Farmer Agricultural News weather prediction Pune Maharashtra | Agrowon

विदर्भ, कोकणात हलक्या पावसाची शक्यता 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 6 मे 2020

पुणे  : विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात वाढलेले ऊन तापदायक ठरत आहे. मंगळवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी अकोला येथे देशातील उच्चांकी ४४.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता.६) विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहणार आहे. विदर्भ आणि कोकणात तुरळक ठिकाणी वळीव स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे. 

पुणे  : विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात वाढलेले ऊन तापदायक ठरत आहे. मंगळवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी अकोला येथे देशातील उच्चांकी ४४.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता.६) विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहणार आहे. विदर्भ आणि कोकणात तुरळक ठिकाणी वळीव स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे. 

राज्यात वैशाख वणवा वाढला असून, विदर्भ, मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रात सातत्याने तापमान ४३ अंशांच्या पुढे आहे. परभणी, अकोला, अमरावती, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, नागपूर, वर्धा येथे कमाल तापमान ४४ अंशापेक्षा अधिक असून, जळगाव, धुळे, मालेगाव, नांदेड, गोंदिया येथे ४३ अंशापेक्षा अधिक तापमान नोंदले जात आहे. पुणे, कोल्हापूर, महाबळेश्‍वर, नाशिक, निफाड, सांगली येथे तापमान चाळीस अंशांच्या खाली आहे. तर कोकणात कमाल तापमानाचा पारा ३३ ते ३४ अंशाच्या दरम्यान आहे. 

विदर्भात सक्रिय असलेला दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा काहीसा पूर्वेकडे सरकला आहे. विदर्भ आणि कोकणात पावसाला पोषक हवामान आहे. भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर तसेच कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात दक्षिण अंदमान समुद्र आणि परिसरावर असलेले कमी दाब क्षेत्र कायम आहे. 

मंगळवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३९.१, जळगाव ४३.५, धुळे ४३.०, कोल्हापूर ३८.५, महाबळेश्‍वर ३२.८, मालेगाव ४३.२, नाशिक ३८.१, निफाड ३९.०, सांगली ३९.७, सोलापूर ४२.७, डहाणू ३३.५, सांताक्रूझ ३४.२, रत्नागिरी ३४.१, औरंगाबाद ४१.५, परभणी ४४.०, नांदेड ४३.५, अकोला ४४.९, अमरावती ४४.४, बुलडाणा ४१.६, ब्रह्मपुरी ४४.८, चंद्रपूर ४४.०, गोंदिया ४३.४, नागपूर ४४.८, वर्धा ४४.५. 


इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यात जोरदार पावसाचा पिकांना फटकाऔरंगाबाद, परभणी : औरंगाबाद, जालना, बीड, लातूर,...
हजारो टन कांदा निर्यातीच्या प्रतीक्षेतमुंबई/नाशिक : देशभरात कांदा निर्यातबंदी...
बीटी वांग्याच्या दुसऱ्या टप्प्यातील...पुणे : देशभरात चर्चेत असलेल्या बीटी वांग्याच्या...
साखर निर्यातीचे करार ५७ लाख टनांवरकोल्हापूर : देशातल्या साखर निर्यातीचे करार आता ५७...
तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यतापुणे ः बंगालचा उपसागर व उत्तर तामिळनाडूच्या...
दूध सल्लागार समिती कागदावरचपुणे : राज्यस्तरीय दूध सल्लागार समितीची एकही बैठक...
राज्यात मोसंबी १००० ते ४००० रुपये...औरंगाबादमध्ये १००० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल...
कांदा, लसूण शेतीत बहिरवाडीने मिळवली...बहिरवाडी (ता. जि. नगर) हे छोटे गाव कांदा व लसूण...
स्पर्धेत टिकण्यासाठी ‘ई-नाम’केंद्र सरकारने कृषी, पणन व्यवस्थेत सुधारणा घडवून...
बाजार सुधारणांत नको राजकीय धुळवडकोरोनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या संसद...
सुपारी फळगळीचे संकटसिंधुदुर्ग: मुसळधार झालेला पाऊस आणि सतत ढगाळ...
कोकण, मराठवाड्यात पावसाची शक्यतापुणे ः गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही...
कांदा निर्यातबंदीविरोधात मराठवाड्यातही...औरंगाबाद/परभणी: केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी...
निर्यातबंदीमुळे कांदा दरात मोठी घसरणनाशिक: केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केल्याचा...
कांदा निर्यातबंदी विरोधात नाशिक...नाशिक: प्रतिकूल हवामान, वाढलेला उत्पादन खर्च व...
‘स्मार्ट’च्या २८ पथदर्शक प्रकल्पांना...पुणे: कृषी खात्याच्या ‘स्मार्ट’ प्रकल्पातून...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष फळ छाटणी...सांगली ः जिल्ह्यात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात...
मराठवाड्यात पावसाचा जोर कायमपुणे ः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील...
राज्यात तीन वर्षांत ‘ई-नाम’द्वारे ...पुणे: केंद्र सरकारने सुरु केलेल्या राष्ट्रीय...
दर्जेदार रोपनिर्मिती पेपरपॉट, पीट मॉसचा...रोपनिर्मिती चांगल्या प्रकारे होण्यासाठी...