कोकणात मुसळधार पावसाचा इशारा

पुणे : अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्रामुळे राज्याच्या किनारपट्टीवर चक्रीवादळाचे संकेत आहेत. यामुळे अरबी समुद्रात ढगांची दाटी झाली आहे. आज (ता.१) कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यातही वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
कोकणात मुसळधार पावसाचा इशारा
कोकणात मुसळधार पावसाचा इशारा

पुणे  : अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्रामुळे राज्याच्या किनारपट्टीवर चक्रीवादळाचे संकेत आहेत. यामुळे अरबी समुद्रात ढगांची दाटी झाली आहे. आज (ता.१) कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यातही वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान होत असल्याने राज्यातही ढग गोळा होऊ लागले आहेत. राज्यातील उन्हाची लाट ओसरली असली तरी, उन्हाचा चटका कायम आहे. रविवारी (ता.३१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील वर्धा, मराठवाड्यातील नांदेड येथे उच्चांकी ४३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रात कमाल तापमान ३० ते ४२ अंश, कोकणात ३५ ते ३७ अंश, मराठवाडा व विदर्भात ४० ते ४३ अंशांच्या दरम्यान होते.

आज (ता.१) कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, दक्षिण मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. सातारा, सांगली, सोलापूर, पुणे, नगर, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. तसेच रायगड, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोलीसह विदर्भातील जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार वारे, मेघगर्जना, विजांसह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.   रविवारी (ता. ३१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३७.९, धुळे ४१.४, जळगाव ४१.०, कोल्हापूर ३६.६, महाबळेश्‍वर ३०.७, मालेगाव ४१.२, नाशिक ३६.४, निफाड ४१.०, सांगली ३७.३, सातारा ३७.८, सोलापूर ४०.०, डहाणू ३५.२, सांताक्रूझ ३५.७, रत्नागिरी ३६.५, औरंगाबाद ३९.७, परभणी ४१.०, नांदेड ४३.०, अकोला ४२.६, अमरावती ४०.६, बुलडाणा ४०.३, ब्रह्मपुरी ४१.३, चंद्रपूर ४२.०, गोंदिया ३८.६, नागपूर ४१.६, वर्धा ४३.०.

  पश्‍चिम महाराष्ट्र, कोकणात पूर्वमोसमीच्या सरी पश्‍चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकणात रविवारी (ता.३१) वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमीच्या सरी कोसळल्या. सकाळपासूनच दमट हवामान असल्याने उकाडा वाढला होता. दुपारनंतर कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात ढगाळ हवामान झाले होते. पुणे व पिंपरी चिंचवड शहर, उपनगर, हवेली, भोर, वेल्हा तालुका परिसरात वादळी वारे, मेघगर्जनेसह पावसाला सुरवात झाली.

सांगली जिल्ह्यातील तासगाव परिसरात जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. बलगवडे मांजर्डे येथे गारपिटीसह पावसाने हजेरी लावली. सातारा शहरासह ग्रामीण भागात जोरदार वाऱ्यासह पाऊस पडला. कोल्हापूरच्या पश्चिम भागाला मॉन्सूनपूर्व पावसाने झोडपले. शहरासह पन्हाळा गगनबावडा तालुक्यात पावसाचा जोर अधिक होता. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पावसाला सुरवात झाली होती. या पावसामुळे खरीप हंगामातील पूर्वमशागतीच्या कामांना वेग येणार असून, धूळवाफ पेरण्यांना हा पाऊस लाभदायक ठरणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com