Farmer Agricultural News weather prediction Pune Maharashtra | Agrowon

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा अंदाज

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 30 जुलै 2020

पुणे  : मॉन्सून सक्रिय होण्यास पोषक हवामान झाल्याने राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे. आज (ता. ३०) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे.

पुणे  : मॉन्सून सक्रिय होण्यास पोषक हवामान झाल्याने राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे. आज (ता. ३०) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह पाऊस पडणार असून, विदर्भातही हलक्या ते मध्यम सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. बुधवारी (ता.२९) दुपारनंतर कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाला सुरुवात झाली होती.    

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे सरकून सर्वसामान्य स्थितीत आला आहे. बंगालच्या उपसागरात आंध्र प्रदेश, तामिळनाडूच्या किनाऱ्यालगत चक्राकार वारे वाहत आहेत. त्यापासून विदर्भापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने राज्यात पाऊस सुरू होण्यास पोषक हवामान होत आहे. बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली. दुपारनंतर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात ढगांची दाटी होऊ लागली होती. 

आज (ता. ३०) कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर, नंदूरबार, धुळे, जळगाव, मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. राज्याच्या उर्वरित भागातही ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम सरी पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

बुधवारी (ता. २९ ) सकाळपर्यंतच्या २४ तासांत राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्त्रोत - हवामान विभाग) : कोकण : कुलाबा ८९, वसई ७४, विक्रमगड ५१, अलिबाग ९३, खालापूर ३६, मुरूड ५३, मालवण ४५, अंबरनाथ ७०, भिवंडी ६५, उल्हासनगर ५१.
मध्य महाराष्ट्र : पाथर्डी ४५, ओझरखेडा ३१, बार्शी ४२, 
मराठवाडा : वसमत ३७, चाकूर ६१, शिरूर अनंतपाळ ५३, पूर्णा ३५. 
विदर्भ : धामणगाव रेल्वे ३०, नांदगाव काझी ४७, भद्रावती ५२, ब्रह्मपुरी ४७, गोंडपिंपरी ४१, जेवती ३४, कोर्पणा ४१, मूल ४३, पोंभुर्णा ८५, वरोरा ६१, चामोर्शी ३०, एटापल्ली ३४, हिंगणा ३०, देवळी ३४, समुद्रपूर ३७, सेलू ४९, वर्धा ५०, करंजालाड ३५, मंगरूळपीर ३०, मानोरा ६४, अर्णी ४१, बाभुळगाव ५८, दारव्हा ४०, यवतमाळ ३२. 


इतर अॅग्रो विशेष
तुरळक ठिकाणी मुसळधार शक्य पुणे : कोकणसह राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस...
हा तर मत्स्य दुष्काळाच! जगातील आघाडीच्या ‘ब्लू इकॉनॉमी’मध्ये भारताचा...
कोकण, मराठवाड्यात जोरदार पावसाची हजेरी पुणे : राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर कमी झाला...
पेरणीची घाई नको : कृषी आयुक्तालयपुणेः राज्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर...
मॉन्सूनला पोषक वातावरण पुणे : नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) वेगाने प्रवास...
दूध दरातील कापतीने शेतकऱ्यांची परवड औरंगाबाद: महिनाभरातच दुधाच्या दरात तब्बल ११...
पीककर्ज व्याज सवलत योजनेचे पालकत्व...पुणेः शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने तीन...
राज्यातील प्रकल्पांमध्ये केवळ २१ टक्के...पुणे ः मे आणि जून महिन्यात पाण्याची मागणी...
कमी दराने कांदा खरेदी सुरूच नाशिक : सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
सोयाबीन लागवड क्षेत्रात दहा टक्के...नागपूर : देशात सोयाबीन लागवड क्षेत्र आणि...
दूध दरासाठी गुरुवारी आंदोलन नगर : लॉकडाउनचा गैरफायदा घेत दूध उत्पादक...
विद्यापीठाच्या वाणांमुळे शेतकऱ्यांना ९५...नगर ः महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित...
गांडुळखताचा लोकप्रिय केला शुभम ‘ब्रॅण्ड’सोलापूर जिल्हयातील उपळाई बुद्रूक येथील महादेव...
सिंधुदुर्गमध्ये मुसळधारसिंधुदुर्गनगरी : जिल्ह्याच्या काही भागात मुसळधार...
प्रयोगशील, अभ्यासपूर्ण शेतीचा आदर्शतिडका (जि. औरंगाबाद) येथील युवा शेतकरी ईश्‍वर...
शेतकऱ्यांचे धान बोनसचे १७ कोटी रुपये...चंद्रपूर : गेल्या खरीप हंगामात विक्री केलेल्या...
मॉन्सून उद्या दिल्लीत पुणे : नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) वेगाने उत्तरेत...
समुद्रातील माशांचा साठा केवळ ६६ टक्के...रत्नागिरी ः समुद्रातील माशांचा साठा कमी होत असून...
दीडपट हमीभावाचा केंद्राचा दावा फसवा पुणेः किमान आधारभूत किमतीच्या (एमएसपी) माध्यमातून...
नाशिक जिल्ह्यात सोयाबीन बियाण्याची ...नाशिक : अनेक शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीन पेरणीला...