवडणुकीत ५८ उमेदवार रिंगणात होते. महाविकास आघाडीचा प्रयोग या निवडणुकीमध्येही राबविण्यात आला. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व शेकापचा पॅनेलमध्ये समावेश आहे. भाजप नेत्यांनीही काही उमेदवारांना ताकद दिली होती. सर्वच राजकीय पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.

सहा महसूल विभाग व व्यापारी मतदारसंघांमध्ये एकूण १७ हजार ५१३ मतदार होते. महसूल विभागामध्ये ९८.७२ टक्के मतदान झाले असून, व्यापारी मतदारसंघामध्ये ८७.२१ टक्के मतदान झाले आहे. अमरावतीमध्ये ९९, कोकणामध्ये ९९.६४, पुण्यामध्ये ९९ टक्के मतदान झाले आहे.    विभागनिहाय मतांची टक्केवारी

  • अमरावती-९९ 
  • औरंगाबाद - ९८.७४
  • कोकण -९९.६४
  • पुणे - ९९
  • नाशिक -९८.२३
  • नागपूर -९५.५९
  • व्यापारी मतदारसंघ- ८७.२१
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com