राज्यात मुसळधारेचा इशारा

पुणे ः उत्तर महाराष्ट्र ते लक्षद्वीप दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. आजपासून (बुधवार) पुढील चार ते पाच दिवस राज्यातील अनेक भागात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तवला आहे.
राज्यात मुसळधारेचा इशारा
राज्यात मुसळधारेचा इशारा

पुणे  ः उत्तर महाराष्ट्र ते लक्षद्वीप दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा पाऊस जोर धरण्याचा अंदाज आहे. आजपासून (बुधवार) पुढील चार ते पाच दिवस राज्यातील अनेक भागात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तवला आहे.

गेल्या तीन ते चार दिवसांपासून अरबी समुद्राच्या पूर्वमध्य, आग्नेय भाग आणि कर्नाटकदरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्याचे चक्राकार वाऱ्यांमध्ये रूपांतर होण्याची शक्यता असून ही स्थिती समुद्रसपाटीपासून दीड किलोमीटर आणि ५.८ किलोमीटर उंचीवर आहे. तसेच आंध्र प्रदेश व बंगालचा उपसागर या दरम्यान चक्राकार वाऱ्याची स्थिती असून ती समुद्रसपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर आहे.  

पश्चिम आसाम आणि हिमालय, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम दरम्यान समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. उत्तर प्रदेशचा ईशान्य परिसर ते पश्चिम राजस्थान दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र असून ते समुद्रसपाटीपासून ३.६ किलोमीटर उंचीवर आहे. कोकण व मध्य महाराष्ट्रात आज (बुधवारी) तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पाऊस पडण्याची शक्यता आहे.

विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. उद्यापासून (गुरुवारी) मराठवाडा व विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पुणे परिसरातही मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा तर घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com