Farmer Agricultural News water level increase in dam Nagar Maharashtra | Agrowon

नगर जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ

टीम अॅग्रोवन
बुधवार, 8 जुलै 2020

नगर  ः जिल्ह्यात यंदा सुरुवातीपासूनच चांगला पाऊस झाल्याने धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ होत आहे.  

नगर  ः जिल्ह्यात यंदा सुरुवातीपासूनच चांगला पाऊस झाल्याने धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ होत आहे.  

गेल्या वर्षी केवळ सहा टक्के पाणीसाठा असलेल्या सीना धरणात यंदा आतापर्यंत एकूण ५० टक्के म्हणजेच एकूण १.३० टीएमसी पाणीसाठा झाला. निळवंडे धरणातही आतापर्यंत एकूण ५० टक्के म्हणजे ४.४४ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात मात्र पुरेसा पाऊस नसल्याने भंडारदरा धरणातील पाणीसाठ्यात फारशी वाढ झालेली नाही. सध्या भंडादरा धरणात एकूण ३० टक्के म्हणजेच ३.३२ टीएमसी पाणीसाठा आहे.  

नगर जिल्ह्यात भंडारदरा, निळवंडे, मुळा, सिना, खैरी, घाटशीळा, मांडओहळ हे प्रमुख प्रकल्प आहेत. यंदा जून महिन्यातच चांगला पाऊस सुरु झाल्याने धरणांतील पाणीसाठा वाढत आहेत. नगर व पारनेर तालुक्यात मागील आठवड्यात जोरदार पाऊस झाल्याने सीना धरणात पाण्याची आवक झाली.

सध्या धरणात एकूण ५० टक्के पाणीसाठा झाला आहे. ११ टीएमसी क्षमता असलेल्या भंडारदरा धरणात सध्या एकूण सव्वातीन टीएमसी तर निळवंडे धरणात एकूण चार टीएमसी पाणीसाठा झाला आहे. मांडओहळ मध्यम प्रकल्पात ३८ तर घाटशीळ पारगाव मध्यम प्रकल्पात दोन टक्के पाणीसाठा झाला आहे. संगमनेरमधील भोजापूर मध्यम प्रकल्पात १३ टक्के तर खैरी मध्यम प्रकल्पात २२ टक्के पाणीसाठा झाला आहे.  गेल्या चार दिवसांपासून अकोले तालुक्याच्या पश्चिम भागातील भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे भंडारदरा धरणात पाण्याची आवक चांगली सुरू झाली आहे. जिल्ह्यातील अन्य भागांत मात्र चार दिवसांपासून पाऊस थांबलेला आहे. 

मंगळवारी (ता. ७) सकाळी आठ वाजेपर्यंत पडलेला पाऊस (मिमी) ः घाटघरला १०५, रतनवाडी ९५, पांजरे ६५, वाकी ५०, भंडारदरा  ७१, निळवंडे २६.


इतर अॅग्रो विशेष
कृषी अधीक्षक, उपसंचालकांच्या बदल्यापुणे : कोविड १९ रोगाच्या पार्श्वभूमीवर कार्यरत...
मका विक्रीचे चुकारे ४० दिवसांनंतरही थकितजळगाव ः जिल्ह्यातील सुमारे साडेतीन हजार मका...
कोकणात मुसळधारेचा अंदाजपुणे ः  उत्तर प्रदेशचा नैऋत्य भाग ते...
राज्यात सर्वदूर हलका पाऊसपुणे ः राज्यातील बहुतांशी भागात हलका ते मध्यम...
सोयाबीनचे एकरी ५१.७७ क्विंटल उच्चांकी...जॉर्जिया येथील व्होलदोस्ता प्रांतामधील रॅंडी...
शेतकऱ्यांचे वनौषधी अनुदान पुन्हा रखडलेपुणे: राज्यात वनौषधी उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचे...
दुर्गम शेतकऱ्यांसाठी जलकुंडे ठरली वरदानठाणे जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील दुर्गम...
बाजार समिती कर्मचाऱ्यांना शासन सेवेत...यावल, जि. जळगाव: केंद्राने ‘एक देश एक बाजार समिती...
‘एचटीबीटी’मुळे कपाशीतील आंतरपिके...पुणे : काळ्याबाजारातून आलेल्या तणनाशक सहनशील (...
केळी पिकात तयार केली ओळखमोहित्यांचे वडगाव (ता. कडेगाव,जि.सांगली) येथील...
बंदीची प्रक्रिया हवी  सुटसुटीत अन्...केंद्र सरकारने १८ मे रोजी २७ कीडनाशकांच्या बंदीचा...
कृषिसेवक भरतीतील गैरव्यवहारावर पांघरूण...पुणे : राज्यात २०१६ मध्ये झालेल्या कृषिसेवक भरती...
कोकण, विदर्भात मुसळधारेचा इशारा पुणे ः मध्य प्रदेश व परिसराच्या वायव्य भागात कमी...
संपूर्ण नियमनमुक्तीची अंमलबजावणी करापुणे:  सर्वच शेतमालाच्या संपूर्ण...
बाजार समिती कायद्यात बदल करण्याची मागणीपुणे: शेतमालाच्या संपूर्ण नियमनमुक्तीच्या...
भाजपच्या दूध आंदोलनापासून ‘संघर्ष समिती...नगर ः दुधाच्या दरासाठी सातत्याने आग्रही राहून...
मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरु...मुंबई: दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य होईपर्यंत...
बीटी कपाशी बियाणे अप्रमाणित ...अकोला ः या हंगामात बाजारपेठेत विक्रीसाठी आणलेल्या...
'नाबार्ड’चा व्यवस्थापक नसल्यास अग्रणी...पुणे: कृषी पायाभूत निधी योजनेला प्रत्येक...
देशातील जलसंपत्तीची माहिती आता एका...पुणे ः केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने देशभरातील...