Farmer Agricultural News weather prediction pune maharashtra | Agrowon

गारठ्यात हळूहळू वाढ

टीम अॅग्रोवन
सोमवार, 16 डिसेंबर 2019

पुणे  ः कोरड्या हवामानामुळे किमान तापमानात चढउतार होत आहे. पुढील दोन ते चार दिवस गारठा कायम राहणार आहे. त्यानंतर गारठ्यात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. रविवारी (ता. १५) सकाळी निफाड येथे १३.२ अंश सेल्सिअस अशा किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

पुणे  ः कोरड्या हवामानामुळे किमान तापमानात चढउतार होत आहे. पुढील दोन ते चार दिवस गारठा कायम राहणार आहे. त्यानंतर गारठ्यात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. रविवारी (ता. १५) सकाळी निफाड येथे १३.२ अंश सेल्सिअस अशा किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

मध्यप्रदेश, राजस्थानमध्ये गेल्या आठवड्यात पाऊस झाल्याने किमान तापमानात वाढ झाली होती. मात्र, आता पुन्हा या भागात हवामान कोरडे झाल्याने गारठा वाढू लागला आहे. अनेक भागांत किमान तापमानात घट होऊ लागली आहे. हिमाचल प्रदेश, पूर्व राजस्थान, सौराष्ट्र, कच्छ, पश्चिम बंगाल, सिक्कीम या भागात सरासरीच्या तुलनेत एक ते तीन अंश सेल्सिअसने किमान तापमानात घट झाली आहे. राजस्थानाच्या पूर्व भागातील सिकर आणि पिलानी येथे ५.५ अंश सेल्सिअस अशा सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे.

राज्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून हवामान कोरडे आहे. त्यामुळे सकाळपासून ऊन पडत असले तरी सायंकाळनंतर हवेत चांगलाच गारवा जाणवत आहे. कोकणातील बहुतांशी भागात किमान तापमान १८ ते २० अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते.

मध्य महाराष्ट्रातील पुणे, महाबळेश्वर या भागांत किंचित थंडी असली तरी सोलापूर, सांगली या भागांत थंडी कमी होती. खानदेशातही गारठा असल्याने किमान तापमान १५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. मराठवाडा व विदर्भात थंडी कमी अधिक प्रमाणात होती.

रविवारी (ता. १५) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांतील विविध ठिकाणचे किमान तापमान, अंश सेल्सिअसमध्ये, कंसात वाढ, घट ः अकोला १७.३ (४), अलिबाग १९.१, अमरावती १८.४ (३), औरंगाबाद १६.३ (४), बुलडाणा १७.० (२), चंद्रपूर १८.६ (५), डहाणू १९.४ (१), गोंदिया १७.५ (५), जळगाव १५.६ (४), कोल्हापूर १८.५ (३), महाबळेश्वर १४.४(१), मालेगाव १५.५ (४), मुंबई १८.०(-१), नागपूर १६.८ (४), नांदेड १६.० (३), नाशिक १४.० (३), निफाड १३.२, नवी मुंबई (पनवेल) १५.७, उस्मानाबाद १३.८, परभणी १७.८ (४), लोहगाव १६.६ (४), पाषाण १५.६ (४), पुणे १५.२ (४), रत्नागिरी २०.१, सांगली १८.३ (३),  सातारा १५.८ (३), सोलापूर २०.२ (४), वर्धा १८.४ (५), यवतमाळ १६.४ (२). 


इतर अॅग्रो विशेष
खेड शिवापुरात केली स्ट्रॉबेरी लागवड...खेड शिवापूर (जि. पुणे) येथील मयूर कोंडे या...
राज्यात गारठा झाला कमी पुणे : राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार सुरूच...
थकीत कर्जावर व्याज आकारू नये : राज्य...मुंबई ः महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी...
पाणीवाटपावर चर्चा गरजेची : डॉ. माधवराव...अकोला  ः देशाचा विकास होताना नागरीकरणाच्या...
केंद्र कांदा निर्यातबंदी, साठा मर्यादा...नवी दिल्ली ः देशात कांद्याचे उत्पादन...
शेतकरी कंपनीमुळे तयार झाले उत्पन्नाचे...पुणे जिल्ह्यातील मढ पारगाव आणि परिसरातील सात...
निर्यातदार व्हा... पण शेतकऱ्यांचा...पुणे: शेतमालाची निर्यात आता पूर्णतः ‘बिझनेस...
हरितक्रांती घडविताना सुपीकता हरवली:...अकोला : अन्नधान्य निर्मितीचे उद्दिष्ट पूर्ण...
वाइन उद्योगाला अडचणीतून मुक्त करणार ः...नाशिक : वाइन उद्योगाला मागील काही दिवसांपासून...
सत्तावीस लाख शेतकऱ्यांचे ‘आधार’ रखडलेपुणे: शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बॅंक खात्यात...
वायफाय मोफत हवाय? घरपट्टी, पाणीपट्टी भराकोल्हापूर : ‘‘वायफाय मोफत हवाय? घरपट्टी व...
कर्जमाफीचा शब्द पाळू ः मुख्यमंत्रीइस्लामपूर, जि. सांगली ः कर्जमाफीचा आम्ही दिलेला...
अकोला जिल्ह्यात मजूरटंचाईमुळे कापूस...अकोला ः शेतीकामांसाठी दिवसेंदिवस मजूर समस्या भीषण...
सावित्रीच्या लेकींचा जागर करीत घराच्या...नाशिक : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीचे...
पूरकउद्योग अन् शेती विकासात श्री भावेश्...बेलवळे खुर्द (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथील श्री...
उत्तर महाराष्ट्रात अधिक गारठापुणे : राज्यात गारठा वाढला असला तरी, किमान...
शाश्वत ग्राम, शेतीविकासाची 'जनजागृती'औरंगाबाद येथील जनजागृती प्रतिष्ठान या स्वयंसेवी...
बदल ठरावेत लाभदायकयवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील हजारो...
हवामान बदल हेच सर्वांत मोठे आव्हानआ ज जगभरात हवामान बदल आणि त्याचे होणारे परिणाम हा...
महिनाभरात पडणार नाशिक विभागातील साखर...नगर ः नगर, नाशिक जिल्ह्यामध्ये यंदा ३२ पैकी केवळ...