Farmer Agricultural News wheat sowing status in region Pune Maharashtra | Page 2 ||| Agrowon

पुणे विभागात गव्हाचा १ लाख ६८ हजार हेक्टरवर पेरा

टीम अॅग्रोवन
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

पुणे  ः पुणे विभागात गव्हाच्या पेरण्या उरकल्या असून, अनेक ठिकाणी गहू पीक वाढीच्या अवस्थेत आहे. विभागात गव्हाचे सरासरी क्षेत्र एक लाख ५४ हजार ८४२ हेक्टर असून, त्यापैकी एक लाख ६८ हजार ७७० हेक्टरवर म्हणजेच १०९ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यंदा उशिरा पोषक हवामान तयार झाले. त्यानंतर विभागात गव्हाच्या पेरण्यांना चांगला वेग आला होता, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

पुणे  ः पुणे विभागात गव्हाच्या पेरण्या उरकल्या असून, अनेक ठिकाणी गहू पीक वाढीच्या अवस्थेत आहे. विभागात गव्हाचे सरासरी क्षेत्र एक लाख ५४ हजार ८४२ हेक्टर असून, त्यापैकी एक लाख ६८ हजार ७७० हेक्टरवर म्हणजेच १०९ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यंदा उशिरा पोषक हवामान तयार झाले. त्यानंतर विभागात गव्हाच्या पेरण्यांना चांगला वेग आला होता, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

यंदा चांगल्या पावसामुळे गव्हाच्या पेरणीच्या क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तवला होता. गव्हाच्या पेरणीस नोव्हेंबर ते डिसेंबर हा कालावधी चांगला असतो. मात्र, उशिरा पाऊस झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी उशिराने पेरण्या करण्यास सुरुवात केली. सध्या पीकवाढीच्या अवस्थेत आहे. काही लवकर पेरणी झालेल्या ठिकाणी गहू ओंबी निसवण्याच्या अवस्थेत आहे. पुणे जिल्ह्याचा पूर्वेकडील भाग, नगर जिल्ह्यातील उत्तरेकडील तालुके, सोलापूरातील अक्कलकोट, मंगळवेढा, दक्षिण सोलापूर हे तालुके गव्हाच्या पिकासाठी ओळखले जातात.

चालू वर्षी विभागात अक्कलकोट तालुक्यात गव्हाची सर्वाधिक पेरणी झाली आहे. नगर जिल्ह्यात सर्वाधिक ९ हजार ९८३ हेक्टरवर गव्हाची पेरणी कोपरगाव तालुक्यात झाली आहे. त्याखालोखाल नगर, श्रीरामपूर, राहुरी, संगमनेर, शेवगाव, श्रीगोंदा, राहाता या तालुक्यांत गव्हाची पेरणी झाली आहे. जामखेड तालुक्यात पाण्याची उपलब्धता अधिक नसल्याने सर्वात कमी क्षेत्रावर गव्हाची पेरणी झाली आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात सर्वाधिक क्षेत्रावर गव्हाची पेरणी झाली आहे. त्यापाठोपाठ जुन्नर, इंदापूर, दौंड, पुरंदर या तालुक्यांत पेरणी झाली आहे. पश्चिमेकडील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, हवेली, खेड या तालुक्यात कमी क्षेत्रावर गव्हाची पेरणी झाली आहे.

सोलापूर जिल्हयात उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी या तालुक्यांत पेरणी झाली आहे. माढा, सांगोला, माळशिरस या तालुक्यांत कमी क्षेत्रावर गव्हाची पेरणी झाली आहे. यंदा झालेल्या अधिक पेरणीमुळे गव्हाच्या उत्पादनात बऱ्यापैकी वाढ होण्याची शक्यता असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

 

पुणे विभागात झालेली पेरणी (हेक्टर)
जिल्हा सरासरी क्षेत्र    झालेली पेरणी टक्केवारी
नगर    ४९,७८५   ८९५७२ १८०
पुणे ६३,८५४ ३९२२७ ६१
सोलापूर ४१,२०३ ३९,९७१ ९७
एकूण   १,५४,८४२ १,६८,७७० १०९

 


इतर ताज्या घडामोडी
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...
बार्शी तालुक्यात सहा स्वस्त धान्य...सोलापूर : बार्शी तालुक्यातील सहा स्वस्त...
फालसापासून जाम, जेली, चटणीफालसा हा एक रानमेवा आहे. फालसा फळामध्ये प्रथिने,...
सोलापूर जिल्ह्यात पिकांच्या...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सलग...