Farmer Agricultural News water rotation starts from today nagar maharashtra | Agrowon

मुळा, भंडारदरा धरणांतून आजपासून आवर्तन

टीम अॅग्रोवन
बुधवार, 22 जानेवारी 2020

नगर  ः यंदा पाऊस चांगला झाल्याने धरणक्षेत्रात मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. बहुतांश ठिकाणी पिकांना पाण्याची आवश्‍यकता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मुळा, भंडारदरा या धरणांतील पहिले आवर्तन आजपासून (बुधवारी, ता. २२) सुरू करा, असे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत संबंधित यंत्रणेला दिले. 

नगर  ः यंदा पाऊस चांगला झाल्याने धरणक्षेत्रात मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. बहुतांश ठिकाणी पिकांना पाण्याची आवश्‍यकता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मुळा, भंडारदरा या धरणांतील पहिले आवर्तन आजपासून (बुधवारी, ता. २२) सुरू करा, असे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत संबंधित यंत्रणेला दिले. 

नगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात सोमवारी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडली. जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार रोहित पवार, संग्राम जगताप, मोनिका राजळे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राजश्री घुले, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, मुख्यकार्यकारी अधिकारी शिवराज पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांच्यासह अधिकारी या वेळी उपस्थित होते. 

गोदावरी व कृष्णा खोऱ्यापैकी गोदावरी खोऱ्यातील मुळा, भंडारदरा, निळवंडे प्रकल्पांतील यंदाच्या उपलब्ध पाण्याची स्थिती अधिकाऱ्यांनी सांगितली. तसेच २४ जानेवारीपासून रब्बीसाठी आवर्तन सोडणार असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, आमदारांनी त्याआधी आवर्तन सुरू करण्याची मागणी केली. त्यानंतर मुश्रीफ यांनी बुधवारपासून (ता. २२) आवर्तन सुरू करण्याचे आदेश दिले.

‘चाऱ्या दुरुस्त न करणाऱ्या पाणीवापर संस्थांवर कारवाई करा’
दोन्ही धरणांच्या लाभक्षेत्रात अनेक ठिकाणी चाऱ्यांची दुरवस्था झाली असल्याचा प्रश्न उपस्थित करण्यात आला. पाणी वापर संस्थांची चाऱ्या दुरुस्ती करण्याची जबाबदारी आहे. त्यासबंधी पाणीवापर संस्थांची बैठक घ्या. त्यात चर्चा करा व ज्या संस्था चाऱ्या दुरुस्त करणार नाहीत. त्यांच्यावर काय कारवाई करता येईल, असेही बैठकीत सांगण्यात आले.


इतर ताज्या घडामोडी
गोरेगाव आणि देगावांतील शेतकऱ्यांच्या...अकोला  ः जिल्ह्यातील गोरेगाव व देगाव या दोन...
जळगाव जिल्ह्यात अर्ली केळी लागवड सुरूजळगाव  ः जिल्ह्यात यावल, रावेर, मुक्ताईनगर,...
...अखेर रुईखेड येथे हवामान केंद्र स्थापनअकोला  ः महावेध व हवामान आधारित फळपीक विमा...
चांदवड येथे शेतकरी संघटनेची कांदा परिषद...नाशिक  : केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री...
गोंदिया : नुकसानग्रस्तांचे डोळे लागले...सडक अर्जुनी, गोंदिया  ः खरीप हंगामात अवकाळी...
जळगाव : किसान सन्मानच्या लाभाची...जळगाव ः शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या...
परभणी जिल्ह्यात नादुरुस्त बंधाऱ्यांमुळे...परभणी : जिल्हा परिषदेच्या लघू पाटबंधारे...
कर्जमुक्ती योजनेंतर्गत ७४६ शेतकऱ्यांचे...नाशिक : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
किसान सभेचे बिऱ्हाड आंदोलन मागेनाशिक  : दिंडोरी तालुक्यामध्ये गेल्या अनेक...
लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात हेक्‍टरी १०...उस्मानाबाद : दोन्ही जिल्ह्यातील कापूस व तुरीची...
पाणी सोडण्याविरुद्ध रेणा प्रकल्पस्थळी...रेणापूर, जि. लातूर : भंडारवाडी (ता. रेणापूर)...
वणवा नुकसानग्रस्तांना सिंधुदुर्ग ‘झेडपी...सिंधुदुर्ग : ‘‘वणव्यामुळे नुकसान झालेल्या...
सांगलीत ‘रोहयो’तून डाळिंब लागवडीला ‘...आटपाडी, जि. सांगली : पावणे दोन वर्षांत येथील...
पुणे जिल्ह्यात हरभऱ्याला रोग-किडीचा फटकापुणे ः रब्बी हंगामात वाफसा न झाल्याने अनेक...
नगर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना मदत...नगर ः अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची...
पीकविम्याची रक्कम लवकरच ः कृषिमंत्री...मुंबई ः राज्यातील शेतकऱ्यांना १५ ते २० दिवसांच्या...
सातारा जिल्ह्यात अडीच महिन्यांत केवळ ४४...सातारा ः दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने सुरू...
मराठवाड्यातील दूध संकलनात घटऔरंगाबाद : मराठवाड्यातील दूध संकलनात गतवर्षी...
पहाटेच्या शपथविधीची विधानसभेत आठवणमुंबई ः देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी...
मराठवाडी धरणग्रस्तांनी बंद पाडले धरणाचे...ढेबेवाडी, जि. सातारा : ‘आधी पुनर्वसन मगच धरण’ या...