Farmer Agricultural News wild animals damage crops Satara Maharashtra | Agrowon

जावळी तालुक्यात वन्यप्राण्यांकडून काढणीला आलेली पिके फस्त

टीम अॅग्रोवन
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

शेतकरी पिकाच्या राखणीसाठी सकाळी, दुपारी आणि रात्रीही शेताच्या बांधावरच थांबत आहेत. दिवसा ऐन उन्हात पशुपक्षी यांच्यापासून राखण, रात्री रानडुकरांचा कळप येतो. त्यावेळी फटाके किंवा डबडी वाजवून पिकाची राखण करावी लागते. तरीही रानडुकरांमुळे नुकसान होते.
-अनिल धनावडे, शेतकरी 

 मेढा, जि. सातारा : जावळी तालुक्‍यात रानडुकरांमुळे ज्वारी, भुईमूग, हरभरा, फराशी आदी पिकांचे नुकसान झाले आहे. काढणीस आलेली पिके वन्य प्राणी रात्री फस्त करत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. वन विभागाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. 

दिवसा पक्षी, तर रात्री वन्यप्राणी शेतातील उभ्या पिकांचे मोठे नुकसान करत आहेत. त्यामुळे जावळीतील शेतकरी त्रस्त झाले असून, दिवसा शेताच्या राखणीमुळे काम करता येईना, रात्रभर शेतात जावून ऐन थंडीत पहारा द्यावा लागत असल्यामुळे झोप मिळेना, अशी दैना शेतकऱ्यांची झाली आहे. वन्य प्राण्यांचा बंदोबस्त वन विभगाने करावा, अशी मागणी जोर धरत आहे. वन विभागाकडून नुकसानीचे पंचनामे वेळेत होत नाहीत. पंचनामे झाले तर मदत तुटपुंजी मिळते. मोठ्या शेतातून रानडुक्कर फिरलेल्या पिकांची मदतही मिळत नाही. नुकसानीची मदत मिळते, असे म्हणणारे अधिकारी नुकसानीची पाहणी करताना टेप टाकून मापे घेतात.

त्यामुळे रानडुक्कर फिरलेल्या पिकांची मदतही मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.  रानडुकरांमुळे ज्वारी, भुईमूग, हरभरा, फराशी आदी पिकांचे नुकसान होत आहे. काढणीस आलेली शिवारे रानडुकरे फस्त करीत असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. वन विभागाने दक्षता घेण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. 
 


इतर ताज्या घडामोडी
‘चांगभलं’च्या जयघोषाविना यंदा जोतिबाची...जोतिबा डोंगर, जि. कोल्हापूर ः कोरोना आणि...
नक्षलवाद्यांनीही घेतला कोरोनाचा धसका;...मुंबई : कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत...
मुंबईत हापूसची आवक वाढली; ५ डझन पेटीस...मुंबई : वाहतुकीतील अडथळे दूर केल्याने मुंबई कृषी...
नांदेड जिल्ह्यात गारपीटीमुळे पिके...नांदेड : जिल्ह्यातील ४० मंडळांमध्ये मंगळवारी (ता....
इचलकरंजीत विक्रेत्यांकडून चाराविक्रीचे...कोल्हापूर : वैरण बाजारात चारा विक्रेत्यांनी...
शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी...नांदेड :‘‘‘लॅाकडाऊन’मुळे शेतकऱ्यांना येणाऱ्या...
चाकूर तालुक्यात गारपीटीने पिके,...चापोली, जि. लातूर : चाकूर तालुक्यातील धनगरवाडी व...
बंदीवानांनी पिकवला भाजीपालाअकोला ः येथील जिल्हा कारागृहात असलेल्या शेतीत...
नांदेड जिल्ह्यात सहा हजार क्विंटल...नांदेड : ‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठी लॅाकडाऊन...
औरंगाबाद, नगर जिल्ह्यात कापसाची पावणे...औरंगाबाद : ‘‘राज्य कापूस पणन महासंघातर्फे...
अकोला पाणी टंचाईच्या उपाययोजना खोळंबल्याअकोला ः एकीकडे लॉकडाऊन तर दुसरीकडे ग्रामीण भागात...
अकोला बाजार समितीत गव्हाची टोकन...अकोला ः ‘कोरोना’ विषाणू प्रतिबंधात्मक...
वाडेगावमध्ये शेतकऱ्यांकडून मोफत...अकोला ः सध्याच्या परिस्थितीत नागरिकांना सहकार्य...
लॉकडाऊनमुळे ओझोनचा थर भरतोय का?सध्या सर्वत्र एक चर्चा सुरू आहे, ती म्हणजे ओझोनचा...
हिंगणघाट तालुक्‍यात सीसीआयकडे थकले...वर्धा ः सीसीआयला कापूस देणाऱ्या हिंगणघाट तालुक्‍...
नेरच्या शेतकऱ्यांची सोन्यासारखी फुले...देऊर, जि. धुळे : जगासह देशात ‘कोरोना’ विषाणूने...
विदर्भात कोरोना बाधितांची संख्या पोचली...नागपूर ः बुलडाणा, अमरावती नंतर नागपुरातील पहिल्या...
पुणे बाजार समितीत ३२५ वाहनांमधून...पुणे : शहरात कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या...
इंदापुरातील मच्छीमारांवर उपासमारीची वेळपुणे  ः  कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू...
`कोरोना`च्या पार्श्वभूमीवर पुणे...पुणे  ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर खबरदारी...