थंडी वाढण्याची शक्यता

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  ः विदर्भात असलेली ढगाळ हवामानाची स्थिती निवळून गेली आहे. त्यामुळे पुढील काही दिवस हवामान कोरडे राहणार असून थंडीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यातील अनेक भागात गारठा वाढला आहे. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशादरम्यान कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. त्यामुळे येत्या मंगळवार (ता.७) दरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुन्हा पाऊस होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी (ता.३) सकाळी चंद्रपूर येथे ७.६ अंश सेल्सिअस अशी सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली.

विदर्भात अनेक ठिकाणी गुरुवारी (ता.२) सायंकाळी पावसाने दणका दिला. नागपूर, नांदेड, चंद्रपूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस झाला. काही ठिकाणी वादळी वारे, मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. यामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, तूर, कापूस, कांदा, संत्रा, मोसंबी, केळी आदी पिकांचे नुकसान झाले. शुक्रवारी (ता.३) विदर्भातील अनेक भागात धुके पडले होते. गारठ्यामुळे काही ठिकाणी पिकांवर दवबिंदू पडले होते. गेल्या आठवड्यात विदर्भासह राज्यातील बहुतांशी भागात थंडी वाढली होती. त्यानंतर अचानक हवामानात बदल होऊन ढगाळ वातावरण तयार झाले. त्यामुळे विदर्भातील गोंदिया, चंद्रपूर, नागपूर आदी भागात थंडी कमी होऊन किमान तापमानात चढउतार दिसून आला. मराठवाड्यातही औरंगाबाद, बीड, जालना भागात काही प्रमाणात ढगाळ हवामानाची स्थिती होती तर अधूनमधून ऊन पडत होते. कोकण, मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे होते. त्यामुळे या भागात काही प्रमाणात थंडी होती. निफाड येथे सर्वात कमी किमान तापमान नोंदविले गेले होते. शुक्रवारी महाबळेश्वर, नाशिक येथे किमान तापमान ११ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते.      

शुक्रवारी (ता. ३) सकाळपर्यंत विविध ठिकाणी असलेले किमान तापमान, अंश सेल्सिअसमध्ये, कंसात वाढ, घट ः अकोला १६.२, अलिबाग १८.१, अमरावती १५.२, औरंगाबाद १३.६, बुलढाणा १५.८, चंद्रपूर ७.६, गोंदिया १४.४, जळगाव १५.६, कोल्हापूर १६.२, महाबळेश्वर ११.५, मुंबई १८.०, नागपूर १५.५, नांदेड १६.०, नाशिक ११.२, मालेगाव १५.५, निफाड १०.२, परभणी १७.५, परभणी कृषी विद्यापीठ १८.०, पुणे १२.३, रत्नागिरी २०.१, सांगली १५.१, सातारा १३.१, सोलापूर १८.१, वर्धा १६.६, वाशीम १५.२, यवतमाळ १४.४.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com