पुणे जिल्ह्यात गहू काढणीची कामे वेगात

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  ः गेल्या काही दिवसांपासून सतत बदलत असलेल्या हवामानामुळे नुकसान होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी गहू पिकाच्या काढणीस सुरुवात केली आहे. सध्या या कामांना चांगलाच वेग आला असून अनेक ठिकाणी मळणीची लगबगही सुरू झाली आहे. अनेक शेतकरी पारंपरिक पद्धतीऐवजी हार्वेस्टरद्वारे गहू काढणीवर भर देत आहेत.

सध्या गहू काढणीची कामे वेगात सुरू आहे. ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीने एक एकर गहू काढणीसाठी सुमारे चार हजार तर मळणीसाठी अडीच ते तीन हजार रुपयांचा खर्च येतो. मात्र, हेच काम हार्वेस्टरद्वारे अवघ्या अडीच ते तीन हजार रुपयांत होत असल्याने अनेक शेतकरी हार्वेस्टरद्वारे गहू काढणीवर भर देऊ लागले आहे. त्यासाठी पंजाब, हरियाणा या राज्यांतून यंत्रे पुणे विभागात दाखल झाली आहेत.

जिल्ह्यात गव्हाचे सरासरी क्षेत्र ६३ हजार ८५४ हेक्टर आहे. यंदा त्यापैकी सुमारे ३९ हजार २२७ हेक्टरवर पेरणी झाली. बारामती तालुक्यात सर्वाधिक क्षेत्रावर गव्हाची पेरणी झाली. त्यापाठोपाठ जुन्नर, इंदापूर, दौंड, पुरंदर या तालुक्यात पेरणी झाली. मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, हवेली, खेड या तालुक्यांत तुलनेत कमी क्षेत्रावर गव्हाची पेरणी झाली आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com