‘कोविड’च्या शिक्क्यावरून युवा सेना आक्रमक

अकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाअंतर्गत असलेल्या अमरावती येथील कृषी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर ‘प्रमोटेड कोविड १९’ असा उल्लेख केल्याने गोंधळ उडाला होता. याप्रकरणी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कुलगुरू डाॅ. विलास भाले यांची भेट घेत आक्रमकपणे चर्चा केली.
कुलगुरु डॉ. विलास भाले यांच्या चर्चा करताना युवा सेनेचे पदाधिकारी

याबाबत युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले की, डाॅ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अमरावती येथील श्री शिवाजी कॉलेज ऑफ हॉर्टिकल्चरने चौथ्या व सहाव्या सत्राच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर ‘प्रमोटेड कोविड १९’ असा शिक्का मारून चुकीचा पायंडा पाडला आहे. कोविड १९ मुळे परीक्षा घेता आल्या नाहीत. परंतु गुणपत्रिकेवर शिक्का मारून विद्यार्थ्याचे मनोधैर्य खच्चीकरण केले जात आहे. 

विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार न करता गुणपत्रिकेवर शिक्का मारण्यात आला. हा प्रकार कोणाच्या सांगण्यावरून झाला याची जबाबदारी निश्चित करून त्यावर कठोर कार्यवाही करावी. २४७ विद्यार्थ्यांना दिलेली गुणपत्रिका परत घेऊन नवीन गुणपत्रिका विद्यार्थ्यांना देण्यात याव्यात, अशी मागणी युवासेनेच्या शिष्टमंडळाने कुलगुरूंना दिलेल्या निवेदनात  केली आहे. यावेळी युवासेनेचे जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप पाटील व युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com