निफाड १२.१ अंशांवर; गारठा वाढण्याची शक्यता

निफाड १२.१ अंशांवर; गारठा वाढण्याची शक्यता
निफाड १२.१ अंशांवर; गारठा वाढण्याची शक्यता

पुणे  ः कोरड्या हवामानामुळे गारठा वाढण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील नगर, पुणे, सातारा, नाशिक, धुळे, औरंगाबाद, नागपूर, चंद्रपूर या जिल्ह्यांतील अनेक भागांत किमान तापमानात घट होऊ लागली आहे. खान्देशातील काही भागांत गारठा वाढू लागला आहे. सोमवारी (ता. १६) सकाळी निफाड येथे १२.१ अंश सेल्सिअस अशा किमान तापमानाची नोंद झाली आहे. राज्यात येत्या दोन ते तीन दिवसांत गारठा आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. पुढील लिंकला क्लिक करा...दररोजचा हवामान अंदाज हवाय? पीकसल्ला हवाय? अॅग्रोवन अॅप आजच डाऊनलोड करा...

गेल्या दोन दिवसांपासून किमान तापमानात चढउतार होत आहेत. रविवारी अनेक भागांत किमान तापमान कायम असले, तरी त्यानंतर हळूहळू त्यात आणखी घट होऊ लागली आहे. सकाळी अकरानंतर उन्हाचा पारा काही प्रमाणात वाढत असला, तरी दुपारी चार वाजेनंतर तापमानाचा पारा कमी होत आहे. सायंकाळी हवेत गारवा तयार होत असून, मध्यरात्रीनंतर त्यात वाढ होऊन गारठा जाणवत आहे.  

कोकणातील बहुतांश भागात गारठा कमी असून, किमान तापमान १८ ते २० अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. मध्य महाराष्ट्रातील पुणे, महाबळेश्वर, नाशिक, धुळे या भागात अल्प प्रमाणात गारठा असून सोलापूर, सांगली या भागांत गारठा कमी आहे. निफाडपाठोपाठ धुळे कृषी महाविद्यालयात १२.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.  कोल्हापूर, सांगली या भागांत अजूनही गारठा वाढलेला नाही. खानदेशातील जळगाव जिल्हा परिसरात गारठा कमी असून, किमान तापमान १७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते.

मराठवाड्यातील औरंगाबाद परिसरात तापमान १५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. परभणी, नांदेड, उस्मानाबाद या भागांत किमान तापमानात चढउतार होत आहेत. विदर्भात किमान तापमान १४ ते १६ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते.

सोमवारी (ता. १६) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांतील विविध ठिकाणचे किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये, कंसात वाढ, घट ः अकोला १७.१ (४), अलिबाग २०.८ (१), अमरावती १६.४ (१), औरंगाबाद १५.७ (४), बुलडाणा १६.४ (२), चंद्रपूर १४.०, डहाणू १८.९, गोंदिया १७.४ (५), जळगाव १७.६ (५), कोल्हापूर १८.६ (३), महाबळेश्वर १४.५(१), मालेगाव १७.८ (४), मुंबई १९.८ (१), नागपूर १६.५ (४), नाशिक १६.० (५), निफाड १२.१, उस्मानाबाद १३.९, परभणी १७.० (४), लोहगाव १७.३ (४), पाषाण १६.० (५), पुणे १५.६ (४), रत्नागिरी २०.९, सांगली १८.२ (३),  सातारा १५.८ (३), सोलापूर १९.५ (४), वर्धा १६.६ (३).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com