Farmer Agricultural News weather prediction Pune Maharashtra | Agrowon

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा अंदाज

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 1 ऑक्टोबर 2020

पुणे ः आज (ता. १) नाशिक, नगर, पुणे तसेच मराठवाड्यातील बीड, लातूर जिल्ह्यात आणि विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे.

पुणे  ः मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत हवामान ढगाळ आहे. त्यामुळे आज (ता. १) नाशिक, नगर, पुणे तसेच मराठवाड्यातील बीड, लातूर जिल्ह्यात आणि विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे.

गेल्या आठवडाभरापासून राज्यातील अनेक भागांत पावसाने उघडीप दिली आहे. तसेच कमाल तापमानातही वाढ झाली आहे. मात्र, बुधवारी (ता.३०) दुपारपासून अचानक ढगाळ वातावरणाची स्थिती तयार झाली. त्यामुळे कमाल तापमानाचा पारा कमी झाला होता. येत्या चार ते पाच दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. विदर्भात उद्या (शुक्रवारी) तुरळक सरी पडतील. शनिवारपासून उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता आहे.  

विदर्भातील ब्रम्हपुरी येथे राज्यातील सर्वाधिक ३५.१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. पुण्यातही उन्हाचा पारा वाढला असून कमाल तापमान ३१.१ अंश सेल्सिअस नोंदले गेले. 

बुधवारी (ता.३०) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला पाऊस, मिलिमीटरमध्ये ः (स्रोत, हवामान विभाग)

  • कोकण ः सांताक्रुज ५.४, तलासरी २.२, माथेरान १.१, ठाणे १.
  • मध्य महाराष्ट्र : कोपरगाव १, श्रीगोंदा १३, रावेर २, इंदापूर ३५.२, आटपाडी १०, कारेगाव १५, माळशिरस २.
  • मराठवाडा : धारूर २, धर्माबाद ३, माहूर २, मुदखेड २.
  • विदर्भ : चांदूरबाजार ३.८, धामणगाव रेल्वे ६.५, तिवसा २७.५, ब्रह्मपुरी ८.७, नागभीड २.९, पोंभुर्णा १६.४, सिंदेवाही २.७, अहेरी १८.५, आरमोरी १५.१, भामरागड १६.६, चामोर्शी ७.६, मुलचेरा १२.२, आमगाव १२.१, गोंदिया २.३, गोरेगाव ९.८, नागपूर १४.६, आर्वी ३.१, खारंघा २.६, वर्धा ४.३, बाभुळगाव २.६, कळंब ६.४, नेर ४.१, यवतमाळ २.९.

इतर अॅग्रो विशेष
बुडून गेलं रान देवा, वाहून गेलं शिवार...कोल्हापूर : उसवलं गणगोत सारं, आधार कुनाचा न्हाई...
पांढऱ्या कापसाचे काळे वास्तवदेशातील सूत गिरण्या आता ९५ टक्के कार्यक्षमतेने...
शेतकऱ्यांच्या कष्टाचे झाले निर्माल्यरिमझिम पाऊस, थेंब पाकळीवर पडला ओघळून जाताना...
अतिवृष्टीचा मराठवाड्यात २३ लाख हेक्टरला...औरंगाबाद : यंदा खरिपात अतिवृष्टी व सततच्या...
केळी पीक विम्याबाबत आज बैठकजळगाव ः हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत केळी...
राज्यात पावसाचा प्रभाव कमी झालापुणे ः राज्यात गेल्या काही दिवस जोरदार पाऊस...
राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊसपुणे ः राज्यातील काही भागात पावसाने उघडीप दिली...
पीक विमा तक्रार निवारणासाठी कोठे जाल?राज्यात यंदा खरीप हंगामात उत्तम पेरा झाला होता....
राज्यात पावसाचा कमीअधिक जोर राहणारपुणे ः राज्यातील अनेक भागात पावसाने काहीशी उघडीप...
पणन सुधारणा कायदे शेतकरी हिताचेच!शेतीमालाच्या मार्केटमध्ये दराच्या बाबतीत कधीही...
रिसोर्स बॅंक ः स्तुत्य उपक्रमहवामान बदलाच्या चरम सीमेवर आता आपण आहोत. खरे तर...
कांदा दर नियंत्रणासाठी केंद्र सरकारचा...मुंबई : कांदा दर नियंत्रणासाठी केंद्र सरकारचा...
‘बायोमिक्स’ विक्रीतून कृषी विद्यापीठाला...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...
जरासं पहा ना साहेब, पाणीच पाणी वावरात...परभणी ः सदोष बियाण्यांमुळे दुबार, तिबार पेरणी...
परतीचा मॉन्सून राज्यातून चार दिवसांत...पुणे ः परतीच्या पाऊस सुरू असताना बंगालच्या...
कृषी कायद्यांविरोधात पंजाबकडून स्वतंत्र...चंडीगड : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन...
खारपाणपट्ट्यातील समस्यांवर...दापुरा (ता. जि. अकोला) येथील स्वप्नील व संदीप या...
सुर्डीतील तरुणांनी तेरा पाझर तलावांना...वैराग, जि. सोलापूर ः ‘वॉटर कप’ स्पर्धेत राज्यात...
कापूस विक्रीसाठी नोंदणी थांबविलीजळगाव ः शासकीय केंद्रात कापूस विक्रीसाठी बाजार...
प्रयोगशील दुग्ध व्यवसायातून पुढारले...माळीसागज (जि. औरंगाबाद) गावात कोरडवाहू क्षेत्र...