Farmer Agricultural News weather prediction Pune Maharashtra | Agrowon

राज्यात गारठा वाढला

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 27 फेब्रुवारी 2020

पुणे  : उत्तरेकडून थंड वाऱ्यांचे प्रवाह आल्याने राज्याच्या किमान तापमानात अचानक घट होत गारठा वाढला आहे. बुधवारी (ता.२६) निफाड येथील गहू संशोधन केंद्रात नीचांक ७.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. कोकण वगळता राज्याच्या कमाल तापमानातही घट झाल्याने चटका काहीसा कमी झाला आहे. तापमानातील चढउतार कायम राहणार असून, महिना अखेरीस विविध भागांत पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.  

पुणे  : उत्तरेकडून थंड वाऱ्यांचे प्रवाह आल्याने राज्याच्या किमान तापमानात अचानक घट होत गारठा वाढला आहे. बुधवारी (ता.२६) निफाड येथील गहू संशोधन केंद्रात नीचांक ७.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. कोकण वगळता राज्याच्या कमाल तापमानातही घट झाल्याने चटका काहीसा कमी झाला आहे. तापमानातील चढउतार कायम राहणार असून, महिना अखेरीस विविध भागांत पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.  

बुधवारी (ता.२६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भाच्या किमान तापमानात ४ ते ६, मराठवाड्यात १ ते ४ आणि मध्य महाराष्ट्रात १ ते ३ अंशांची घट झाली आहे. तापमानात घट झाल्याने गारठा अचानक वाढला आहे. राज्याच्या कमाल तापमानाही काहीशी घट झाली असली, तरी कोकणात मात्र तापमान वाढले आहे. सांताक्रूझ येथे राज्यातील उच्चांकी ३७.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. राज्यात पावसाला पोषक हवामान होत असल्याने शनिवारी विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.  

बुधवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे किमाल व किमान (कंसात) तापमान, (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३१.७ (१२.२), नगर ३२.५ (१४.७), धुळे  ३१.० (१०.०), जळगाव ३२.२ (१२.२), कोल्हापूर ३३.१ (१९.२), महाबळेश्‍वर २९.३ (१४.५), मालेगाव ३०.६ (१३.०), नाशिक ३०.५ (१२.८), निफाड २४.५ (७.८), सांगली ३५.० (१८.०), सातारा ३२.० (१६.१), सोलापूर ३४.७ (१९.१), अलिबाग ३४.२, डहाणू ३३.६ (१८.८), सांताक्रूझ ३७.४ (२२.०), रत्नागिरी ३३.१ (२०.३), औरंगाबाद ३०.४ (१४.६), परभणी ३२.४ (१३.४), नांदेड ३५.५ (१७.०), अकोला ३३.० (१२.६), अमरावती ३१.२ (१३.६), बुलडाणा २७.८ (१३.६), चंद्रपूर ३२.५ (१४.६), गोंदिया २५.८ (१५.५), नागपूर ३०.४ (११.३), वर्धा ३१.० (१३.५), यवतमाळ ३०.० (१५.०).


इतर अॅग्रो विशेष
राज्यात दिवसभरात १५० नवीन रुग्ण, १२...पुणे : राज्यात कोरोनाचा संसर्ग झालेल्या...
शेतीमाल थेट विक्रीचा समन्वय भक्कम केला...नगर ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर संचारबंदी...
राज्यात शुक्रवारपासून वादळी पावसाचा...पुणे  : राज्यात उन्हाचा ताप वाढत असल्याने...
कृषी रसायन कंपन्यांचा कच्चा माल अडकलापुणे  : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लागू...
व्यावसायिक चातुर्यातून ४० टन कलिंगडाची...कोरोना संकटामुळे शेतमाल विक्री व्यवस्था अडचणीत...
गोदामांत ९० लाख टन साखर पडून; बंदरात...सोलापूर : अडचणीत सापडलेला साखर उद्योग २०१४-१५...
‘डिपिंग ऑईल’ची चढ्यादराने अनाधिकृत...नाशिक/सोलापूर : जिल्ह्यात द्राक्ष मालाला उठाव...
राज्यात दिवसभरात वाढले १२० रुग्ण;...पुणे : राज्यात सोमवारी १२० नवीन रुग्णांची...
मराठवाड्यात १०० वर लघु मध्यम प्रकल्प...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७३ लघु, मध्यम, मोठ्या...
रब्बी कांदा उत्पादन २५ लाख टनांनी वाढणारपुणे : देशाच्या कांदा बाजारपेठांमध्ये यंदाच्या...
भाजीपाल्याच्या नव्या लागवडीबाबत संभ्रम...कोल्हापूर : ‘कोराना’च्या संकटामुळे गेल्या काही...
अर्धबंदिस्त शेळीपालनाने वाढवले शेतीचे...कृषी विषयात पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर...
पूर्व विदर्भात पावसाला पोषक हवामानपुणे  : राज्यात तापमानाचा पारा सातत्याने...
`अमूल`कडून शेतकऱ्यांना मंदीतही २००...पुणे : राज्यातील डेअरी उद्योग सध्या अतिशय बिकट...
राज्यात कोरोना रुग्णसंख्या ७४८;...मुंबई : राज्यातील कोरोनाचा विळखा वाढत चालला...
केंद्र सरकारकडून रासायनिक खत अनुदानात...पुणे: ऐन लॉकडाऊनच्या गोंधळात केंद्र सरकारने...
शेतकरी कंपन्यांची संकलन केंद्रे...पुणे:  ‘ई-नाम’ प्रणालीत गेल्या दोन...
कोरोनामुळे हापूस अडचणीत; मुंबई बाजार...मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वाशी...
कोरोनामुळे ‘टोमॅटो बेल्ट’ लॉकडाऊन; पुणे...पुणेः गेल्या काही वर्षात जिल्‍ह्यातील जुन्नर, खेड...
कोल्हापूर कृषी महाविद्यालयाकडून...कोल्हापूर : येथील कोल्हापूर कृषी महाविद्यालयाच्या...