काटेपूर्णा प्रकल्पात ८६ टक्के पाणीसाठा

अकोला : जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांपैकी एक असलेल्या काटेपूर्णा प्रकल्पात ८६ टक्के पाणीसाठा झाल्याने शनिवारी (ता. एक) सकाळी ११ वाजता प्रकल्पाचे चार दरवाजे उघडण्यात आले. यातून १५० क्युसेक विसर्ग नदीपात्रात केला जात आहे.
काटेपूर्णा प्रकल्पाचे चार दरवाजे उघडण्यात आले असून त्याव्दारे १५० क्युसेकने विसर्ग सुरु आहे.

बार्शीटाकळी तालुक्यातील महान येथे काटेपूर्णा प्रकल्प आहे. या प्रकल्पाची क्षमता ३.०४ टीएमसी असून आत्तापर्यंत २.६३ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. हा प्रकल्प ८६.५० टक्के भरला आहे. या प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने जुलै अखेरच हा प्रकल्प तुडुंब झाला आहे. धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणावर आवक होत असल्याने शनिवारी सकाळी ११ वाजता चार दरवाजे उघडण्यात आले. यामधून १५० क्युसेक इतका विसर्ग सुरू करण्यात आला. या प्रकल्पात वाशीम जिल्ह्यातील विविध भागांतून पाण्याची आवक होत असते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com