थंडीत चढउतार; निफाड येथे  पारा ९ अंश सेल्सिअसवर

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  ः राज्यातील मराठवाडा व विदर्भातील काही भागांत हवामान अंशतः ढगाळ आहे. यामुळे विदर्भातील नागपूर परिसरात पावसाचा शिडकावा झाला आहे. काही भागात वाढलेला थंडीचा कडाका कमी अधिक स्वरूपात कायम आहे. बुधवारी (ता.१) सकाळी निफाड व धुळे कृषी महाविद्यालय येथे ९.० अंश सेल्सिअस इतके नीचांकी किमान तापमान नोंदले गेले.

उत्तर भारतात तीव्र थंडीची लाट अजूनही कायम आहे. यामुळे उत्तर प्रदेशातील बहराईच येथे ०.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब आणि छत्तीसगड, जम्मू आमि काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, आसाम व मेघालय येथे उणे १.६ ते उणे ३.० अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. उत्तर प्रदेश व राजस्थान, सौराष्ट्र व कच्छ या परिसरात उणे ५.१ अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान होते. कर्नाटक, पूर्व मध्य प्रदेश, विदर्भ, कर्नाटक, उडिशा, पश्चिम बंगाल, हिमालय व सिक्कीम परिसरात १.६ ते ३.० अंश सेल्सिअसच्या दरम्यान किमान तापमान होते. उत्तर भारताकडून मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या दिशेने थंड वाऱ्याचे प्रवाह वाहत आहे.

राज्यात काही प्रमाणात असलेल्या कोरड्या हवामानामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात थंडीत चढउतार आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वी कमी झालेला पारा पुन्हा वाढून १० अंश सेल्सिअसपर्यंत गेला आहे. यामुळे अनेक ठिकाणी थंडीचे प्रमाण कमी झाले आहे. विदर्भातील बहुतांशी भागात ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ झाली आहे. विदर्भातील चंद्रपूर येथील किमान तापमान १० अंश सेल्सिअस दरम्यान होते.

कोकण, मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे असल्याने थंडी किंचित वाढली आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी कोरडे हवामान असल्याने आणि उत्तरेकडून वाहत असलेल्या थंड वाऱ्यांमुळे किंचित थंडी आहे. 

बुधवारी (ता. १) सकाळपर्यंत विविध ठिकाणचे किमान तापमान, अंश सेल्सिअसमध्ये, कंसात वाढ, घट ः  अकोला १३.९, अलिबाग १५.७, अमरावती १३.६, औरंगाबाद ११.६, बुलडाणा १३.८, चंद्रपूर १०.६, गोंदिया १४.०, जळगाव १४.६, कोल्हापूर १६.१, महाबळेश्वर १३.१, नागपूर १३.४, ब्रह्मपुरी १२.६, नांदेड १६.५, नाशिक १०.३, मालेगाव १४.२, उस्मानाबाद १४.८, परभणी १६.६, पुणे १०.८, रत्नागिरी १७.१, सांगली १५.३, सोलापूर २०.३, वर्धा १३.८.     विदर्भात पावसाची शक्यता   सध्या मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात हवामान अंशतः ढगाळ हवामान आहे. यामुळे आज (गुरुवारी) आणि उद्या (शुक्रवारी) तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. शनिवारी (ता. ४) हवामान अंशतः ढगाळ राहणार असून, रविवारपासून हवामान कोरडे राहील. त्यामुळे पुन्हा थंडीत वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com