नागपूर कृषी महाविद्यालय राबवणार ‘ई-शेतकरी संवाद’ उपक्रम 

नागपूर : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन सुरू असल्याने या काळात बांधावर जात शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करणे शक्य नाही. यावर पर्याय म्हणून नागपूर कृषी महाविद्यालयाच्या शिक्षण विभागाने ‘ई- शेतकरी संवाद’ ही संकल्पना राबवली आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नागपूर  : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन सुरू असल्याने या काळात बांधावर जात शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करणे शक्य नाही. यावर पर्याय म्हणून नागपूर कृषी महाविद्यालयाच्या शिक्षण विभागाने ‘ई- शेतकरी संवाद’ ही संकल्पना राबवली आहे. 

‘कोरोना’च्या काळात अनेक उद्योगांना टाळेबंदी लागू करण्यात आली. परंतु, शेतीक्षेत्र याला अपवाद ठरले. शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी सुरू केली. सद्यःस्थितीत खरीप पिके जोमात आहेत. मात्र काही भागात या पिकांवर कीड रोगांचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना बांधावर जाऊन मार्गदर्शन करणे शक्य नाही. त्यामुळे नागपूर कृषी महाविद्यालयाच्या विस्‍तार शिक्षण विभागाने ई- शेतकरी संवाद संकल्पना राबवण्याचे ठरवले आहे. याअंतर्गत दर गुरुवारी दुपारी दोन वाजता ऑनलाइन पद्धतीने शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या शेतीविषयक अडचणी तज्ज्ञांच्या माध्यमातून दूर केल्या जाणार आहेत.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास झाले यांच्या मार्गदर्शनातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. नागपूर कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. डी. एम. पंचभाई, विस्तार शिक्षण विभागाचे डॉ. मिलिंद राठोड, डॉ. शुभांगी परशुरामकर यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. शेतकऱ्यांना कोणत्या विषयावर मार्गदर्शनाची गरज आहे हे ठरवण्यासाठी १२ सदस्य तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यामध्ये डॉ. पी. आर. मानापूरे, डॉ. एस.एस. नवलाखे, वाय. बी. खोबरागडे, आर.एम. घोडपागे, एन. व्ही. लव्हे, डॉ. एम. जे. पाटील, डॉ. ए. आर. पिंपळे, डॉ. व्हि. एम. इलोरकर, डॉ. नितीन चोरे, डॉ. यु. टी. डांगोरे, डॉ. जे. आर. काटोरे यांचा समावेश आहे. 

नागपूर कृषी महाविद्यालयाच्या विस्तार शिक्षण विभागासोबतच नागपूर विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाने देखील या महत्त्वाकांक्षी उपक्रमात सहभाग नोंदविला आहे. दोन्ही यंत्रणांच्या सहभागातून हा उपक्रम राबविला जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com