Farmer Agricultural News weather prediction pune maharashtra | Agrowon

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

टीम अॅग्रोवन
शनिवार, 14 डिसेंबर 2019

पुणे  ः मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात पावसासाठी पोषक हवामान आहे. आज (शनिवारी) आणि उद्या (रविवारी) या भागात वादळी पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील काही भाग, कोकण व पूर्व विदर्भात हवामान अंशतः ढगाळ राहील, असा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे. 

पुणे  ः मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात पावसासाठी पोषक हवामान आहे. आज (शनिवारी) आणि उद्या (रविवारी) या भागात वादळी पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील काही भाग, कोकण व पूर्व विदर्भात हवामान अंशतः ढगाळ राहील, असा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे. 

मध्य प्रदेशचा पश्चिम भाग व छत्तीसगड राज्याच्या परिसरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. परिणामी गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील काही भागांत हवामान ढगाळ आहे. यामुळे किमान तापमानात वाढ झाल्याने थंडी गायब झाली आहे. गुरुवारी (ता. १२) नगर, औरंगाबाद, जळगाळ, धुळे, बुलडाणा, जालना, अकोला जिल्ह्यातील काही भागांत पाऊस झाला. या पावसामुळे हवेत काही प्रमाणात गारठा निर्माण झाला होता.

शुक्रवारी (ता. १३) सकाळपर्यंत धुळे येथील कृषी महाविद्यालयात ११.८ अंश सेल्सिअस अशी सर्वांत कमी किमान तामपानाची नोंद झाली. नाशिकमध्ये १२.६ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविले गेले. कोकणात किमान तापमान १९ ते २२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान होते. मध्य महाराष्ट्रात ११ ते १७ अंश सेल्सिअस, मराठवाड्यात १७ ते १९ अंश सेल्सिअस, विदर्भात १७ ते १८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान किमान तापमान नोंदले गेले. राज्यात सोमवारपासून हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे गायब झालेली थंडी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. 

शुक्रवारी (ता. १३) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांतील विविध ठिकाणचे किमान तापमान, अंश सेल्सिअसमध्ये, कंसात वाढ, घट ः अकोला १७.६ (४), अलिबाग २१.४ (३), अमरावती १६.२(१), औरंगाबाद १७.६ (६), बीड १९.१ (५), बुलडाणा १६.४ (२), चंद्रपूर १७.९ (४), डहाणू १९.६ (१), गोंदिया १६.८ (५), जळगाव १६.० (४), धुळे कृषी महाविद्यालय ११.८, कोल्हापूर १८.८ (३), महाबळेश्वर १३.५, मालेगाव १५.४ (४), मुंबई १९.५ (१), नागपूर १७.३ (५), नांदेड १६.० (३), नाशिक १२.६ (२), निफाड १३.१, परभणी १७.२ (४), लोहगाव १७.१ (४), पाषाण १६.२ (५), पुणे १५.९ (५), रत्नागिरी २२.७ (२), सांगली १८.९ (४), सातारा १६.८ (३), सोलापूर १७.७ (२), वर्धा १८.५ (५), यवतमाळ १७.० (२).


इतर अॅग्रो विशेष
व्यवसाय स्वातंत्र्यावर गदा नकोचशेतकरीविरोधी कायदे रद्द करण्याबाबतची एक चळवळ...
क्रयशक्ती वाढविणारा हवा अर्थसंकल्पकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण १ फेब्रुवारी...
कमी फॅटचे दुध पिल्यास म्हतारपण कमी होतं...कमी फॅट(मेद)युक्त दुधाचा आहारामध्ये वापर केल्यास...
विदर्भ, कोकणात आज हलक्या पावसाचा अंदाज पुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांअभावी राज्यात थंडी...
नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष निर्यातीत ५७...नाशिक : राज्यातून होणाऱ्या द्राक्ष निर्यातीत...
दूध उत्पादक महत्त्वाचा दुवा: हरिभाऊ...औरंगाबाद : जिल्हा दूध संघाच्या एकूणच...
अर्जेंटिनाला होणार आंबा निर्यात पुणे : कोकणातील हापूस आणि मराठवाड्यातील केशर...
गावरान अळूची फायदेशीर व्यावसायिक शेतीसुमारे पंधरा गुंठ्यांत देशी गावरान अळूची शेती...
व्यवस्थापनाला मार्केटिंगची जोड देत...पॅालिहाउसमधील फूलशेतीसाठी एकेकाळी प्रसिद्ध असलेले...
‘पोकरा’ प्रकल्पात कृषी यांत्रिकीकरणाचे...अकोला  ः नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
पोपटराव पवार, राहिबाई पोपेरे यांना...नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून शनिवारी (ता. २५)...
कोयना धरणाच्या पोटात होणार आणखी एक धरणकोयनानगर, जि. सातारा ः येथील कोयना धरणाची...
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत केवळ १४...औरंगाबाद : संकटांशी दोन हात करून आपली शेती जिवंत...
खानदेशात रब्बीत अत्यल्प पीक कर्जवाटपजळगाव ः खानदेशात रब्बी हंगामातील पेरण्या जवळपास...
वटवाघळांचा मोर्चा आता द्राक्ष बागांकडेपुणे: वटवाघळांची वस्तीस्थाने आणि अधिवास...
गटाने तयार केला `कोकणरत्न' ब्रॅंडकुर्धे (जि. रत्नागिरी) गावातील श्री नवलाई देवी...
रासायनिक अवशेषमुक्त शेती हेच भवितव्य:...नाशिक : रासायनिक खते व कीटकनाशकांच्या...
विदर्भ, कोकणात उद्यापासून पावसाचा अंदाजपुणे : राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार सुरूच...
कौशल्य, कृषी, उद्योग विभाग देतील...परभणी: पंतप्रधान कौशल्य विकास योजना आणि...
शेतकरीविरोधी कायद्यांबाबत सहा महिन्यांत...पुणे : शेतकरी आत्महत्यांना पूरक ठरणारे कायदे रद्द...