महायुतीचे वऱ्हाडात दूध दरप्रश्नी आंदोलन

अकोला ः दूध उत्पादकांनासरसकट १० रुपये प्रतिलिटर व दूध पावडरला प्रति किलो ५० रूपये अनुदान देण्याच्या मागणीसाठी महायुतीतर्फे शनिवारी (ता. १) वऱ्हाडात आंदोलन करण्यात आले.
दूध दरवाढीच्या मागणीसाठी भाजपच्यावतीने अकोला जिल्ह्यात आंदोलन झाले.
दूध दरवाढीच्या मागणीसाठी भाजपच्यावतीने अकोला जिल्ह्यात आंदोलन झाले.

अकोला  ः दूध उत्पादकांनासरसकट १० रुपये प्रतिलिटर व दूध पावडरला प्रति किलो ५० रूपये अनुदान देण्याच्या मागणीसाठी महायुतीतर्फे शनिवारी (ता. १) वऱ्हाडात आंदोलन करण्यात आले. भाजप, रिपाई आठवले गट, रासप, रयत क्रांती, शिवसंग्राम असे महायुतीचे घटकपक्ष या आंदोलनात सहभागी झाले होते. 

‘कोरोना’च्या संकटात दुधाचे भाव अतिशय कमी झाले आहेत. यातून दूध उत्पादकांना उत्पादन खर्च सुध्दा मिळत नाही आणि त्यातच राज्य शासनाने दूध उत्पादकांना मिळणारे अनुदान बंद केले आहे. या उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी महायुतीने राज्य सरकारला निवेदन दिले होते. परंतु यावर तोडगा न काढल्याने आंदोलन करण्यात आले. 

केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात ४२ ठिकाणी दूध दरप्रश्नी शेतकरी व सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर उतरले होते. भाजपच्या वतीने दूध उत्पादक शेतकरी तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर व वाढीव वीज बिलासंदर्भात शनिवारी ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधत हे आंदोलन करण्यात आले.

आमदार सावरकर यांच्यासह गोवर्धन शर्मा, प्रकाश भारसाकळे, हरीश पिंपळे, महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल, महापौर अर्चना मसने, तेजराव थोरात, किशोर पाटील आदींच्या उपस्थितीत जिल्ह्यात ४२ ठिकाणी आंदोलन करण्यात आले.

बुलडाण्यात टँकर अडविले बुलडाणा जिल्ह्यात शनिवारी पहाटेपासून आंदोलन सुरू झाले. रयत क्रांती व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी चिखली येथे मेहकर फाट्यावर दुधाची वाहतूक करणारे टँकर अडविले. संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनायक सरनाईक, विदर्भ अध्यक्ष प्रशांत ढोरे आदी या आंदोलनात सहभागी झाले होते. जिल्हाभर भाजपच्या कार्यकर्त्यांनीही आंदोलने करीत शासनाच्या विरोधात निदर्शने केली.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com