कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधारेचा इशारा

पुणे : राज्यात मॉन्सून सक्रिय झाल्याने पावसाने जोर धरला आहे. मुंबईसह कोकण, विदर्भात अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. आज (ता.१६) कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातही हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
संग्रहित छायाचित्र

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सुरतगडपासून बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला आहे. यातच पश्चिम किनारपट्टीवर हवेच्या खालच्या थरात जोरदार वाहणाऱ्या वाऱ्यामुळे कोकणात पावसाने जोर धरला आहे. विदर्भातही मुसळधार पाऊस पडत आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे.

आज (ता.१६) कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा ‘ऑरेंज ॲलर्ट’ हवामान विभागाने दिला आहे. यात रायगड, ठाणे, पालघर, पुणे, सातारा, नाशिक जिल्‍ह्यात मुसळधार पावसाचा इशारा आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूरमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा, तर विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ जिल्ह्यात जोरदार सरी पडण्याचा अंदाज आहे. उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com