Farmer Agricultural Newsvijay javandia demands to declare a scheme for farmers Nagpur Maharashtra | Agrowon

कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपर योजना घोषित करा : विजय जावंधिया

टीम अॅग्रोवन
सोमवार, 11 मे 2020

नागपूर   ः सिंचन सुविधा असलेल्या हरियाणा राज्यात धानाऐवजी (तांदूळ) इतर पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहन योजना जाहिर करण्यात आली आहे. या अंतर्गंत एकरी सात हजार रुपये दिले जातील. अशाप्रकारची प्रोत्साहनपर योजना देशातील कोरडवाहू शेतकऱ्यासांठी केंद्र सरकारने घोषित करुन आर्थिक असमतोल दूर करावा, अशी मागणी ज्येष्ठ अभ्यासक विजय जावंधिया यांनी केली आहे.

नागपूर   ः सिंचन सुविधा असलेल्या हरियाणा राज्यात धानाऐवजी (तांदूळ) इतर पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहन योजना जाहिर करण्यात आली आहे. या अंतर्गंत एकरी सात हजार रुपये दिले जातील. अशाप्रकारची प्रोत्साहनपर योजना देशातील कोरडवाहू शेतकऱ्यासांठी केंद्र सरकारने घोषित करुन आर्थिक असमतोल दूर करावा, अशी मागणी ज्येष्ठ अभ्यासक विजय जावंधिया यांनी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कापूस उत्पादकांच्या प्रश्‍नांवर लिहिलेल्या पत्रातून त्यांनी ही मागणी केली आहे. पत्रानुसार, कोरोना महामारीमुळे देश, विदेशातील कापूस बाजारात मंदीचे वातावरण निर्माण झाले आहे. २०१८-१९ या वर्षात अमेरिकेतील न्यूयॉर्क कॉटन बाजारात ७५ ते ८५ सेंट प्रतीपाऊंड रुईचे दर होते. यावर्षी २५ मार्चच्या आधी हे दर ७० ते ७५ सेंट प्रतीपाऊंडवर पोचले. आता हे दर ५९ ते ६३ सेंट प्रतीपाऊंड आहेत. सरकीचे भारतातील दर १८०० ते २००० रुपये क्‍विंटल आहेत. त्यानुसार मुक्‍त बाजार व्यवस्थेत कापसाचे दर ४५०० ते ४६०० रुपये क्‍विंटलपेक्षा अधिक नाहीत. हे दर एक डॉलरच्या ७५ रुपये विनिमय दरानुसार काढण्यात आले आहेत. रुपया आणखी मजबूत झाल्यास हे दर आणखी कमी होतील. अशा स्थितीत सरकारने हमीभावाने कापसाची खरेदी करीत शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे. परंतू कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने आजवर ४० ते ४५ टक्‍केच कापूस खरेदी केला.

देशात सद्यःस्थितीत ३५० लाख गाठी कापसाचे उत्पादन होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कापूस शेतकऱ्यांकडे पडून आहे. या हंगामातील कापूस २० एप्रिलनंतर व्यापारी २५०० ते ४२०० रुपये क्‍विंटलने खरेदी करीत आहेत. सीसीआयने रुई गाठीचे दर ४६०० रुपये खंडीवरुन ३६०० रुपये केले आहेत. अशाप्रकारची मंदी राहिल्यास २०२०-२१ या हंगामातील कापूस दिवाळीनंतर बाजारात आल्यास मुक्‍त बाजारात त्याचे दर ४५०० रुपये क्‍विंटलपेक्षा अधिक राहणार नाहीत. त्यामुळे पंतप्रधानांनी २०२०-२१ या वर्षात शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड करावी का नको याविषयी मार्गदर्शन करावे, असेही पत्रात नमूद आहे.

 


इतर ताज्या घडामोडी
बार्शी तालुक्यात सहा स्वस्त धान्य...सोलापूर : बार्शी तालुक्यातील सहा स्वस्त...
फालसापासून जाम, जेली, चटणीफालसा हा एक रानमेवा आहे. फालसा फळामध्ये प्रथिने,...
सोलापूर जिल्ह्यात पिकांच्या...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सलग...
परभणी, हिंगोलीत सोयाबीन, तुर, कपाशीचे...परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील मंडळांत...
परभणी जिल्ह्यात पावसाचा सोयाबीन पिकाला...परभणी : जिल्ह्यात दीर्घ खंडानंतर पावसाचे आगमन...
विष्णुपुरी प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडलेनांदेड : गोदावरी नदीवरील विष्णुपुरी...
खानदेशात नुकसानीबाबत सोयाबीनचेही...जळगाव ः मूग, उडीद नुकसानीसंबंधी गेल्या...
जळगाव जिल्ह्यात बाजार समित्यांकडून...जळगाव ः जिल्ह्यात काही बाजार समित्यांचा...
परजिल्ह्यातील कारखान्यांची खानदेशातील...जळगाव ः खानदेशात उसाचे क्षेत्र यंदा...
पंजाब, हरियानात शेतकऱ्यांची आंदोलने नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेल्या कृषिविषयक...
चक्रीवादळाची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई...सिंधुदुर्ग ः निसर्ग चक्रीवादळातील नुकसानीकरिता...
नगर जिल्ह्यात मूग उत्पादकतेत यंदा...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने...
मुळा धरणातून वीस हजार क्युसेक विसर्गनगर ः नगर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार...
पावसाने सोयाबीनला फुटले कोंबवाशीम ः जिल्ह्यात काही भागात सततच्या पावसामुळे...
औरंगाबाद, लातूरमध्ये पावसाचा धुमाकूळऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच...
पोषणयुक्त आहार घेण्यावर भर द्या : पाटीलनाशिक : ‘‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने...
कांदा निर्यातबंदी विरोधात ‘सोशल मीडिया...नाशिक : २०१३-१४ मध्ये सोशल मीडियाचा मोठ्या...
कारखान्यांना २५ बेडचे हॉस्पिटल बंधनकारकसोलापूर : राज्यातील ऊस गाळप हंगाम १५ ऑक्‍...
निर्यात अडथळे, बियाणे दराचा कांदा...जळगाव ः खानदेशात प्रतिकूल वातावरणामुळे खरिपातील...
परभणीत भेंडी १००० ते १५०० रूपये क्विंटल परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...