कोकण, मध्य महाराष्ट्रात पाऊस जोर धरणार

पुणे : राज्यात पावसाचा जोर वाढण्यासाठी पोषक हवामान तयार होत आहे. उद्यापासून (ता. ३) कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  : राज्यात पावसाचा जोर वाढण्यासाठी पोषक हवामान तयार होत आहे. उद्यापासून (ता. ३) कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. बुधवारी (ता. १) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात हलका ते जोरदार स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे १२० मिलिमीटर, तर परभणी येथे १०५ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. 

पश्चिम किनारपट्टीला समांतर असलेला कमी दाबाचा पट्टा, गुजरात आणि परिसरावर असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती यामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (ता. २) कोकणात अनेक ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार सरी पडण्याचा अंदाज आहे. उद्या (ता. ३) कोकणात आणि शनिवारी (ता. ४) कोकणासह मध्य महाराष्ट्रात अतिजोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 

बुधवारी (ता. १) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत - हवामान विभाग) : कोकण : विक्रमगड २१, सुधागडपाली ४०, चिपळूण ३२, गुहागर २०, हर्णे २५, संगमेश्वर २५, देवगड ५८, दोडामार्ग २५, कणकवली २४, कुडाळ ३२, मालवण ५७, रामेश्वर ७१, सावंतवाडी ३७. मध्य महाराष्ट्र : शिरूर १२०, पारोळा ३७, मिरज ३५, तासगाव २१, महाबळेश्वर ४२, जेऊर २५.  मराठवाडा : अंबाजोगाई २५, परळी वैजनाथ २४, औंढा नागनाथ ३७, आंबड २४, रेणापूर ५०, अर्धापूर २२, धर्माबाद ७२, हिमायतनगर ३६, कंधार २३, नायगाव खैरगाव ४२, उमरी ५९, मानवत २८, परभणी १०५, पूर्णा ८०, सेलू २०, सोनपेठ ४५.  विदर्भ : अंजणगाव २०, बटकुली ३३, चांदूरबाजार ४०, दर्यापूर ६०, मोर्शी ३१, नांदगाव काझी ८९, तिवसा २१, वरूड २१, भंडारा २९, लाखणी २३, कोर्पणा २२, हिंगणा ३१, कळमेश्वर २९, कामठी ४४, काटोल २५, कुही ३८, मौदा ३०, नागपूर ४८, पारशिवणी ४०, आर्वी ३२, आष्टी ३८, देवळी ३२, खारंघा ३१, सेलू ३०, वर्धा २५, कळंब २७.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com