Farmer Agricultural News water level increase in dam Solapur Maharashtra | Agrowon

भाटघर, वीर, नीरा देवघर धरणांतील पाणीसाठ्यात वाढ

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 14 जुलै 2020

सोलापूर  : सोलापूर, पुणे आणि सातारा जिल्ह्यासाठी महत्वाच्या असलेल्या भाटघर, वीर, नीरा देवघर या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे या धरणांतील पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना यंदा चांगला दिलासा मिळाला आहे.

सोलापूर  : सोलापूर, पुणे आणि सातारा जिल्ह्यासाठी महत्वाच्या असलेल्या भाटघर, वीर, नीरा देवघर या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे या धरणांतील पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना यंदा चांगला दिलासा मिळाला आहे.

यंदा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासूनच पावसाने हजेरी लावल्याने धरणांमधील पाणीसाठयात वाढ होऊ लागली आहे. शिवाय गेल्यावर्षीही धरणे भरल्यामुळे यंदा उन्हाळा जाणवला नाही. या वर्षी जून महिन्यात चांगला पाऊस झाला आहे. त्यात यंदा धरण परिसरात कमी पाऊस आहे, परंतु पाणलोट क्षेत्रात मात्र चांगला पाऊस पडत असल्यामुळे पाणीसाठ्यात वाढ होत आहे. सध्या नीरा उजवा कालव्यातून आवर्तन सुरु आहे. त्यातून पिकांचे सिंचनाचे पाणी बंद करून ते माळशिरस तालुक्‍यातील निमगाव, उघडेवाडी, फोंडशिरस, गिरझणी तलावात सोडले जात असल्याने उघडेवाडी व गिरझणी तलाव भरले आहेत.

पाऊस असा सतत वाढल्यास लवकरच पाणीसाठा आणखी वाढण्याची शक्यता आहे. सध्या भाटघर धरणामध्ये ३०.१२ टक्के, वीरमध्ये ३८.६९ टक्के आणि नीरा-देवघरमध्ये १४.३९ टक्के पाणीसाठा आहे.


इतर ताज्या घडामोडी
रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांना पूर,...रत्नागिरी : सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने...
पंढरपुरात ७ ते १३ ऑगस्ट दरम्यान...सोलापूर  : कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी...
फळपीक विमा निकषात बदलाची गरज :...अमरावती : जिल्ह्यामध्ये संत्रा फळपीक मोठ्या...
सातारा जिल्ह्यात दमदार पाऊस सातारा : जिल्ह्यात मंगळवारी दमदार पाऊस झाल्याने...
कोयना धरण परिसरात मुसळधार पाऊस सातारा : कोयना धरण क्षेत्रात मंगळवारी मुसळधार...
कोल्हापूर बाजार समितीवर अखेर प्रशासक कोल्हापूर : नोकर भरती वरून वादग्रस्त ठरलेल्या...
मराठवाड्यात खरीप ज्वारीची ३७ टक्के पेरणीऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात...
शाश्वत शेती उत्पादनासाठी मातीतील जिवाणू...स्थानिक झाडे झुडुपांच्या मुळाच्या परिसरातील...
भुसावळमध्ये १५ हजार हेक्टरवर कपाशीभुसावळ, जि.जळगाव  : गतवर्षी अतिवृष्टीमुळे...
पुणे जिल्ह्यात जोरदार श्रावण सरी पुणे ः दोन ते तीन दिवसांपासून पुणे जिल्ह्याच्या...
नांदेड जिल्ह्यात दोन लाख शेतकरी...नांदेड : जिल्ह्यातील बॅंका जुन्या कर्जदार...
खानदेशात खतांची मागणी घटली जळगाव : खानदेशात मागील आठवड्यात खत टंचाईची तक्रार...
सोयाबीनवरील किडीप्रश्‍नी योग्य वेळी...परभणी : ‘‘सोयाबीन हे कपाशी एवढेच राज्यातील...
नियमांचे पालन करुन गणेशोत्सव साजरा करा...नाशिक : ‘‘आगामी काळातील गणेशोत्सव साजरा करताना...
कोल्हापुरात दमदार पावसामुळे नद्यांनी...कोल्हापूर ः जिल्ह्यात बुधवारी (ता. ५) पावसाचा जोर...
सोलापूर जिल्ह्यात पीककर्जातून ९८४...सोलापूर  ः जिल्ह्यासाठी यंदाच्या खरीप...
येऊलखेड शिवारात शेकडो एकरांतील पीक...बुलडाणा ः जिल्ह्यात शेगाव तालुक्यात सोयाबीनचे पीक...
युरियाच्या मुद्यावरून अकोला जिल्हा...अकोला ः जिल्ह्यात युरियाची ग्रामीण भागात तीव्र...
उसामध्ये पोक्का बोईंग, शेंडाकूज रोगाचा...सध्या पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागात...
नाशिकमध्ये वांगी प्रतिक्विंटल १००० ते...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...