Farmer Agricultural News weather prediction Pune Maharashtra | Agrowon

उद्यापासून मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी पावसाचा अंदाज

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 9 एप्रिल 2020

पुणे  : राज्यात तापमानाचा पारा चाळीशीपार गेल्याने उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. बुधवारी (ता.८) मालेगाव येथे उच्चांकी ४१.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. उन्हाचा वाढलेला चटका कायम राहणार आहे. उद्यापासून (ता.१०) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाचा अंदाज आहे. विदर्भ, कोकणातही तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

पुणे  : राज्यात तापमानाचा पारा चाळीशीपार गेल्याने उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. बुधवारी (ता.८) मालेगाव येथे उच्चांकी ४१.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. उन्हाचा वाढलेला चटका कायम राहणार आहे. उद्यापासून (ता.१०) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाचा अंदाज आहे. विदर्भ, कोकणातही तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

चैत्र महिना सुरू असतानाच, वैशाख वणवा जाणवू लागला आहे. कोकण, महाबळेश्‍वर वगळता सर्वच ठिकाणी तापमान ३६ अंशांच्या पुढे गेले आहे. बुधवारी (ता.८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मालेगावसह धुळे, सोलापूर, परभणी, अकोला, वर्धा येथे तापमान चाळीशी पार होते. जळगाव, सोलापूर, ब्रह्मपुरी येथे तापमानात काहीशी घट झाली होती. उन्हाचा चटका वाढणार असून, उकाडाही कायम राहण्याची शक्यता आहे.

मध्य प्रदेश आणि विदर्भ परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती विरून गेली. रायलसीमापासून दक्षिण तामिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान होत असून, उद्यापासून (ता.१०) राज्याच्या चारही हवामान विभागात पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.  

बुधवारी (ता. ८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल व किमान (कंसात) तापमान, (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३७.९, जळगाव ३९.५, धुळे ४०.२, कोल्हापूर ३६.७, महाबळेश्‍वर ३१.१, मालेगाव ४१.६, नाशिक ३६.१, निफाड ३६.५, सांगली ३६.२, सातारा ३७.६, सोलापूर ४०.२, डहाणू ३२.९, सांताक्रूझ ३३.५, रत्नागिरी ३२.३, औरंगाबाद ३७.४, परभणी ४०.५, अकोला ४०.८, अमरावती ४०.२, बुलडाणा ३८.०, ब्रह्मपुरी ३९.४, गोंदिया ३७.४, नागपूर ३९.४, वर्धा ४०.५.


इतर अॅग्रो विशेष
कृषी विधेयकांमध्ये मोठा विरोधाभास ः शरद...मुंबई : कृषी विधेयकांवर राज्यसभेत दोन ते तीन दिवस...
तुरीचे दर प्रतिक्विंटल सहा हजारांवरनागपूर : स्थानिक प्रक्रिया उद्योजकांकडून मागणी...
सूक्ष्मदर्शक, स्वयंचलित हवामान केंद्र...तंत्रज्ञान समजून वापर केला तर शेती सुलभ होऊ शकते...
तिढा सुटावा लवकर!मागील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असताना राज्यात...
कांदा निर्यातबंदी आवडे सरकारलाकेंद्र सरकारने अचानक कांद्यावर निर्यातबंदी लादली...
खानदेशातील सिंचन प्रकल्प भरलेजळगाव : खानदेशात या महिन्यातील जोरदार पावसाने...
मराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन...औरंगाबाद : सततच्या पावसाने औरंगाबाद, जालना, बीड...
खानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेगजळगाव : खानदेशात कांदेबाग केळी काढणी सुरू झाली...
शेती विधेयकांविरोधात शुक्रवारी बंदपुणे ः केंद्र सरकारने लोकसभेत पास केलेल्या...
राहुरी कृषी विद्यापीठासाठी नव्या...पुणे: महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या...
कांदा बियाण्याची टंचाईनगरः गेल्यावर्षी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे...
‘कृषी’तील ‘वतनदारी’ निवृत्तीनंतरही कायमपुणे: कृषी आयुक्तालयात वर्षानुवर्षे राखलेली ‘...
वऱ्हाडातील मोठे, मध्यम प्रकल्प तुडुंबअकोला ः वऱ्हाडात बहुतांश तालुक्यांमध्ये पावसाने...
मध्य महाराष्ट्र, कोकणात वादळी पावसाचा...पुणे ः महाराष्ट्राच्या उत्तर किनारपट्टीवर...
पावसाचा कहर, पिकांची नासाडी सुरुचपुणे ः राज्यात पावसाचा जोर वाढतच आहे. रविवारी (ता...
सांगली : डाळिंब बागांचे ५० कोटींहून...सांगली ः डाळिंबाला अगोदर निसर्गाची साथ मिळाली...
`क्रॉपसॅप`मध्ये ३३ कोटींची कपात पुणे: कोविड १९ मुळे ग्रामीण भागात तयार झालेल्या...
पशुपालन,दूध प्रक्रियेतून वाढविला नफाशिरसोली (जि.जळगाव) येथील डिगंबर रामकृष्ण बारी...
संरक्षित शेतीतून शाश्वत उत्पादनाकडे...वाढत असलेली दुष्काळी परिस्थिती आणि बदलते हवामान...
बळीराजालाच बळी देण्याचा प्रकार?शेती क्षेत्रातील सुधारणाविषयक तीन वटहुकूम असोत...