Farmers Agricultural News Marathi agitation for milk rate issue Akola Maharashtra | Agrowon

महायुतीचे वऱ्हाडात दूध दरप्रश्नी आंदोलन

टीम अॅग्रोवन
रविवार, 2 ऑगस्ट 2020

अकोला  ः दूध उत्पादकांनासरसकट १० रुपये प्रतिलिटर व दूध पावडरला प्रति किलो ५० रूपये अनुदान देण्याच्या मागणीसाठी महायुतीतर्फे शनिवारी (ता. १) वऱ्हाडात आंदोलन करण्यात आले.

अकोला  ः दूध उत्पादकांनासरसकट १० रुपये प्रतिलिटर व दूध पावडरला प्रति किलो ५० रूपये अनुदान देण्याच्या मागणीसाठी महायुतीतर्फे शनिवारी (ता. १) वऱ्हाडात आंदोलन करण्यात आले. भाजप, रिपाई आठवले गट, रासप, रयत क्रांती, शिवसंग्राम असे महायुतीचे घटकपक्ष या आंदोलनात सहभागी झाले होते. 

‘कोरोना’च्या संकटात दुधाचे भाव अतिशय कमी झाले आहेत. यातून दूध उत्पादकांना उत्पादन खर्च सुध्दा मिळत नाही आणि त्यातच राज्य शासनाने दूध उत्पादकांना मिळणारे अनुदान बंद केले आहे. या उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी महायुतीने राज्य सरकारला निवेदन दिले होते. परंतु यावर तोडगा न काढल्याने आंदोलन करण्यात आले. 

केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात ४२ ठिकाणी दूध दरप्रश्नी शेतकरी व सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर उतरले होते. भाजपच्या वतीने दूध उत्पादक शेतकरी तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर व वाढीव वीज बिलासंदर्भात शनिवारी ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधत हे आंदोलन करण्यात आले.

आमदार सावरकर यांच्यासह गोवर्धन शर्मा, प्रकाश भारसाकळे, हरीश पिंपळे, महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल, महापौर अर्चना मसने, तेजराव थोरात, किशोर पाटील आदींच्या उपस्थितीत जिल्ह्यात ४२ ठिकाणी आंदोलन करण्यात आले.

बुलडाण्यात टँकर अडविले
बुलडाणा जिल्ह्यात शनिवारी पहाटेपासून आंदोलन सुरू झाले. रयत क्रांती व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी चिखली येथे मेहकर फाट्यावर दुधाची वाहतूक करणारे टँकर अडविले. संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनायक सरनाईक, विदर्भ अध्यक्ष प्रशांत ढोरे आदी या आंदोलनात सहभागी झाले होते. जिल्हाभर भाजपच्या कार्यकर्त्यांनीही आंदोलने करीत शासनाच्या विरोधात निदर्शने केली.
 


इतर बातम्या
सिंधुदुर्गात पूरस्थिती, जनजीवन विस्कळीत सिंधुदुर्ग ः जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन...
माजी मंत्री अनिल राठोड यांचे निधननगर, : नगर शहराचे माजी आमदार, तत्कालीन युती...
माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील...लातूर : काँग्रेसचे जेष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री...
राज्यात पावसाचा जोर वाढणार पुणे :  राज्यातील बहुतांशी भागात पुन्हा...
कोल्हापूर बाजार समिती संचालकांचे...कोल्हापूर : बेकायदेशीर नोकर भरती तसेच जागा...
परभणी जिल्ह्यात तीन लाख ७२ हजार हेक्टर...परभणी : ‘‘पंतप्रधान पिकविमा योजनेअंतर्गंत...
लातूर विभागात विम्याचे २१ लाख हेक्टर...उस्मानाबाद : लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी,...
मोर मध्यम प्रकल्पाच्या कालवा...हिंगोणा, जि. जळगाव ः सातपुडा पर्वतातील मोर...
मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्पांत ५१...औरंगाबाद :  मराठवाड्यातील ८७३ प्रकल्पांतील...
'रासाका' लवकर सुरू करा, शेतकऱ्यांची...नाशिक  : गेल्या काही दिवसांपासून निफाड...
खानदेशात कांदा रोपवाटिकांची स्थिती बिकट...जळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांची स्थिती बिकट...
यावल, रावेरमध्ये मका पिकावर लष्करी अळी...जळगाव : यावल तालुक्यातील किनगाव, डांभुर्णी,...
नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याच्या तुरळक...नाशिक : जिल्ह्यात खरीप हंगामातील कांदा लागवडीचा...
सोलापूर जिल्ह्यात सोयाबीनच्या निकृष्ट...सोलापूर : जिल्ह्यात सोयाबीनच्या निकृष्ठ...
अकोले तालुक्‍यात भात लागवडी रखडल्यानगर : जिल्ह्यातील अकोले तालुक्‍याच्या उत्तर...
गोंदियाची पीक कर्ज वाटपात आघाडीगोंदिया : पीक कर्ज वाटपात जिल्ह्याने आघाडी घेत...
खेडे स्वयंपूर्ण, तर राज्य, देश...नाशिक : ‘‘कोविड- १९ च्या या परिस्थितीत...
प्रतिबंधित कीटकनाशकांची विक्री करू नकाअकोला ः पिकांवर कीटकनाशक फवारणी करताना होणाऱ्या...
संचारबंदी काळात सोलापूर जिल्ह्यातील १७८...सोलापूर : ‘‘सोलापूर शहर व जिल्ह्यातील कोरोनाचा...
प्रविण कसपटे ठरले सर्वाधिक बिझनेस...बार्शी : येथील युवा उद्योजक प्रविण कसपटे यांनी...